Maharashtra Live Updates: वर्धा: टँकरची दुचाकीला धडक,माय-लेकीचा जागीच मृत्य; बाजारवाडा फाट्याजवळील अपघात
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
आज नीति आयोगाची बैठक, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार
दिल्लीत आज होणाऱ्या नीति आयोगाच्या बैठकीला सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्र शासित प्रदेशाचे राज्यपाल सहभागी होणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारमधील संघर्षामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी या बैठकीवार बहिष्कार टाकलाय. पंतप्रधान जर सुप्रीम कोर्टाचे आदेश जुमानत नसतील तर सामान्य लोकांनी न्यायासाठी कोणाकडे जायचं असं केजरीवाल म्हणतायत. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, तेलंगनाचे मुख्यमंत्री केसीआर, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे या बैठकीला उपस्थित रहाणार नाहीत.
जेजुरी विश्वस्त निवडीचा वाद...स्थानिकांचे उपोषण सुरू
जेजुरी मंदिराच्या श्री मार्तंड देवसंस्थानच्या विश्वस्तपदाच्या निवडीचा वाद चिघळण्याची शक्यता आहे 7 पैकी केवळ एकच स्थानिक विश्वस्ताची निवड, तर सहा जण बाहेरगावचे विश्वस्त नेमल्याने आक्षेप. विश्वस्तांची निवड प्रक्रिया गेली सहा महिने सुरु होती. या विश्वस्त पदावर जेजुरीतील स्थानिकांची निवड करावी अशी मागणी ग्रामस्थांची आहे. चार दिवसांपूर्वी पुणे धर्मादाय आयुक्त कार्यालयाने नवीन विश्वस्त मंडळ जाहीर केली आणि वादाला सुरूवात झाली. स्थानिक या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. सरकारला जाग आणण्यासाठी वाघ्या मुरळ्यांचा कार्यक्रम ठेवण्यात आलाय
नागपूरातल्या चार मंदिरात आजपासून वस्त्र संहिता
आजपासून नागपुरातील चार मंदिरात वस्त्र संहिता लागु महाराष्ट्र मंदिर महासंघानी घेतलाय. पहिल्या महिन्यात नागपुरातील 25 तर राज्यभरातील 300 मंदिरांमध्ये ही वस्त्र संहिता लागू करण्याचा प्रयत्न महासंघाकडून करण्यात येणार. मंदिरात अंगप्रदर्शन, असभ्य, अशोभनीय आणि तोकडे कपडे घालून प्रवेश करण्यास या संहिते अतर्गत मनाई आहे गोपाळ कृष्ण मंदिर, धनतोली, संकटमोचन पंचमुख हनुमान मंदिर, बेलोरी, ब्रहस्पती मंदिर, कोन्होलीबारा, दुर्गामाता मंदिर, हिलटॉप मंदिरात आजपासून वस्त्र संहिता.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आज वाढदिवस
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांच्या घरी आयोजित कार्यक्रमाला देशभरातून त्यांचे चाहते भेटायला येतात. सकाळी 9 वाजल्यापासून नितीन गडकरी हे समर्थकांच्या भेटीगाठी घेत असतात.
स्वराज्य भवन'चा भव्य लोकार्पण सोहळा
पुणे येथे स्वराज्य संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन छत्रपती संभाजीराजे यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेचे राज्य मध्यवर्ती कार्यालय पुणे शहरात साकारण्यात आले असून, शिवाजीनगर येथे असलेल्या या कार्यालयाचा भव्य लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या लोकार्पण सोहळ्यानंतर बालगंधर्व सभागृह येथे छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन होणार आहे.
Mumbai Fire: ब्रीच कँडी रुग्णालयाजवळील इमारतीला आग
Mumbai Fire: ब्रीच कँडी रुग्णालयाजवळील इमारतीच्या बाराव्या मजल्यावर आग लागली असून धुराचे लोट दूरवर पसरत आहेत.
Nashik News: मालेगाव: बसमध्ये झाली चोरी, बस पोलीस स्थानकाच्या दारी; मालेगाव येथील प्रकार
Nashik: सोन्याची पोत व पैसे बसमध्ये चोरी झाल्याचे महिला प्रवाशानी सांगितल्यानंतर रस्त्यावर धावणारी बस थेट नाशिकच्या मालेगाव मधील ' छावणी ' पोलिसात दाखल झाली..नाशिकच्या मालेगाव बस स्थानक येथून सटाणा येथे प्रवाशांना घेवून जाणारी बस मोसमपुल येथून नवीन प्रवाशी गाडीत चढल्यानंतर गाडी पुन्हा सटाण्याच्या दिशेने धावू लागली..तेव्हा हा प्रकार घडला
मविआ सरकारने बुलेट ट्रेन, मेट्रो कारशेड सारख्या प्रकल्पांना ब्रेक लावला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
मविआ सरकारने बुलेट ट्रेन, मेट्रो कारशेड सारख्या प्रकल्पांना ब्रेक लावला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
Niti Aayog Meeting: मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाबाबत निती आयोगाच्या बैठकीत उल्लेख केला आणि केंद्राकडे मदत करण्याची मागणी केली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
Niti Aayog Meeting: मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाबाबत निती आयोगाच्या बैठकीत उल्लेख केला आणि केंद्राकडे मदत करण्याची मागणी केली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
Chandrapur News: चंद्रपूर: वाघोली-बुटी परिसरात धुमाकूळ घालणारी वाघिण आज अखेर जेरबंद; ग्रामस्थांवर केला होता हल्ला
Chandrapur News: चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील वाघोली-बुटी परिसरात धुमाकूळ घालणारी वाघिण आज अखेर जेरबंद करण्यात आली आहे. गेल्या २० दिवसात या वाघिणीच्या हल्ल्यात २ महिलांचा मृत्यू झाला आहे. गावाजवळील शेतशिवारात ग्रामस्थांवर हल्ला करणाऱ्या या वाघिणीला ठार करा अशी ग्रामस्थांची मागणी होती. त्यामुळे वनविभागाने सुमारे 50 ट्रॅप कॅमेरे आणि 100 कर्मचाऱ्यांसह वाघिणीसाठी शोधमोहीम राबविली होती. अखेर आज व्याहाड खुर्द जंगलात ही वाघिण आढळली. त्यानंतर वनविभागाने वाघिणीला डार्ट मारून बेशुद्ध केले आणि विशेष वाहनाने चंद्रपूरच्या शुश्रुषा केंद्रात रवाना केले. वैद्यकीय तपासणी करून वाघिणीला नैसर्गिक अधिवासात सोडणार असल्याची प्राथमिक माहिती वनविभागाच्या वतीने देण्यात आली आहे.