Maharashtra News Live Updates : हिंगोली नांदेड यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा, 7 बंधारे आणि 16 पुलांच्या कामाला मुख्यमंत्र्यांची मंजुरी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो.
आज विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची लगबग असणार आहे. तर, आज जिजाऊ जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय लष्कराच्यावतीने आज वार्षिक पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी महत्त्वाची माहिती भारतीय लष्कराकडून दिली जाण्याची शक्यता आहे.
> जिजाऊ जयंती निमित्ताने कार्यक्रम:
सिंदखेड राजा येथे 425 वा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा जिजाऊ स्ष्टीत होणार आहे. सकाळी 6 वाजता महापूजा होणार आहे. सकाळी 7 वाजता दिंडी निघणार आहे. सकाळी 9 वाजता शिवधर्म ध्वजारोहण होणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत सास्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
> विधान परिषद उमेदवारी अर्ज
मुंबई – विधान परिषदेच्या पाच जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे. भाजप शिंदे गटाच्या सोबत बच्चू कडू ही जागेसाठी आग्रही आहेत. त्यामुळे शेवटच्या दिवशी कोण कोण उमेदवारी अर्ज भरणार हे पहाण महत्वाचं राहील.
> राष्ट्रगीताचा अवमान प्रकरण, याचिकेवर आज निकाल अपेक्षित
राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज निकाल अपेक्षित याप्रकरणी ममता बॅनर्जी यांना शिवडी दंडाधिकारी न्यायालयात हजेरी लावण्याच्या निर्णयाला त्यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिलेलं आहे. त्यावरील दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर विशेष कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी गेल्या आठवड्यात आपला निकाल राखून ठेवला. त्याबाबत आज निकाल येण्याची शक्यता आहे.
- टॉप्स सिक्युरीटज प्रकरणी मुंबई पोलिसांनी सादर केलेला सी समरी अहवाल स्वीकारू नये यासाठी ईडीने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. 12 जानेवारीपर्यंत कोणतीही कार्यवाही न करण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणातील आरोपी अमित चांडोले आणि एम शशिधरन यांना हायकोर्टानं जामीन दिला आहे. अमित चांदोले हे शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईकांचे निकटवर्तीय आहेत.
नाशिक – नाशिक पदवीधर मतदारसंघाचा सस्पेंस कायम आहे. आज सुधीर तांबे दुपारी 2 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपचा उमेदवार अद्यापही गुलदस्त्यात आहे. भाजपचा उमेदवार कोण असेल याबाबत उशिरा नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.
Sharad Yadav: जेडीयूचे माजी अध्यक्ष , ज्येष्ठ समाजवादी नेते शरद यादव यांचे निधन
Sharad Yadav: जनता दल युनायटेड पक्षाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ समाजवादी नेते शरद यादव यांचे निधन झाले. त्यांच्या मुलीने ट्वीट करून ही माहिती दिली. ते 75 वर्षांचे होते. मागील काही काळापासून ते आजारी होते.
आदिवासी समाजाचे नेते अशोकराव भांगरे यांचे निधन
अशोकराव भांगरे यांचे निधन...
हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू...
अकोले तालुक्यातील आदिवासी समाजाचे नेते...
अगस्ती साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष...
अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, राष्ट्रवादीचे नेते ...
अशोकराव भांगरे यांच्या निधनाने अकोले तालुक्यावर शोककळा...
साडे आठवाजता आला होता हृदय विकाराचा झटका..
घोटी येथील एसएमबीटी रूग्णालयात घेतला अखेरचा श्वास..
Jalana News: जालना- जुन्या वादातून सात ते आठ जणांना जबर मारहाण
Jalana News: जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यातल्या कोकाटे हादगाव गावात एका कुटुंबातील सात ते आठ जणांना बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आलीय,काल संध्याकाळी 9 च्या सुमारास या गावातील काकडे कुटुंबाला जुन्या भांडणाची तक्रार मागे का घेत नाही म्हणून 15 जणांनी बेदम मारहाण केली
Bhiwandi News: भिवंडीतील शेलार ग्रामपंचायतीच्या हंडा मोर्चाला यश ; पाणीपुरवठा सुरळीत व मुबलक करण्याचे लेखी आश्वासन
Bhiwandi News: भिवंडी शहरालगत असलेल्या शेलार ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना स्ट्रेम वॉटर डिस्ट्रीब्यूटर कंपनीकडून होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने व अत्यल्प होत असल्याने शेलार ग्रामपंचायतीवर पाणी संकट ओढवले आहे.याबाबत स्टेम प्राधिकरणाला शेलार ग्रामपंचायतच्या वतीने वारंवार लेखी निवेदने व तक्रारी अर्ज करूनही स्टेम प्राधिकरण शेलार ग्रामपंचायतच्या अपुऱ्या पाणीपुरवठ्याकडे सतत दुर्लक्ष करीत होते.स्टेमचमुके या दुर्लक्षित कारभारामुळे शेलार ग्रामपंचायत हद्दीत पिण्याच्या पाण्याची समस्या बिकट झाली. त्याविरोधात आज ग्रामस्थांनी मोर्चा काढला.
Beed News: परळीच्या रेल्वे स्थानकात बॉम्बशोधक पथकाची मॉकड्रिल, अत्याधुनिक तपासणी यंंत्र आणि श्वान पथकाचा समावेश
Beed: परळी येथील रेल्वे स्थानकामध्ये आज बॉम्ब शोधक पथकाच्या वतीने मॉकड्रिल करण्यात आले. यावेळी अत्याधुनिक तपासणी यंत्र त्याचबरोबर प्रशिक्षित श्वानांना घेऊन बॉम्बशोधक पथकांनी रेल्वे स्थानकाच्या सुरक्षतेसाठी यशस्वी मॉकड्रिल केले. यामध्ये रेल्वे पोलिसांनी सहभाग घेतला होता.