Maharashtra News LIVE Updates : चौथ्या टप्प्यातील निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Background
Maharashtra News LIVE Updates : चौथ्या टप्प्यातील निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत.. १३ मे ला नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड या राज्यातील लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच उमेदवार आपली सर्व शक्ती पणाला लावून प्रचार करणार आहेत.. सायंकाळी 6 वाजता प्रचारांच्या तोफा थंडावणार आहेत.
Mumbai Goa Highway: मुंबई गोवा हायवेवर 10 किमी पर्यंतच्या रांगा
Mumbai Goa Highway: उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबईकर चाकरमानी सुट्टीसाठी गावी जात असल्याने मुंबई गोवा हायवेवर सकाळपासून वाहनांच्या जवळजवळ 10 किमी पर्यंतच्या रांगा लागल्या आहेत, माणगाव ते इंदापूर दरम्यान मुंबई गोवा हायवेवर सकाळपासून ट्रॅफिक जॅम आहे.
Raj Thackeray: राज ठाकरेंनी घेतली हर्षवर्धन पाटलांची भेट
Raj Thackeray: राज ठाकरेंनी हर्षवर्धन पाटलांची भेट घेतली. पुण्यातील निवासस्थानी हर्षवर्धन पाटील कुटुंबीयांची भेट घेतली. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची माहिती आहे.
Raj Thackeray: राज ठाकरेंनी घेतली हर्षवर्धन पाटलांची भेट https://t.co/qKeD2xdAGL #rajthackeray pic.twitter.com/WMQZWuTj9J
— ABP माझा (@abpmajhatv) May 11, 2024























