Maharashtra live updates : केंद्रीय मंत्री अमित शाह सह्याद्रीवर, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह बैठक सुरू
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
15th April Headlines : आज मुंबईसह राज्यात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री आज रात्री मुंबईत दाखल होणार आहेत. भाजप नेत्यांसोबत त्यांची बैठक पार पडणार आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने ही महत्त्वाची बैठक असणार आहे. तर, मुंबईतील मालवणीत सामाजिक एकतेसाठी मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. श्रीराम नवमीच्या दिवशी या भागात दोन गटात वाद झाला होता.
मुंबई
- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज रात्री मुंबईत दाखल होणार आहेत. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, त्यासाठी शाह मुंबईत दाखल होणार आहेत. भाजपच्या महत्वाच्या नेत्यांसोबत अमित शहांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक आहे. या बैठकीत अमित शहा घेणार मिशन 45 चा आणि मुंबई महानगर पालिका निवडणुकीचाही आढावा घेणार आहेत.
- कर्नाटक निवडणुकीच्या अनुषंगाने आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक... राष्ट्रवादीच्या कर्नाटकातील पदाधिकाऱ्यांसोबत अध्यक्ष शरद पवार सकाळी चर्चा करणार आहेत.
- मुंबई सेंट्रल चे नामकरण नाना शंकर शेठ मुंबई टर्मिनस करा ! मागील दहा वर्षापासून मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकर शेठ मुंबई टर्मिनस नामकरण करण्यासाठी रेल्वे दिनाचे औचित्य साधून राज्य आणि केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मूक निदर्शने नाना चौकात करण्यात येणार आहेत.
- मालाड-पश्चिम विधानसभा क्षेत्राचे आमदार अस्लम शेख हे आज मालवणी, मालाड-पश्चिम येथून निघणाऱ्या सर्वधर्मिय 'मूक मोर्चा'त सहभागी होणार आहेत. मालाड- मालवणीतील शांतता, ऐक्य, सलोखा अबाधित रहावा यासाठी सर्वधर्मीय नागरीक, 60 पेक्षा जास्त स्वयंसेवी संस्था, व्यापारी, दुकानदार हजारोंच्या संख्येने या 'मूक मोर्चा'त सहभागी होणार आहेत.
पुणे
- पुण्याच्या मधोमध असलेली वेताळ टेकडी फोडून तीन बोगदे करण्याचा पुणे महापालिकेचा विचार आहे. मात्र पुण्यातील नागरिक, सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांकडून या प्रकल्पला जोरदार विरोध करण्यात येतोय. त्यासाठी शनिवारी संध्याकाळी पाच वाजता वेताळ बाबा चौक ते बालभरती चौकापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात हजारो नागरिक सहभागी होणार आहेत.
- बारामती लोकसभा मतदारसंघात शिवसेना-शिंदे गटाची जाहीर सभा होणार आहे. शिवसेना-शिंदे गटाचे उपनेते विजय शिवतारे आणि सांगोल्याचे खासदार शहाजी पाटील हे नीरा नरसिंहपूर येथे सभा घेणार
नागपूर
- महाविकास आघाडीची उद्या नागपूरात वज्रमुठ सभा पार पडणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते सभेला संबोधित करणार आहेत. या सभेची तयारी अंतिम टप्यात आली आहे.
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रचर कॉर्पोरेशन लिमिटेड कडून विदर्भात बांधण्यात आलेल्या सहा उड्डाणपुलाचे उद्घाटन आणि पूर्व नागपूर व पश्चिम नागपूरला जोडणाऱ्या महत्वाच्या अजनी अजनी रेल्वे पुलाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
यवतमाळ
- शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी 11 वाजता उत्सव मंगल कार्यालयात शिवसेनेच्या ठाकरे गटाचा पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
रत्नागिरी
- भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आहेत.
Amit Shaha Mumbai Visit: केंद्रीय मंत्री अमित शाह सह्याद्रीवर, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह बैठक सुरू
केंद्रीय मंत्री अमित शाह सह्याद्रीवर दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे अमित शाह यांच्या सोबतच्या बैठकीसाठी उपस्थित राहिले आहेत.
Pune rain Update : पुण्यात पावसाला सुरुवात, पुढील तीन तास विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता
Pune rain Update : पुण्यात पावसाला सुरुवात झाली आहे. दिवसभर उकाडा जणवत होता. या उकाड्यापासून पुणेकरांची अंशत: सुटका झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार विजांच्या क़डकडाटासह तीन तास पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यासह नाशिक, नगर आणि साताऱ्यातदेखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. सकाळी ऊन, रात्री गारठा आणि संध्याकाळी पाऊस पडत असल्याने अनेकांच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे.
आदित्य ठाकरे यांची आज संध्याकाळी पाच वाजता पत्रकार परिषद
Mumbai Fire: मुंबईच्या साकीनाका परिसरातील टिळक नगर परिसरामध्ये भीषण आग
Mumbai Fire: मुंबईच्या साकीनाका परिसरातील टिळक नगर परिसरामध्ये भीषण आग लागली आहे. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.