एक्स्प्लोर

Maharashtra News Updates 08 December 2022 : शिवसेना खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी ; बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News Updates 08 December 2022 : शिवसेना खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी ; बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

गुजरात आणि हिमाचल राज्यात सत्ता कुणाची याचा फैसला आज होणार आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून या दोन राज्यातील निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात होणार आहे. गुजरातमध्ये भाजप आपली सत्ता कायम ठेवणार तर हिमाचलमध्येही भाजप काठावर पास होणार असा अंदाज एक्झिट पोलच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे. यासह आज इतर कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत त्या जाणून घेऊया.

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक मतमोजणी

गुजरातच्या 15 व्या विधानसभेच्या 182 जागांसाठी 1 आणि 5 डिसेंबर असं दोन टप्प्यात मतदान झालं. पहिल्या टप्प्यात 89 जागांवर तर दुसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान झाले. आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे. एक्झिट पोलमध्ये भाजपला विजय मिळू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गुजरातमध्ये 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 99 तर कॉग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. तर दोन जागांवर बीटीपी आणि एका जागा राष्ट्रवादी तर तीन जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले होते. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला 16 जागांवर फटका तर काँग्रेसच्या 16 जागा वाढल्या होत्या. या निवडणुकीत आपनं भाजप आणि काँग्रेसला थेट आव्हान दिल्यानं कोणाची डोखं दुखी वाढणार अशी चर्चा आहे. 

हिमाचल प्रदेश विधानसभेच्या 68 जागांसाठी 12 नोव्हेंबरला मतदान झाले. गेल्या 37 वर्षापासून भाजप आणि कॉंग्रेसला अलटून पालटून सत्ता मिळाली आहे. एक्झिट पोलनुसार भाजप सत्तेच्या जवळ असल्याचं सांगितलं जातंय. तरीही दोन्ही पक्षात काटे की टक्कर होईल असा अंदाज आहे.

शरद पवारांनी दिलेला 48 तासांचा अल्टीमेटम आज संपणार? पवार काय करणार?

कन्नड रक्षण वेदिके या संघटनेकडून महाराष्ट्राच्या बसेसवर दगडफेक करण्यात आल्यानंतर राज्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यावर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत 24 तासात हल्ले थांबवा अन्यथा पुढच्या 48 तासात माझ्यासह महाराष्ट्रातील सर्व खासदारांना बेळगावच्या नागरिकांना धीर देण्यासाठी जावं लागेल असं वक्तव्य केलं होतं. पवारांच्या या वक्तव्यामुळे गेल्या 24 तासात राष्ट्रवादीकडून राज्यभर पडसाद उमटत होते. पवारांनी दिलेला अल्टिमेटम आज संपणार आहे. 

महाविकास आघाडीचे खासदार दिल्लीत अमित शाहंची भेट घेणार

महाराष्ट्र-कर्नाटस सीमावादावर आज मविआचे खासदार केंद्रीय गृहमंत्री अमित शाहंची भेट घेणार आहेत. खासदार सुप्रिया सुळेंनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी 12.40 मिनिटांनी ही भेट होणार आहे. या शिष्टमंडळात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे खासदार असणार आहेत.

आज पिंपरी बंदची घोषणा 

महाराष्ट्रातील सर्व महापुरुषाच्या वारंवार होणाऱ्या अवमानाबद्दल आज पिंपरी चिंचवड शहरांमध्ये बंद पुकरण्यात आला आहे. छत्रपती संभाजीराजे दुपारी 12.30 वाजता पिंपरी चौक येथे उपस्थित रहाणार आहेत.

अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर आजही सुनावणी सुरूच 

अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर आजही हायकोर्टात युक्तिवाद सुरू राहणार आहे. आज दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण होऊन हायकोर्ट आपला निकाल राखून ठेवण्याची शक्यता आहे. सीबीआयचा देशमुखांना जामीन देण्यास जोरदार विरोध आहे. 

उद्धव ठाकरे यांच्या मालमत्तेशीची संबंधित याचिकेवर आज सुनावणी 

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांनी बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप करत हायकोर्टात दाखल याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. सीबीआय आणि ईडी चौकशीची मागणी गौरी भिडे यांनी दाखल केलेल्या याचिकेत करण्यात आली आहे. 

