Maharashtra SSC Result 2023 Live : प्रतीक्षा संपली! उद्या दहावीचा निकाल, दुपारी एक वाजता होणार जाहीर
Maharashtra SSC Result 2023 Live : प्रतीक्षा संपली! उद्या दहावीचा निकाल, दुपारी एक वाजता होणार जाहीर
Maharashtra SSC Result 2023 : दहावीच्या निकालाची धाकधूक असणाऱ्या सर्व विद्यार्थी पालकांसाठी उद्याचा दिवस महत्वाचा असणार आहे. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहवीच्या परीक्षेचा निकाल उद्या, म्हणजेच 2 जून 2023 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. उद्या दुपारी एक वाजता हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे, त्याचप्रमाणे 'एबीपी माझा'च्या संकेतस्थळावरही दहावीचा निकाल सर्वात आधी पाहता येणार आहे. यंदा निकालाची प्रत डाऊनलोड करण्याचा ऑप्शन देखील 'एबीपी माझा'च्या साईटवर देण्यात आला आहे.
Maharashtra SSC Result 2023 : कुठे पाहणार निकाल
बोर्डाने निकाल जाहीर केल्यानंतर, विद्यार्थ्यांना तो ABP Majha वर पाहता येणार आहे. त्यासाठी MH10.ABPMajha.Com लिंकवर क्लिक करा. निकाल जाहीर झाल्यानंतर या लिंकवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन, झटपट कोणत्याही अडथळ्याविना निकाल पाहता येणार आहे. निकालाची वाट विद्यार्थी उत्सुकतेने पाहत आहेत. निकालाची पत्रकार परिषद सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आलीय उद्या दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत होत आहे. यंदा 23 हजार 10 शाळांमधील 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. परंतु मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी तब्बल 61 हजार 708 ने कमी झाली आहे.
Maharashtra SSC Result 2023 : एबीपी माझाच्या वेबसाईटवर दहावीचा निकाल पाहण्यासाठी खालीली स्टेप्स फॉलो करा
स्टेप 1 : सर्वात आधी एबीपी माझाच्या वेबसाईटवर लॉन ऑन करा.
स्टेप 2 : दहावीच्या निकालाच्या बॅनरवर क्लिक करा.
स्टेप 3 : तुमच्यासमोर एक नवं पेज ओपन होईल, तिथे असलेल्या बॉक्समध्ये तुमचा सीट नंबर टाका.
स्टेप 4 : त्याखालच्या बॉक्समध्ये तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा (उदा. आईचं नाव SONALI असेल तर तुम्हाला SON लिहावं लागेल)
स्टेप 5 : एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
स्टेप 6 : निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI