Maharashtra Live Updates: ओडिशातील अपघाताची घटना दुर्दैवी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Odisha Train Accident: ओडिशा प्रकरणाची चौकशी व्हावी - शरद पवार
ओडिशातील बालासोर या ठिकाणी झालेल्या अपघातावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ओडिशा प्रकरणाची चौकशी व्हावी, जे गुन्हेगार असतील, त्यांची चौकशी करावी, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.
Odisha Train Accident : ओडिशातील अपघाताची घटना दुर्दैवी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली
ओडिशातील बालासोर या ठिकाणी झालेल्या अपघातावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही अपघाताची घटना दुर्दैवी असून हा आघात सहन करण्यासाठी ईश्वराने त्यांच्या आप्तस्वकीयांस बळ द्यावे व जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी ही प्रार्थना अशी श्रद्धांजली मुख्यमंत्र्यांनी वाहिली आहे.
ओडिशामधील बालेश्वरजवळ शालिमार चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेचे वृत्त क्लेशदायक आहे. या अपघातात बळी पडलेल्या दुर्दैवी प्रवाशांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली. हा आघात सहन करण्यासाठी ईश्वराने त्यांच्या आप्तस्वकीयांस बळ द्यावे व जखमींच्या…
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 2, 2023
Tatyarao Lahane : तात्याराव लहाने यांचा राजीनामा मंजूर, नवी नियुक्ती करण्याचे सरकारचे आदेश
जेजे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या संपानंतर आता डॉ. तात्याराव लहाने यांचा राजीनामा राज्य सरकारने मंजूर केला आहे. या ठिकाणी तात्काळ नवी नियुक्ती करण्याचे राज्य सरकारने आदेश दिले आहेत.
Odisha Railway Accident: पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडिशाच्या बालासोरमध्ये दाखल
Odisha Railway Accident: ओडिशाच्या बालासोरमध्ये झालेल्या रेल्वे अपघाताच्या घटनास्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहचले असून घटनास्थळाची पाहणी करत आहेत. तसेच पंतप्रधान कटकच्या रुग्णालयात जाऊन जखमींची भेट देखील घेणार आहेत.
Odisha Railway Accident: ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांच्या वारसांना 10 लाख रुपये आणि गंभीर जखमींना दोन लाखांची मदत जाहीर
Odisha Railway Accident: ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांच्या वारसांना 10 लाख रुपये आणि गंभीर जखमींना दोन लाखांची मदत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केली आहे. अपघातातील किरकोळ जखमींना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
Ex-gratia compensation to the victims of this unfortunate train accident in Odisha;
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) June 2, 2023
₹10 Lakh in case of death,
₹2 Lakh towards grievous and ₹50,000 for minor injuries.