बुलढाणा शहरातील सोळंकी लेआउट भागात भीषण आग; अनेक घरांना लागली आग, 5 बाईक जळून खाक

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Jun 2023 11:34 PM
Sharad Pawar Gautam Adani: शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात अर्धा तास चर्चा; कोणत्या मुद्यांवर झाला खल?
Sharad Pawar Adani: शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात सिल्वर ओक येथे जवळपास अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. Read More
Buldhana News:  बुलढाणा शहरातील सोळंकी लेआउट भागात भीषण आग; अनेक घरांना लागली आग, 5 बाईक जळून खाक

Buldhana News:  बुलढाणा शहरातील सोळंकी लेआउट भागात भीषण आग...


अनेक घरांना लागली आग, 5 बाईक जळून खाक...


आमदार संजय गायकवाड यांनी जीव धोक्यात घालून आगीवर मिळवले नियंत्रण, अनेकांचे वाचवले प्राण...


एक इसम गंभीररित्या होरपळला , इसमाची प्रकृती चिंताजनक , जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू...

Buldhana News:  बुलढाणा शहरातील सोळंकी लेआउट भागात भीषण आग; अनेक घरांना लागली आग, 5 बाईक जळून खाक.

Buldhana News:  बुलढाणा शहरातील सोळंकी लेआउट भागात भीषण आग...


अनेक घरांना लागली आग, 5 बाईक जळून खाक...


आमदार संजय गायकवाड यांनी जीव धोक्यात घालून आगीवर मिळवले नियंत्रण, अनेकांचे वाचवले प्राण...


एक इसम गंभीररित्या होरपळला , इसमाची प्रकृती चिंताजनक , जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू...

मराठवाड्यातील बाळांसाठी आईच्या दुधाची पहिली बँक छत्रपती संभाजीनगरमध्ये; नवजात शिशूंसाठी ठरणार नवसंजीवनी
Milk Bank : छत्रपती संभाजीनगर शहरात मराठवाड्यातील पहिली मानवी दूध बँक स्थापन करण्यात आली आहे. Read More
Adani Meets Sharad Pawar: शरद पवार यांच्या भेटीसाठी उद्योजक गौतम अदानी 'सिल्वर ओक'वर दाखल
Sharad Pawar: उद्योजक गौतम अदानी हे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर दाखल झाले आहेत. Read More
Sharad Pawar:शरद पवार वर्षा बंगल्यावर का दाखल झाले? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच सांगितले
Sharad Pawar meet CM Eknath Shinde:  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवार यांच्या भेटीबाबत स्पष्टच सांगितले. Read More
Nanded: धरणांतून दररोज एक दलघमी पाणी होतेय कमी, आठवड्यात तब्बल साडेआठ दलघमी पाण्याची घट
Nanded News : ही घट अशीच वाढत राहिली तर पाणी टंचाईचे चटके ही वाढण्याची भीती देखील व्यक्त करण्यात आली आहे.  Read More
Sharad Pawar: CM शिंदे यांच्या भेटीसाठी शरद पवार वर्षा बंगल्यावर दाखल; चर्चांना उधाण
Sharad Pawar meet CM Eknath Shinde: शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. Read More
Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत.

