Maharashtra News Updates 10 October 2022 : शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव तर उद्धव ठाकरेंचं चिन्ह 'मशाल'
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...
निवडणूक आयोग ठाकरे गट आणि शिंदे गटाला अधिकृत चिन्ह आणि पक्षाचं नाव देणार
शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यांतर निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना तीन चिन्ह आणि पक्षासाठी तीन नावं देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ठाकरे गटाने तीन चिन्ह आणि तीन नावे सुचवली आहेत. उद्या शिंदे गट आपले नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाकडे सादर केले. त्यानंतर दुपारनंतर निवडणूक आयोग ठाकरे गट आणि शिंदे गटाला अधिकृत चिन्ह आणि पक्षाचं नाव देईल.
रोटरी क्लब मार्फत आनंदयान या तिसऱ्या केंद्राचे उद्घाटन
मुंबईत रोटरी क्लब मार्फत आनंदयान या तिसऱ्या केंद्राचे उद्घाटन होणार आहे. मोकळ आयुष्य जगण्यापासून वंचित असलेल्या वृद्धांसाठी हे केंद्र उभारण्यात येणार आहे.
दिल्लीत आरजेडीच्या राष्ट्रीय परिषदेची बैठक
आरजेडीच्या राष्ट्रीय परिषदेची बैठक आज सकाळी 11 वाजता. होणार आहे. या बैठकीत लालू प्रसाद यादव 8 व्यांदा पक्षाचे अध्यक्ष होतील
मुंबई गोवा महामर्गाच्या दुरवस्थेसंदर्भात हायकोर्टात दाखल जनहित याचिकेवर सुनावणी
मुंबई-गोवा महामर्गाच्या दुरवस्थेसंदर्भात हायकोर्टात दाखल जनहित याचिकेवर सुनावणी होणार आहे.
मालेगाव ब्लास्टच्या खटल्यावर एनआयए कोर्टात सुनावणी
मालेगाव ब्लास्टच्या खटल्यावर एनआयए कोर्टात सुनावणी होणार आहे. साध्वी प्रज्ञाशी संबंधित महत्त्वाच्या साक्षीदारांची सध्या उलट तपासणी सुरू आहे- अमेय
भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील कोल्हापूर दौऱ्यावर
भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील आज कोल्हापुरात आहेत.
नाशिकमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची बैठक
पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची बैठक होणार आहे. सरकार स्थापनेनंतर पहिल्यांदाच डीपीडीसीची बैठक होत आहे. नाशिकच्या साधारणपणे ६०० कामांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली होती. ती स्थगिती आज उठणार का? सुहास कांदे यांनी माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात तक्रार केली होती. त्यानंतर स्थगिती देण्यात आली होती.
मनसे नेते अमित ठाकरे हिंगोली जिल्हा दौऱ्यावर
मनसे नेते अमित ठाकरे हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत. पक्षाच्या वेगवेगळ्या बैठकांना ते हजेरी लावतील. तसेच, नरसी नामदेव आणि औंढा नागनाथ या दोन्हीही ठिकाणी अमित ठाकरे दर्शन घेणार आहेत.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे अकोला आणि अमरावतीच्या दौऱ्यावर
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे अकोला आणि अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. पदाधिकाऱ्यांच्या बैठकांना उपस्थित राहतील.
वर्ध्यात महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन
महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेसचे पदाधिकारी, ओबीसी संघटना व विद्यार्थी सहभागी होणार आहेत, दुपारी १ वाजता.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते शैक्षणिक संकुलाचं उद्घाटन
पंतप्रधान मोदींच्या हस्ते भरुच येथे उद्घाटन होणार आहे, सकाळी 11 वाजता. तसेच अहमदाबाद येथे शैक्षणिक संकुलाचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे, दुपारी 3.15 वाजता. त्यानंतर जामनगर येथे विविध योजनांचं लोकार्पण होणार आहे, संध्याकाळी 5.30 वाजता.
भारतीय दूतावासाकडून युक्रेनमधील सर्व भारतीय नागरिकांसाठी अॅडव्हायसरी जारी
कीव्हमधील भारतीय दूतावासाने युक्रेनमधील सर्व भारतीय नागरिकांसाठी अॅडव्हायसरी जारी केली आहे. भारतीय नागरिकांना युक्रेनमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. युक्रेनमधील त्यांच्या उपस्थितीच्या स्थितीबद्दल भारतीय दूतावासाला माहिती द्यावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांची कर्नाटक हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती पदावर नियुक्ती
मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांची कर्नाटक हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती पदावर नियुक्ती
केंद्र सरकारनं जारा केली अधिसूचना
30 सप्टेंबरच्या बैठकीत सर न्यायाधीश उदय लळित यांच्या अध्यक्षतेखाली न्यायवृंदानं केला होती शिफारस
Breaking News : आयपीएस अधिकारी देवेन भारती यांना पासपोर्ट प्रकरणात क्लीन चिट
आयपीएस अधिकारी देवेन भारती यांना पासपोर्ट प्रकरणात क्लीन चिट
मुंबई गुन्हे शाखेच्या इंटेलिजेन्स युनिटने (सीआययू) सोमवारी अतिरिक्त पोलीस महासंचालक देवेन भारती आणि निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांना पासपोर्ट प्रकरणात क्लीन चिट दिली
भारतीय जनता पक्षाचे नेते हैदर आझम खान यांच्या पत्नी रेश्मा खैराती खान यांच्या विरोधात 37 व्या महानगर दंडाधिकारी न्यायालयात (किल्ला कोर्ट) सीआयुतर्फे 500 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं
ज्यात भारती आणि फटांगरे यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत आणि एफआयआरमध्ये या दोघांविरुद्धचे लावलेले आरोप हे चुकीच्या हेतूनं केले गेल्याचं मान्य
रेश्मावर बनावट जन्म प्रमाणपत्र बनवून भारतीय पासपोर्ट प्राधिकरणाला दिल्याचा आरोप आहे
मात्र तपासानंतक ती बांगलादेशी नागरिक असल्याचा आरोप खोटा असून ती बिहारचीच असल्याची माहिती स्पष्ट
मालवणी पोलिसांनी डिसेंबर 2021 मध्ये भारती, रेश्मा आणि फटांगरे यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि पासपोर्ट कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता
देवेन भारती त्यावेळी सह पोलीस आयुक्त (कायदा सुव्यवस्था) होते
त्यांच्यावर विशेष शाखेच्या एका पोलीस निरीक्षकावर रेश्मा विरुद्ध प्रकरणाचा पाठपुरावा न करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला होता
बसच्या धडकेत 2 दुचाकीस्वारांचा मृत्यू, कारंजा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील दुर्दैवी अपघात
येणार्या निवडणुकीत जनता या गटाला व भाजपला धडा नक्की शिकवणार. - Clyde Crasto - क्लाईड क्रास्टो
ज्यांनी बाळासाहेबांची शिवसेना तोडली, नाव आणि चिन्ह गोठवले, त्यांना 'बाळासाहेबांची शिवसेना' असं नाव दिलं गेलंय.
आदरणीय बाळासाहेब यांना मानणारी महाराष्ट्राची जनता हे कधीही स्वीकारणार नाही आणि यांना माफदेखील करणार नाही.
येणार्या निवडणुकीत जनता या गटाला व भाजपला धडा नक्की शिकवणार. - Clyde Crasto - क्लाईड क्रास्टो