Maharashtra News LIVE Updates : देश विदेशातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
पत्राचाळ पुनर्विकास घोटाळा प्रकरण! प्रवीण राऊतांसह इतर भगिदारांची मालमत्ता ईडीकडून जप्त
पत्राचाळ पुनर्विकास घोटाळा प्रकरण
प्रवीण राऊत यांच्यासह इतर भगिदारांची पालघर, दापोली, रायगड आणि ठाणे येथील मालमत्ता ईडीकडून जप्त
73.62 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता ईडीनं तात्पुरती जप्त केली आहे
आतापर्यंत या प्रकरणात 116.27 कोटी रूपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे
पीएमएलए कायदा 2002 च्या तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आल्याचं ईडीकडून स्पष्ट
महावितरणच्या महिला टेक्निशियन रिंकू पिटे यांच्यावर कोयत्याने वार
महावितरणच्या महिला टेक्निशियन रिंकू पिटे यांच्यावर कोयत्याने वार
बारामती तालुक्यातील मोरगाव येथील घटना
लाईट बिल जास्त येत आहे अशी तक्रार करून दखल न घेतल्याने आरोपीने केले वार
अभिजित पोते असे आरोपीचे नाव
प्रकृती चिंताजनक असल्याने महिला उपचारासाठी पुण्याला रवाना
धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवारांची मोडनिंबमध्ये जाहीर सभा
लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षाच्या बड्या नेत्यांच्या सभा सुरु आहेत. अशातच माढा लोकसभा (Madha Loksabha) मतदारसंघाची देखील जोरदार चर्चा सुरु आहे. शरद पवार (Sharad pawar) गटाकडून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणं धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel mohite patil) निवडणूक लढवत आहेत. मोहिते पाटलांच्या प्रचारासाठी आज माढा तालुक्यातील मोडनिंबमध्ये शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे.
सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघांसाठी महाविकास आघाडीच्या दिग्गजांच्या सभा
सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघांसाठी महाविकास आघाडीच्या दिग्गज्यांच्या सभा
माढा लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवार तर सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी राहूल गांधी घेणार सभा
सकाळी 11 वाजता मोडनिंब येथे शरद पवार यांची धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा
तर दुपारी 4 वाजता प्रणिती शिंदेच्या प्रचारासाठी राहूल गांधी सोलापुरात
राहूल गांधींच्या सभेसाठी सोलापुरात जय्यत तयारी, 40 हजार लोकांची आसनव्यवस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 3 दिवसांत 7 सभा, महाराष्ट्राकडे पंतप्रधानांचं विशेष लक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ३ दिवसांत ७ सभा
महाराष्ट्राकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विशेष लक्ष
२७, २९ व ३० एप्रिल रोजी मिळून ७ सभांचे नियोजन
पंतप्रधान नरेंद्र मोदींची २७ एप्रिलला कोल्हापूर येथे सभा
सोलापूर, सातारा व पुण्यात 29 एप्रिलला एकूण ३ सभांची मागणी
माळशिरस, धाराशिव व लातूर येथे ३० एप्रिलला ३ सभांचे नियोजन