'काय बी करा पण भविष्यात पॉवरमध्येच राहा...', भाजप नेते सुभाष देशमुखांची प्रणिती शिंदेंना 'साद'
Subhash Deshmukh On Praniti Shinde : सोलापुरातल्या एका कार्यक्रमात बोलताना माजी पालकमंत्री सुभाष देशमुखांनी हे वक्तव्य केल्यानंतर आता राजकीय क्षेत्रात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.  Read More
Sangli News:  सांगली शहरासह जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पाऊस..
Sangli News:  सांगली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले. यामुळे सांगली जिल्ह्यातील अनेक भागाला तळ्याचे स्वरूप आले होते. मुसळधार आणि वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडल्याने अनेक दुकाने आणि वाहनांचे नुकसान झाले. पहिल्याच अवकाळी पावसाने मात्र सांगली मिरजेच्या जनतेची त्रेधा उडाली. आज सकाळपासून वातावरणात प्रचंड उष्मा होता. यामुळे सांगलीकर हैराण झाले होते. त्यातच दिवसभर वातावरण ढगाळ असल्याने सायंकाळी पाऊस बरसणार अशी शक्यता होती. सायंकाळी 5 वाजता अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. मध्यवर्ती बस स्थानकात झाडं उन्मळून एका पान टपरीवर पडल्याने मोठे नुकसान झाले. याचबरोबर सांगलीत अनेक ठिकाणी पाण्याचे डोह साचल्याने या पाण्यातून वाहनधारकांना वाहने काढावी लागली. 
Landslide : कोकणातील 1050 गावांना दरडीचा धोका; केंद्र व राज्यशासनाचा 10 हजार कोटींचा आराखडा
Landslide in konkan: कोकण विभागातील पुराचा धोका असलेला, दरड कोसळण्याचा धोका असलेल्या गावांच्या पुनर्वसनासाठी केंद्र आणि राज्य सरकारने 10 हजार कोटींचा आराखडा तयार केला आहे. Read More
दारू विक्रेत्यांवर दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असतील तर कारागृहात रवानगी होणार; 'हातभट्टीमुक्त गाव मोहीम'
Jalna Crime News : अंदाजे 1 कोटी 10 लाखांपेक्षा जास्तीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Read More
MHADA : म्हाडाकडून मुंबईतील 15 इमारती अतिधोकादायक असल्याचं जाहीर, 545 भाडेकरुंना घरं सोडण्याचे निर्देश 
मुंबई शहरातील 15 अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची यादी जाहीर म्हाडाने जाहीर केली असून त्यामध्ये गेल्या वर्षी जाहीर करण्यात आलेल्या सात इमारतींचा समावेश आहे. Read More
काय सांगता! 16 किलो काजूसह 10 किलो बदामावर चोरट्यांनी मारला ताव; घटना सीसीटीव्हीत कैद
Chhatrapati Sambhaji Nagar : या प्रकरणात दुकानदाराने दिलेल्या तक्रारीनुसार चोरट्यांच्या विरोधात सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. Read More
Police Viral Video : आला की घाल खिशात! पोलिसांच्या वसुलीचा व्हिडीओ अंबादास दानवेंकडून ट्वीट
Police Viral Video : पोलिसांकडून कशाप्रकारे वसुली सुरु असते याचा व्हिडीओ देखील दानवे यांनी ट्वीट केला आहे. Read More
Maharashtra SSC Result 2023 Live : प्रतीक्षा संपली! उद्या दहावीचा निकाल, दुपारी एक वाजता होणार जाहीर

Maharashtra SSC Result 2023 Live : प्रतीक्षा संपली! उद्या दहावीचा निकाल, दुपारी एक वाजता होणार जाहीर. Read More

Pankaja Munde : मी भाजपची आहे, पण भाजप पक्ष माझा थोडीच आहे; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Pankaja Munde : भीती न वाटणं हे आमच्या रक्तातच असल्याचं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. Read More
Chhatrapati Sambhaji Nagar: धक्कादायक! घरमालकांकडून विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला, छत्रपती संभाजीनगर हादरलं
Chhatrapati Sambhaji Nagar : घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची माहिती घेतली असल्याचे समोर येत आहे.  Read More
Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा दोन गटात राडा, पोलिसात गुन्हा दाखल; गावात शांतता
Chhatrapati Sambhaji Nagar : शुल्लक कारणावरून झालेला  वाद होता आणि सध्या सर्वत्र शांतता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  Read More
HSC Exam Scam : बारावी परीक्षेच्या 'हस्ताक्षर घोटाळा' प्रकरणी पोलीस 'त्या' 372 विद्यार्थ्यांनाचा जबाब नोंदवणार
HSC Exam Handwriting Scam: बारावीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिकेत दोन हस्ताक्षर आढळून आलेल्या प्रकरणात रोज नवनवीन घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. Read More
खासदार प्रीतम मुंडेंचा भाजपला घरचा आहेर; कुस्तीपटूंची घेतली बाजू, कुस्तीगीरांशी संवाद साधायला कोणीच गेलं नाही, व्यक्त केली खंत
BJP MP Pritam Munde: एक महिला म्हणूनही मला त्या महिला खेळाडूंबद्दल आस्था आहे. असे आरोप जेव्हा होतात, तेव्हा त्याची वेळेवर चौकशी व्हायला हवी होती, असं भाजप खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या. Read More
Nepal PM India Visit: नेपाळचे पंतप्रधान आज मोदींची भेट घेणार; व्यापारासह सीमा समस्यांवरही चर्चा होणार
Nepal PM India Visit: डिसेंबर 2022 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर प्रचंड यांचा हा पहिलाच द्विपक्षीय परदेश दौरा आहे. चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल 'प्रचंड' गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. Read More

