एक्स्प्लोर

Maharashtra Live Updates : येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर, अन्य प्रकरणांमुळे तुरुंगातच राहावे लागणार

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Live Updates : येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर, अन्य प्रकरणांमुळे तुरुंगातच राहावे लागणार

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

आजच्या दिवसात अनेक महत्त्वाच्या घडामोडी होणार आहेत.

नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. आजही राज्यभरात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. किरकोळ महागाई दराचे आकडे आज केंद्र सरकारकडून जारी केले जाणार आहेत. आयपीएलमध्ये चेन्नई आणि राजस्थान यांच्यात लढत होणार आहे. तसेच इतर अनेक महत्वाच्या घटना घडणार आहेत. जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी..

नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर सुनावणी -

नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. वैद्यकीय कारणासाठी नवाब मलिकांनी दाखल केलेला जामीन मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळल्याच्या निर्णयाला मलिकांनी हायकोर्टात आव्हान दिलं आहे. त्यावर हायकोर्टात विशेष सुनावणी सुरू आहे. नियमित कामकाज संपल्यावर दुपारी 4:30 वाजता सुनावणी सुरु होणार आहे. 

किरकोळ महागाई दराचे आकडे आज केंद्र सरकारकडून जारी केले जाणार आहेत.


मुंबई – किरकोळ महागाई दराचे आकडे आज केंद्र सरकारकडून जारी केले जाणार आहेत. मागील दोन महिने बघता महागाई दर आरबीआयच्या टॉलरन्स बॅंडच्या वर बघायला मिळाला आहे. आरबीआयकडून पहिल्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो रेट स्थिर ठेवले आहेत. त्यामुळे मार्च महिन्यातील महागाईचे आकडे वर गेल्यास पुन्हा एकदा व्याजदरवाढीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे मार्च महिन्याचा किरकोळ महागाई दर किती राहतो हे बघणं महत्त्वाचे असणार आहे.  

पुणे – पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात सावरकर गौरव यात्रा

पिंपरी – सुप्रिया सुळे भोर वेल्हा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत.

रत्नागिरी – सावरकर गौरव यात्रेत मंत्री उदय सामंत सहभागी होणार आहेत. 

विधान परिषद विरोधी पक्षनेते आबांदास दानवे आज निफाड तालुक्यातील नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. चांदोरी, टाकळी, विंचूर भागात कांदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. 

चंद्रपूर – 4 दिवसीय बहुजन समता पर्वात आज शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सहभागी होणार आहेत. 
 
मुंबई – कर्नाटकच्या निवडणुका लागल्यात. त्यामुळे महाराष्ट्र भाजपचे स्टार प्रचारक कर्नाटकला जाणार आहे. भाजपने याबाबत सहा जणांची एक यादी जाहीर केली. या निवडणुकीसाठी भाजपने देशातील तब्बल 54 बड्या नेत्यांची फौज तयार केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा मोठ्या नेत्यांचा समावेश आहे अशी माहिती मिळत आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार राम शिंदे, जयकुमार रावल, योगेश सागर, प्रसाद लाड यांचा समावेश आहे. 

 मुंबई – वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रचंड यशानंतर आता आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस भारतीय प्रवाशांना मिळणार आहे. सध्या धावत असलेल्या वंदे भारत एक्सप्रेस या चेअर कार म्हणजेच बसून प्रवास करणाऱ्या डब्यांच्या होत्या. मात्र भारतीय रेल्वे दिलेल्या नवीन एका ऑर्डर नुसार झोपून प्रवास करता येतील अशा स्लीपर क्लास वंदे भारत एक्सप्रेस बनवण्यात येणार आहेत. तब्बल 80 स्लीपर क्लास वंदे भारत एक्सप्रेसची ऑर्डर देण्यात आली आहे.  

  नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी. वैद्यकीय कारणासाठी नवाब मलिकांनी दाखल केलेला जामीन मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळल्याच्या निर्णयाला मलिकांनी हायकोर्टात आव्हान दिलं आहे. त्यावर हायकोर्टात विशेष सुनावणी सुरू आहे. नियमित कामकाज संपल्यावर दुपारी 4:30 वाजता सुनावणी सुरु होणार आहे.

