Chandrapur Crime News : आईनेच वडिलांचा खून केल्याचं मुलीला फोनमुळे समजलं! मोबाईल कॉल रेकॉर्डिंगमुळे खुनाचा उलगडा
Chandrapur Crime News : या फोनमध्ये असलेली एक ऑडिओ क्लिप या मुलीच्या हाती लागली. सर्व प्रकरण शांत झालं असतानाच, या प्रकरणात मोबाईलमुळे एक मोठा ट्विस्ट आला.
![Chandrapur Crime News : आईनेच वडिलांचा खून केल्याचं मुलीला फोनमुळे समजलं! मोबाईल कॉल रेकॉर्डिंगमुळे खुनाचा उलगडा Chandrapur Crime marathi News Mobile call recording revealed crime of mother and boyfriend in police custody Chandrapur Crime News : आईनेच वडिलांचा खून केल्याचं मुलीला फोनमुळे समजलं! मोबाईल कॉल रेकॉर्डिंगमुळे खुनाचा उलगडा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/15/2364d0333d387c2655cdba94303ce91b1668494537794169_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Chandrapur Crime News : मोबाईल कॉल रेकॉर्डिंगमुळे (Crime News) एका खुनाचा तब्बल 3 महिन्यानंतर उलगडा झाल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात उघडकीस आला आहे. ब्रम्हपुरी शहरातील गुरुदेव नगरातील ही घटना आहे. मुलीने आईबद्दल असलेले सत्य जगासमोर आणले. काय घडलं नेमकं?
आईने सांगितलेली बाब मुलींनी सत्य मानली
या घटनेबाबत माहिती अशी की, श्याम रामटेके असं 66 वर्षीय मृतकाचं नाव आहे. त्यांचा 3 महिन्यांपूर्वी म्हणजे 6 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. हार्ट अटॅकने त्यांचा झोपेत मृत्यू झाल्याचं पत्नीकडून सांगण्यात आलं. रामटेके यांचं वय 66 वर्ष असल्याने सर्वांनी यावर विश्वास देखील ठेवला. आईने सांगितलेली बाब सत्य मानून नागपुरात असलेल्या दोन्ही मुली वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी घरी आल्या. त्यानंतर रीतसर अंत्यविधी झाला. यानंतर आई एकटीच घरी राहते, यावरून लहान मुलगी ब्रह्मपुरी येथे राहण्यास आली. सर्व प्रकरण शांत झालं असतांना मात्र या प्रकरणात मोबाईल मुळे एक मोठा ट्विस्ट आला.
ऑडिओ क्लिप मुलीच्या हाती लागली
मृत व्यक्तीची पत्नी रंजना ही आपल्या लहान मुलीचा फोन वापरत होती. काही कारणामुळे या मुलीने 3-4 दिवस आधी हा फोन परत घेतला. या फोनमध्ये असलेली एक ऑडिओ क्लिप या मुलीच्या हाती लागली. आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्यामध्ये ही महिला आपल्या पतीचा खून केल्यावर आपल्या प्रियकराला रात्री फोन लावते. तसेच कशाप्रकारे खून केला आणि इतर गोष्टी सांगते. या रेकॉर्डिंगमध्ये या महिलेने पतीला पहिले विष पाजले व नंतर हातपाय बांधून तोंडावर उशी दाबून खून केला. या सर्व बाबीचा उलगडा झाल्यानंतर या मुलीच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपी रंजना रामटेके आणि तिचा प्रियकर मुकेश त्रिवेदी यांना पोलिसांनी अटक केली आहे.
सकाळी सर्वांना पती गेल्याचे सांग, प्रियकराचा सल्ला
पत्नीच्या प्रियकराने अंथरूण नीट करून सकाळी सर्वांना पती गेल्याचे सांग, असा सल्ला दिल्याचंही त्या संभाषणात आढळलं. यावरून मोठ्या मुलीने शनिवारी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी रंजना रामटेके आणि मुकेश त्रिवेदी या दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यानंतर पती शाम रामटेके यांचा खून केल्याची कबुली महिलेने दिली. पोलिसांनी रंजना रामटेके आणि तिचा प्रियकर मुकेश त्रिवेदी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.
संबंधित बातमी:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)