Maharashtra News Updates 13 December 2022 : सदानंद दाते यांची बदली, विश्वास नांगरे पाटलांना बढती, रितेश कुमार पुण्याचे तर मिलिंद भारंबे नवी मुंबईचे पोलिस आयुक्त
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE

Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुनावणी होणार आहे. शिवाय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप नेते चंद्रकांत पाटील, भाजप नेते प्रसाद लाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या निषेधार्थ सामाजिक संघटना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनी पुणे बंदची हाक दिलीय. तर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जामीनावर आज हायकोर्टात सुनावणी आहे. यासह आज दिवसभरात घडणाऱ्या विविध घडामोडीवर आमचं लक्ष असणार आहेत, याची सर्व माहिती आम्ही तुम्हाला देऊ....
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबाबतची सुनावणी
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबाबतची सुनावणी घटनापीठासमोर दुसऱ्या क्रमांकावर आहे. निर्देशांसाठी हे प्रकरण आहे. आज सत्ता संघर्षाच्या प्रकरणात घटनापीठासमोर मुख्य युक्तिवादांची तारीख आज ठरण्याची शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सुनावणी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्ट काही आदेश देतं का याची उत्सुकता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतचे प्रकरण क्रमांक 36 वर आहे.
नवाब मलिकांच्या जामीनावर आज हायकोर्टात सुनावणी
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जामीनावर आज हायकोर्टात सुनावणी आहे. मलिकांच्या वैद्यकीय प्रकृतीचा दाखल देत वकिलांकडून तातडीच्या सुनावणीसाठी विनंती करण्यात आली आहे. हायकोर्टानं सुनावणीची विनंती मान्य केली असून आज ही सुनावणी होईल.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक
आज सकाळी 11 वाजता मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्नाटक सीमावादा संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.
वादग्रस्त वक्तव्यांविरोधात आज पुणे बंदची हाक
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप नेते चंद्रकांत पाटील, भाजप नेते प्रसाद लाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या निषेधार्थ सामाजिक संघटना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनी पुणे बंदची हाक दिलीय.
आजपासून जी-20 परिषदेला सुरुवात होणार
मुंबईसह देशभराचे लक्ष लागून राहिलेल्या जी- 20 परिषेदेसाठी राज्य सरकारने तयारीचा वेग वाढविला आहे. या परिषदेअंतर्गत महाराष्ट्रात एकूण 14 बैठका होणार असून त्यातील आठ बैठका या मुंबईत पार पडणार आहेत. त्याशिवाय पुण्यात 4 तर नागपूर आणि औरंगाबादेत प्रत्येकी एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे. आजपासून 16 तारखेपर्यंत मुंबईतील बिकेसी सेंटर येथे या बैठकीला सुरुवात होणार आहे.
तृतीयपंथीयांना ऑनलाइन साइटवर आजपासून पर्याय उपलब्ध
आता तृतीयपंथीयांना देखील पोलिस आणि पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी फॉर्म भरतील येईल. आजपासून म्हणजेच 13 डिसेंबरपासून ऑनलाइन साइटवर पर्याय उपलब्ध असणार आहे.
बिल्कीस बानोच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
बिल्कीस बानोच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. बिल्कीस बानो रेप केस प्रकरणी दोषी आरोपींची शिक्षा माफ करण्यात आली होती. याविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेवर आज सुनावणी होईल.
जळगावात रास्ता रोको
महापुरुषांबाबत बदनामीकारक वक्तव्यांविरोधात शाहू, फुले आणि आंबेडकरी संघटनांच्या वतीने मुंबई नागपूर हायवेवर रास्ता रोको करण्यात येणार आहे.
Police Bharti: 10 तृतीयपंथीने पोलीस भरतीसाठी भरले फॉर्म
पोलीस भरतीसाठी 2021 च्या संकेतस्थळावर तृतीयपंथातील व्यक्तीसाठी पर्याय उपलब्ध करुन दिल्यानंतर पहिल्याच दिवशी सुमारे 10 तृतीयपंथीने फॉर्म भरले आहे. 10 तृतीयपंथी पैकी 8 जणांनी पोलीस शिपाई पदासाठी तर इतरांनी पोलीस शिपाई ड्रायव्हरसाठी फॉर्म भरले आहेत, अशी माहिती पोलीस विभाघातील सूत्रांनी दिली.
IPS Transfer: सदानंद दाते यांची बदली, विश्वास नांगरे पाटलांना बढती, रितेश कुमार पुण्याचे तर मिलिंद भारंबे नवी मुंबईचे पोलिस आयुक्त
राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. सदानंद दाते यांची बदली झाली आहे, तर विश्वास नांगरे पाटील यांना बढती देण्यात आली आहे. सदानंद दाते आता दहशतवादी विरोधी पथकाचे अपर पोलिस महासंचालक तर विश्वास नांगरे पाटील आता लाललुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलिस महासंचालक असतील. तर रितेश कुमार पुण्याचे तर मिलिंद भारंबे आता नवी मुंबईचे पोलिस आयुक्त असतील.
Prakash Ambedkar: मुख्यमंत्र्यांसोबतची आजची बैठक ही इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या पुतळ्यासंबंधित: प्रकाश आंबेडकर
मुख्यमंत्र्यांसोबतची आजची बैठक ही इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या पुतळ्यासंबंधित होती, त्यामध्ये कोणताही राजकीय विषयावर चर्चा झाली नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची आज एक बैठक झाली. त्यानंतर प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर यांनी ही माहिती दिली.
शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंविरोधात वारकरी संघटना आक्रमक, पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या हिंदू धर्मियांच्या देव देवतांबद्दल बोलतानाचा एक व्हिडीओ समाज माध्यमात व्हायरल झालाय. या व्हिडीओवरून वारकरी संघटना अंधारेंविरोधात आक्रमक झाल्या आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी केलीय. राज्यातील वारकऱ्यांना शपथ देऊन सुषमा अंधारे ज्या पक्षात जातील त्या पक्षाला मतदान न करण्याची शपथ देण्यात येईल असं सांगण्यात आलंय.
अमरावतीत लक्ष्य प्रतिष्ठानकडून माहेरवासिनी मेळावा, 500 महिलांचा साडी-चोळीने सन्मान
अमरावती जिल्ह्यातील जवळा शहापूर येथे लक्ष्य प्रतिष्ठानकडून महिलांसाठी माहेरवासिनी मेळावा पार पडला. यावेळी 500 च्यावर महिलांना साडी-चोळी देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी माजी राज्यसभा खासदार पदमश्री डॉ. विकास महात्मे, सुरेखा ठाकरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. अमरावती जिल्ह्यातील जवळा शहापूर येथे श्री संत गाडगे महाराज पुण्यतिथी महोत्सव सप्ताह आयोजित करण्यात आला. यनिमित्ताने श्रीमद भागवत कथेसह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. लक्ष्य प्रतिष्ठान अमरावती आणि महात्मे आय बँक नागपूर यांच्यातर्फे नेत्र तपासणी शिबिर आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर सुद्धा यावेळी घेण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