23:15 PM (IST)  •  12 Apr 2023

Nagpur News: नागपूर: तीन वर्षीय मुलावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, मुलगा जखमी

Nagpur News: नागपूरात तीन वर्षीय मुलावर भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला केल्याची घटना घडली आहे. मुलाच्या आईने  लगेच कुत्र्यांचा हल्ला पाहत तिथे धाव घेतल्यामुळे मुलगा बचावला आहे. या घटनेत डूग्गु दुबे नावाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनमोल नगरात आज दुपारी घडली. कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे..

22:06 PM (IST)  •  12 Apr 2023

Vasai News: दिल्ली, चेन्नई, ठाणे, वसई-विरार येथे 100 हून अधिक सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत इराणी चोराला वसई पोलिसांकडून अटक

Vasai News:  दिल्ली, चेन्नई, ठाणे, वसई-विरार येथे 100 हून अधिक सोनसाखळी चोरी करणारा सराईत इराणी चोराला वसईच्या क्राईम युनिटनं मोठ्या शिताफिने अटक केली आहे. कल्याणच्या आंबिवली येथून इराणी चोराला अटक करणं मोठं जिकरीचं काम असतं. चार वेळा ट्रॅप लावूनही गळाला न लागलेला हा सराईत चोर अखेर पोलिसांच्या हाती लागला. याच्यावर मकोका सारखे दोन गंभीर गुन्ह्यांस दुखापती जबरी चोरी सारखे 21 गुन्हे ठाण्यात नोंद आहेत. तर 7 गुन्हे वसई विरार हद्दीत आहेत.

20:41 PM (IST)  •  12 Apr 2023

Yes Bank Scam: येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर, अन्य प्रकरणांमुळे तुरुंगातच राहावे लागणार

Yes Bank Scam:  येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर

एचडीआयएलला 900 कोटींचं अनियमित कर्ज दिल्याच्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन 

मात्र राणांविरोधात अन्य काही प्रकरण अद्याप प्रलंबित अससल्यानं तूर्तास मुक्काम जेलमध्येच राहणार

20:14 PM (IST)  •  12 Apr 2023

Weather Forecast: एप्रिलच्या महिन्यातच उन्हाच्या झळा; विदर्भातला पारा चढला, राज्यातील अनेक जिल्ह्यातील तापमान चाळीशी पार

एप्रिलच्या महिन्यातच उन्हाच्या झळा; विदर्भातला पारा चढला, अनेक जिल्ह्यातील तापमान चाळीशी पार 

उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात देखील तापमान चाळीशी पार 

चंद्रपुरात 42.2अंश सेल्सिअस तर ब्रह्मपुरीत देखील पारा 42 वर 

अमरावतीत पारा 41.4 अंशांवर तर अकोल्यात 41.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद 

यवतमाळ 41, वर्धा 41.1, नागपूर 39.4, गोंदिया 40.4 तर वाशिम जिल्ह्यात 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद 

जळगावात 41.7 अंश, सोलापूर 41.3 अंश सेल्सिअस, बीडमध्ये 40.2, परभणीत 40.7 तर औरंगाबादेत 39.2 अंश सेल्सिअस

पुणे 38.8, कोल्हापूर 38.7, सातारा 39.3, सांगली 38.6 आणि अहमदनगरमध्ये 39.4 कमाल तापमानाची नोंद

17:43 PM (IST)  •  12 Apr 2023

Hasan Mushriff : हसन मुश्रीफांची अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात धाव, मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टानं जामीन फेटाळण्याच्या निर्णयाला दिलं आव्हान

हसन मुश्रीफांची अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात धाव

मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टानं जामीन फेटाळण्याच्या निर्णयाला दिलं आव्हान

उद्या 13 एप्रिलला होणार तातडीची सुनावणी

मुंबई सत्र न्यायालयानं ईडीच्या प्रकरणात मुश्रीफ यांना 14 एप्रिलपर्यंत दिलंय अटकेपासून संरक्षण

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलंSatej Patil On Madhurima Raje Withdrawn : आता वाद निर्माण करायचा नाही, कालच्या विषयावर पडदा टाकतोABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Maharashtra Vidhansabha election 2024: काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
Embed widget