एक्स्प्लोर

खासदार प्रीतम मुंडेंचा भाजपला घरचा आहेर; कुस्तीपटूंची घेतली बाजू, कुस्तीगीरांशी संवाद साधायला कोणीच गेलं नाही, व्यक्त केली खंत

BJP MP Pritam Munde: एक महिला म्हणूनही मला त्या महिला खेळाडूंबद्दल आस्था आहे. असे आरोप जेव्हा होतात, तेव्हा त्याची वेळेवर चौकशी व्हायला हवी होती, असं भाजप खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या.

BJP MP Pritam Munde on Wrestler Protest : देशाला जागतिक स्तरावर पदकं मिळवून देणाऱ्या कुस्तीपटूंनी सध्या देशातील व्यवस्थेविरोधातच बंड पुकारल्याचं दिसतंय. कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे (Wrestling Federation of India) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. याच प्रकरणावरुन आता महाराष्ट्रातील भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे (BJP MP Pritam Munde) यांनी स्वतःच्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. तसेच, यासंदर्भात बोलताना सरकारकडून कुस्तीगीरांशी संवाद साधायला कोणीच गेले नसल्याची भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी खंत व्यक्त केली आहे. 

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी आंदोलन छेडलं आहे. भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी मात्र यावर प्रतिक्रिया देऊन कुस्तीपटूंना समर्थन दिलं आहे. खेळाडूंच्या तक्रारीची दखल घेतली जात नसेल तर लोकशाहीत ते स्वागतार्ह नाही असं मुंडे म्हणाल्या. खेळाडूंच्या बाजूनं बोलणाऱ्या प्रीतम मुंडे या भाजपमधल्या पहिल्याच नेत्या आहेत. आतापर्यंत कुणाही मंत्र्यानं किंवा खासदारानं आंदोलक कुस्तीपटूंना पाठिबा दर्शवलेला नाही. 

प्रीतम मुंडेंचा भाजपला घरचा आहेर 

देशभर गाजत असलेल्या महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाच्या विषयात भाजपच्या बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी मोदी सरकारला घराचा आहेर दिला आहे. या प्रकरणात त्या खेळाडूंशी संवाद साधायला सरकारकडून कोणी गेले नाही, ही खेदाची बाब आहे. सरकारनं खेळाडूंशी संवाद साधायला हवा होता, अशी स्पष्ट भूमिका प्रितम मुंडे यांनी घेतली आहे.

बीड शहरात आयोजित पत्रकार परिषदेत प्रीतम मुंडे बोलत होत्या. महिला खेळाडूंशी संबंधित प्रश्नावर बोलताना खासदार मुंडे यांनी "केवळ खासदारच नाही तर एक महिला म्हणूनही मला त्या महिला खेळाडूंबद्दल आस्था आहे. असे आरोप जेव्हा होतात, तेव्हा त्याची वेळेवर चौकशी व्हायला हवी होती, यातील सत्य समोर यायला हवं होतं. सरकारकडून त्या महिला खेळाडूंशी संवाद साधायला कोणीच गेलं नाही. ते व्हायला हवं होतं. या प्रकरणात योग्य ती कारवाई व्हायला हवी.", असं खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या. 

पाहा व्हिडीओ : भाजप खासदार प्रीतम मुंडेंचा कुस्तीपटूंना पाठिंबा, भाजपला घरचा आहेर 

फक्त सहा हजार रुपये शेतकऱ्याला देणं हा सन्मान नाही : प्रीतम मुंडे 

6000 रुपये देणं हा शेतकऱ्यांचा सन्मान नाही ही संकल्पना चुकीची आहे, असं म्हणत खासदार प्रीतम मुंडे यांनी सरकारच्या सन्मान योजनेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आज पिकाची जी अवस्था आहे ती मनुष्याच्या हातातली नाही, मानव नवनिर्मित नाही, निसर्गामुळे होणाऱ्या आपत्तीमुळे जागतिक मार्केटवर परिणाम होतो. त्यामुळे शेतीमालाचा भाव घसरतोय. यात दोष फक्त भारत सरकारचा नाही, जे शेतकरी थकलेले आहेत, त्यांच्यासाठी ही योजना आहे. फक्त शेतकऱ्यांना सन्मान देण्यासाठी आम्ही काम केलं, त्यांचा सन्मान व्हावा 6000 घ्या आणि गपचूप बसा, असा त्यांचा अर्थ होत नाही, असं म्हणत आपली चूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर सारवा सरव देखील केली.  

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Raj Thackeray : कुस्तीपटूंची फरफट थांबवा, देशाच्या मुलींना (देश की बेटियाँ) न्याय द्या; राज ठाकरेंचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
Embed widget