(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Live Updates : वायर तुटल्याने हार्बर लाईनवर गेल्या 10 मिनिटापासून रेल्वे वाहतूक ठप्प
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
शुक्रवारी राज्यातील 147 बाजार समित्यांमध्ये मतदान झालं. त्यापैकी 95 समित्यांची मतमोजणी आज होणार आहे. 34 बाजार समित्यांची मतमोजणी शुक्रवारीच झाली आहे. त्यामध्ये राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. या निवडणुका म्हणजे राज्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची रंगीत तालीम असल्याचं सांगितलं जातंय.
चंद्रपूर - सोयाबीन, भाजीपाला, तूर, चना, फळासाठी - राजकीय प्रतिष्ठेच्या लढती - खासदार बाळू धानोरकर विरुध्द माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारॉपंढरपूर बाजार समिती मतमोजणी - विद्यमान सत्ताधारी प्रशांत परिचारक गटाने 5 जागा बिनविरोध जिंकल्या असून आज 13 जागांवर मतमोजणी होत आहे . भाजपचे प्रशांत परिचारक याना राष्ट्रवादीचे भगीरथ भालके , कल्याण काळे आणि गणेश पाटील गटाने छुपा पाठिंबा दिल्याने निवडणूक एकतर्फी होत आहे . सत्ताधारी परिचारक यांच्या विरोधात विट्ठल सहकारी साखर कारखाना अध्यक्ष अभिजित पाटील आणि मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी आव्हान दिले आहे . वार्षिक 480 कोटींची उलाढाल असणाऱ्या पंढरपूर बाजार समितीमध्ये डाळिंब आणि बेदाणा सौदे मोठ्या प्रमाणात होत असतात.
पंढरपूर आणि अकलूज - बाजार समिती मतमोजणी - विद्यमान सत्ताधारी प्रशांत परिचारक गटाने 5 जागा बिनविरोध जिंकल्या असून आज 13 जागांवर मतमोजणी होत आहे . भाजपचे प्रशांत परिचारक याना राष्ट्रवादीचे भगीरथ भालके , कल्याण काळे आणि गणेश पाटील गटाने छुपा पाठिंबा दिल्याने निवडणूक एकतर्फी होत आहे . सत्ताधारी परिचारक यांच्या विरोधात विट्ठल सहकारी साखर कारखाना अध्यक्ष अभिजित पाटील आणि मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी आव्हान दिले आहे, अकलूज बाजार समिती मध्ये सत्ताधारी मोहिते पाटील विरुद्ध राष्ट्रवादी , काँग्रेस आणि मोहिते विरोधक अशी लढत होत आहे . यामध्ये सत्ताधारी विजयसिंह मोहिते पाटील पॅनल विरुद्ध त्यांचे पुतणे डॉ धवालसिंह मोहिते पाटील यांचे पॅनल अशीच लढत.
छत्रपती संभाजी नगर-- या बाजार समितीत एवढे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत भाजप आमदार हरिभाऊ नाना बागडे विरुद्ध काँग्रेसचे माजी आमदार विक्रम काळे अशी लढत, वैजापूर----शिंदे गट भाजप विरुद्ध भाजप दुसरा गट, ठाकरे गट, काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र.आमदार शिंदे गट रमेश बोरणारे विरुद्ध माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर अशी लढत , कन्नड----एकूण 5 पॅनल निवडणूक लढवत आहेत.सर्वधिक 86 उमेदवार या निवडणुकीत उभे आहेत.उद्धव ठाकरे शिवसेनेचे विद्यमान आमदार उदयसिंह राजपूत विरुद्ध नुकताच बी आर एस मध्ये गेलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव अशी लढत या निवडणुकीत पाहायला मिळेल,या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य भाजप चे किशोर पवार यांच्या नेतृत्वातील पॅनल ची सुद्धा मोठी लढत होऊ शकते.
बारसू रिफायनरी संबंधित पालकमंत्री उदय सामंत बैठक घेणार
रत्नागिरी - रिफायनरी विरोधात स्थानिक आक्रमक झाल्यानंतर आज पालकमंत्री उदय सामंत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार आहेत आणि या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहेत – सकाळी 8.30 वाजता अमोल लाईव्हला असेल. ( तसचं 201 आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात , 164 महिला आणि 37 पुरुषांचा समावेश , राजापूरच्या न्यायालयात आज हजर करणार )
राहुल गांधींच्या आव्हान याचिकेवर आज गुजरात उच्च न्यायालयात सुनावणी
अहमदाबाद - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर आज गुजरात उच्च न्यायालयात सुनावणी होईल. सुरत सत्र न्यायालयाने मानहानीच्या खटल्यात राहुल यांना दोषी ठरवण्याला स्थगिती देण्यास नकार दर्शवला. त्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका राहुल यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. कर्नाटकमध्ये मागील लोकसभा निवडणुकीतील (2019) प्रचारावेळी राहुल यांनी मोदी आडनावाविषयी टिप्पणी केली. त्याबद्दल गुजरातमधील भाजपचे आमदार पुर्णेश मोदी यांनी राहुल यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला. त्याप्रकरणी सुरतमधील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने राहुल यांना दोषी ठरवले. त्यांना दोन वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द झाली होती
Mumbai Local: वायर तुटल्याने हार्बर लाईनवर गेल्या 10 मिनिटापासून रेल्वे वाहतूक ठप्प
हार्बर लाइनवर बांद्रा ते सांताक्रूझ दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने पूर्णपणे हार्बर लाइनची रेल्वे सेवा बंद पडली आहे. हार्बर लाइनची ट्रेन बंद पडल्याने सध्या मोठ्या संख्येने प्रवासी ट्रेन मधून उतरून पटरीवरून प्रवास करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते गोरेगाव स्टेशन पर्यंत हार्बर लाईनची रेल्वे सेवा पूर्णपणे बंद पडली आहे.
Nanded News: नांदेड जिल्ह्यात जमावबंदी आणि शस्त्रबंदीचे आदेश
Nanded News: नांदेड जिल्ह्यात जमावबंदी आणि शस्त्रबंदीचे आदेश दिले आहेत. 3 मेच्या मध्यरात्रीपर्यंत जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत
Pune News: पुण्यातील नदी सुधार प्रकल्पाला विरोध करण्यासाठी पर्यावरण प्रेमींकडून चिपको आंदोलन
Pune News: पुण्यातील नदी सुधार प्रकल्पाला विरोध करण्यासाठी पर्यावरण प्रेमींकडून चिपको आंदोलन करण्यात येणार आहे. पुण्यातील मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पात जी झाडं तोडण्यात येणार आहेत. त्या विरोधात पुण्यातील पर्यावरणप्रेमी आज चिपको आंदोलन करणार आहेत. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर सायंकाळी 5 वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे..
Barsu Protest: बारसूबाबत उदय सामंत यांची आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
Barsu Protest: बारसूबाबत उदय सामंत यांची आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली आहे. आजच्या बैठकीला रिफायनरी विरोधक जाणार नाही मागण्या मान्य केल्याशिवाय चर्चा करणार नाही, आंदोलक भूमिकेवर ठाम आहेत. उदय सामंत कालच्या आंदोलनाची सविस्तर माहिती घेणार आहेत