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 


Rules Changing From 1 June 2023: आजपासून बदलणार 'हे' महत्त्वाचे नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम


Rules Changing From 1 June 2023: आजपासून नवा महिना सुरू होत आहे. अशातच जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच अनेक बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला तेल कंपन्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) किमतींत बदल करतात. यासोबतच पीएनजी (PNG) आणि सीएनजीच्या (CNG) किमतीही बदलल्या जाऊ शकतात. यामुळे या निर्णयांचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. जाणून घेऊयात आजपासून बदलणार असलेल्या नियमांबद्दल... 


1. गॅस सिलेंडर, CNG आणि PNG च्या किमतींत बदल 


तेल कंपन्या दर महिन्याला एलपीजी (LPG), सीएनजी (CNG) आणि पीएनजीच्या (PNG) किमती बदलतात. गेल्या दोन महिन्यांबद्दल बोलायचं झालं तर एप्रिल आणि मे महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या होत्या. त्याचबरोबर एलपीजी सिलेंडरच्या किमती स्थिर आहेत. जूनमध्ये तेल कंपन्या गॅसच्या किमतींत काही बदल करू शकतात.


2. 100 दिवस 100 पेमेंट मोहीमेला सुरुवात 


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं अनक्लेम्ड रक्कम परत करण्यासाठी 100 दिवस 100 पेमेंट मोहीम सुरू केली आहे. याद्वारे RBI नं बँकांना प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक बँकेतील किमान 100 अनक्लेम्ड डिपॉजिट ठेवी ग्राहकांना 100 दिवसांच्या आत परत करण्याचे निर्देश दिले आहेत. याद्वारे आरबीआय इनअॅक्टिव आणि अनक्लेम्ड रकमेची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. 


3. इलेक्ट्रिक टू व्हीलर महागणार


जर तुम्ही या महिन्यात इलेक्ट्रिक टू व्हीलर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिशाला चाप बसणार आहे. 1 जूनपासून इलेक्ट्रिक स्कूटर्स महाग होणार आहेत. अवजड उद्योग मंत्रालयानं 21 मे 2023 रोजी एक अधिसूचना जारी केली होती की, सरकार आता या वाहनांवरील अनुदान कमी करणार आहे. यापूर्वी या वाहनांवर 15,000 रुपये प्रति किलोवॅट अनुदान उपलब्ध होतं, ते आता 10,000 रुपये करण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत, जून 2023 पासून, या इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीचा खर्च 25,000 ते 30,000 रुपयांनी महाग होणार आहे.


LPG Gas Cylinder Price: LPG गॅसच्या दरांत मोठी घट; व्यावसायिक सिलेंडर 83.5 रुपयांनी स्वस्त, पाहा Latest Rates


LPG Cylinder Price Reduce: एलपीजी गॅसच्या किमतींत (LPG Gas Cylinder Price) मोठी घट झाली आहे. एलपीजी (LPG) विकणाऱ्या कंपन्यांनी दर स्वस्त केले आहेत. व्यावसायिक एलपीजी गॅसच्या किमतीतही (Commercial LPG Cylinder) कपात झाली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर (Cylinder Price) पूर्वीप्रमाणेच आहेत. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यापूर्वी 1 मे 2023 रोजी व्यावसायिक गॅसच्या किमतींत 172 रुपयांनी कपात करण्यात आली होती. दरम्यान, आता 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 1773 रुपये मोजावे लागणार आहेत. पूर्वी हाच सिलेंडर 1856.50 रुपयांना मिळत होता.


नवी दिल्लीत व्यावसायिक गॅसची किंमत 83.5 रुपयांनी कमी झाली असून ती आता 1773 रुपयांवर पोहोचली आहे. त्याचबरोबर घरगुती गॅस सिलेंडरचा दर 1103 रुपयांवर कायम आहे. गेल्या महिन्यात व्यावसायिक गॅसचा दर 1856.50 रुपये प्रति सिलेंडर होता. त्याचबरोबर घरगुती गॅस सिलेंडरचा दर 1103 रुपयांवर कायम आहे. 1 जूनपासून, बदललेल्या व्यावसायिक गॅस सिलेंडर दिल्लीमध्ये 1773 रुपयांना विकला जात आहे. आणि 1 जून रोजी कोलकातामध्ये 1875.50 रुपयांना मिळत आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.