21:09 PM (IST)  •  08 Dec 2022

महाराष्ट्रात देवेंद्र बोले आणि महाराष्ट्र चाले असे परिस्थिती - सुषमा अंधारे

चंद्रकांत बावनकुळे यांनी संजय राऊत चितावणीकर भाषण देतात असा आरोप केला होता याबाबत बोलताना सुषमा अंधारे यांनी बावनकुळे साहेब जर असं नाही बोलले तर त्यांचा प्रदेशाध्यक्ष पद जाऊ शकतो ..महाराष्ट्रात देवेंद्र बोले आणि महाराष्ट्र चाले असे परिस्थिती आहे.. त्यामुळे बावनकुळे यांनी असच बोलले पाहिजेत.. भाजपा सुडाचे राजकारण करतेय ...तुम्ही काही बोलला तर आम्ही तुमच्यावर खोटं केसेस दाखल करू शकतो.. बावनकुळेंच्या बोलण्याचा मला फार काही विशेष वाटत नाही, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. 

17:53 PM (IST)  •  08 Dec 2022

कोल्हापूर : जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या 9 व 12 डिसेंबरच्या अभ्यागत भेटी रद्द

कोल्हापूर : प्रशासकीय कारणास्तव जिल्हाधिकारी राहुल रेखावार उद्या शुक्रवारी व सोमवारी 12 डिसेंबर रोजी अभ्यागतांना भेटू शकणार नाहीत. या दिवशीच्या अभ्यागत भेटी रद्द करण्यात आल्याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

17:47 PM (IST)  •  08 Dec 2022

Kagal MIDC Accident : कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत भीषण अपघातात 4 गंभीर जखमी

Kagal MIDC Accident : कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये किर्लोस्कर आँईल इंजिन्ससमोर झालेल्या भीषण अपघातात 4 गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी दुपारी आज हा अपघात झाला. लक्ष्मी टेकडी ते जवाहर साखर कारखाना रोडवर किर्लोस्कर आँईल इंजिन्ससमोर सांगाव फाट्यानजीक मोटरसायकल व कारची धडक होऊन हा अपघात झाला. जखमींमधील दोघांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. अन्य दोघांना खासगी रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार सोनुकुमार व पंकजकुमार अशी दोघा जखमींची नावे आहेत. 

17:45 PM (IST)  •  08 Dec 2022

Uddhav Thackeray : येत्या 17 डिसेंबरला मविआचा विराट मोर्चा : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : येत्या 17 तारखेला महाराष्ट्रद्रोहींच्या विरूद्ध हल्लाबोल असा हा महाप्रचंड अतिविराट मोर्चाची सुरुवात होईल असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषदे दरम्यान म्हणाले. हा मोर्चा जिजामाता उद्यानापासून सुरु होऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत होईल असेही ते म्हणाले. ज्याप्रमाणे सातत्याने महाराष्ट्राचा अपमान केला जातोय. महाराष्ट्राचं जणू काही अस्तित्व नाकारण्यात येत आहे. एका बाजूने महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न होतोय. या संदर्भातील अनेक मुद्दे मोर्चात घेतले जाणार आहेत असे उद्धव ठाकरे म्हणाले.

16:28 PM (IST)  •  08 Dec 2022

मावळचे माजी आमदार दिगंबर बाळोबा भेगडे यांचं निधन

मावळचे माजी आमदार दिगंबर बाळोबा भेगडे यांचं आज (8 डिसेंबर)दुपारी दीडच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले,. ते 75 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्राला मोठा धक्का बसला.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 10 OCT 2024 : 10 PM : ABP MajhaZero Hour Ratan Tata:रतन टाटांच्या 'नॅनो' कारची गोष्ट... Dr Raghunath Mashelkarयांनी सांगितला किस्साMumbai Rain : मुंबई आणि परिसरात परतीच्या पावसाची जोरदार हजेरीZero Hour Ratan Tata : रतन टाटांना मरणोत्तर भारतरत्न द्या, राज्य सरकारची केंद्राला विनंती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
Ratan Tata: राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही
पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही
Ratan Tata : रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 'टाॅवर ऑफ सायलेन्स' सोडून विद्युत दाहिनीचाच पर्याय का निवडण्यात आला?
रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 'टाॅवर ऑफ सायलेन्स' सोडून विद्युत दाहिनीचाच पर्याय का निवडण्यात आला?
Embed widget