एक्स्प्लोर

Bacchu Kadu : ठाणेदाराचा डबा, तहसीलदारांच्या घरी... राज्यमंत्री बच्चू कडूंची अशीही मेजवानी

संग्रामपूर तहसीलदार सिद्धेश्वर वरनगावकर यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन डब्यातील साधं भाकरी आणि भाजी , मिरचीचा ठेचा हे जेवण केलं. यावेळी पुन्हा एकदा राज्यमंत्री बच्चू कडू यांचा साधेपणा समोर आला.

बुलढाणा : आज शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) हे जळगाव जामोद - संग्रामपूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत.  दौऱ्यात उशीर झाल्याने व जवळपास दुपारचे अडीच वाजल्याने मंत्री महोदयाना भूक लागली.यावेळी त्यांच्या बंदोबस्तात असलेल्या ठाणेदार महोदयांच्या डब्यावर बच्चू कडू यांची नजर पडली आणि क्षणार्धात बच्चू कडू यांनी त्यांच्या गाडीतील तो डबा आपल्या हाताने काढून ठाणेदारांना विचारलं यात काय आहे..? त्यावेळी ठाणेदारांनी म्हटलं माझा डबा आहे आणि साधं जेवण आहे. बच्चू कडू यांनी तात्काळ ठाणेदारांना म्हटलं तुम्ही हॉटेलवर जेवा तुमचा डबा मी जेवणार आज....आणि जवळच असलेल्या संग्रामपूर तहसीलदार सिद्धेश्वर वरनगावकर यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन डब्यातील साधं भाकरी आणि भाजी , मिरचीचा ठेचा हे जेवण केलं. यावेळी पुन्हा एकदा राज्यमंत्री बच्चू कडू यांचा साधेपणा समोर आला.

बच्चू कडूंचा साधेपणा आणि नेहमी चर्चेत असणे...!

बच्चू कडू हे अत्यंत साध्या गरीब कुटुंबातील असल्याने त्यांचं राहणीमान नेहमी कायम साधे आहे.  आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांशी जुळलेले असतात. त्यामुळे ते कधीही स्वतःला राज्यमंत्री म्हणून वावरत नाहीत , बिनधास्त राहणीमान ही त्यांची ओळख आहे.म्हणून त्यांनी कधीही बडेजावपणा केला नाही , त्यांचा साधेपणाचा प्रत्यय नेहमी येत असतो. विशेषतः ते कुठल्याही दौऱ्यावर असताना कधी शेतात दगड मारून बोर तोडणे , कधी शेतकाऱ्यांसोबत बांधावर जेवण करणे आणि त्यांच्या या साधेपणाची मग नेहमी चर्चा होत असते.


Bacchu Kadu : ठाणेदाराचा डबा, तहसीलदारांच्या घरी... राज्यमंत्री बच्चू कडूंची अशीही मेजवानी

 प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राज्यमंत्री बच्चू कडू ( Bacchu kadu ) हे आपल्या आगळ्या वेगळ्या आंदोलनाच्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतात. राज्य मंत्री झाल्यानंतरही बच्चू कडू यांच्यातील हा वेगळेपणा आजही कायम आहे. बच्चू कडू हे त्यांच्या हटके शैलीबद्दल राज्यभरात प्रसिद्ध आहेत. या आधीही त्यांनी शेतकरी, दिव्यांग, कामगार आणि तळगाळातील कार्यकर्त्यांच्या घरी जेवणाचा आस्वाद घेतला आहे.

कडक शब्दात कान उघाडणी 

राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू  जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे प्रशासकीय आढावा बैठकीत भुसावळ नगरपालिकेतील मुख्याधिकाऱ्यांकडून   कामाचा आढावा घेतला.आढावा घेत असताना त्यांना अनेक बाबी सांगता आल्या नाहीत,एवढेच काय तर गोर गरीब जनतेसाठी त्यांनी अनेक योजना राबवलेल्या नाही हे लक्षात आल्यावर बच्चू कडू यांचा संताप चांगलाच अनावर झाला. यावेळी त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे.गरीब जनतेचे काम  न करणाऱ्या तुमच्या सारख्या अधिकाऱ्यांना लाज वाटली पाहिजे,तुम्हाला लाथा घातल्या पाहिजेत अशा शब्दात बच्चू कडू यांनी राग व्यक्त केला 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावाUday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 20 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ladki Bahin Yojana : 2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत करावे लागणार?
2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत द्यावे लागणार?
Jalgaon Crime : लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Embed widget