एक्स्प्लोर

Maharashtra News : सलग चार दिवस सुट्ट्या, पर्यटनस्थळ फुललं; शेगाव, शिर्डीसह नाशिकच्या धार्मिक स्थळांवर भाविकांची गर्दी

Maharashtra News : सलग चार दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे राज्यातील तीर्थस्थळ आणि पर्यटन स्थळं गजबजली आहेत.

Maharashtra News : स्वातंत्र्यदिन (Independence Day) अवघ्या काही दिवसांवर आहे. यंदा स्वातंत्र्य दिनानिमित्त सलग चार दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची तसेच भक्तांची राज्यातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळतेय. राज्यातील धार्मिक स्थळं असोत किंवा पर्यटन स्थळं या ठिकाणी भाविक मनसोक्त सुट्टीचा आनंद घेताना दिसतायत.

शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर परिसरात भाविकांची गर्दी 

सलग चार दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे राज्यातील तीर्थस्थळ आणि पर्यटनस्थळं गजबजली आहेत. बुलढाण्यातील शेगाव येथील संत गजानन महाराज समाधी स्थळ आणि मंदिर परिसरात राज्यासह पर राज्यातील भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. सकाळ पासूनच भाविकांनी संत गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली असून दर्शनासाठी तब्बल तीन ते साडे तीन तास लागत आहेत. शेगावातील सर्व खाजगी हॉटेल्स आणि लॉज हाऊसफुल्ल झाली असून पुढील दोन दिवसांत ही गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे.  आज रविवार असल्याने राज्यासह मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातील भक्त ही शेगावात दाखल झाले आहेत.

शिर्डी सलग सुट्यांमुळे साई दर्शनासाठी भक्तांची गर्दी

सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटन स्थळांबरोबर धार्मिक स्थळांना देखील भाविकांची मोठी गर्दी होताना दिसतेय. पुढील चार दिवस सलग सुट्टी आहे. त्यामुळे शिर्डीत आज सकाळपासूनच भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. आज पहाटे काकड आरतीनंतर दर्शन रांगांमध्ये सुद्धा भक्तांची मोठी गर्दी दिसून येतेय. पंधरा मिनिटांत होणाऱ्या दर्शनाला आज तब्बल दोन ते तीन तास लागत असून साई भक्तांनी साई समाधीच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचे दिसून येतेय. साई भक्तांचे दर्शन सुकर व्हावं यासाठी साई संस्थांनी सुद्धा जय्यत तयारी केली असून गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची तुफान गर्दी

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची तुफान गर्दी उसळली आहे. पहाटेपासून मंदिराबाहेर जवळपास 300 मीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. उद्याचा दिवस सोडला तर सलगच्या सुट्ट्या आल्याने भाविकांसह पर्यटकांनी त्र्यंबकेश्वरला पसंती दिली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाची संततधार सुरू असल्याने अनेक धबधबेही प्रवाहित झाले आहेत. इथलं निसर्ग सौंदर्य अधिकच खुलून उठलं असून प्रत्येकजण या निसर्गाच्या प्रेमात पडतोय. याबरोबरच उत्तर भारतीयांचा श्रावण सध्या सुरू असल्याने परराज्यातील भाविक शंकराच्या दर्शनासाठी दाखल होतायत.

महत्त्वाच्या बातम्या :

Independence Day 2023 : 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमासाठी बारामतीच्या शेतकरी दाम्पत्याला निमंत्रण, राज्यातील 24 शेतकरी उत्पादक संघटना योजनेचे लाभार्थीही उपस्थित राहणार 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती
Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती
इंग्लंडचा ॲटकिन्सन : कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज!
इंग्लंडचा ॲटकिन्सन : कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज!
Tim Southee : कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या गोलंदाज टीम साऊथीनं केला षटकारांचा भीम पराक्रम; थेट गेलची बरोबरी, कॅलिसला पछाडले!
कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या गोलंदाज टीम साऊथीनं केला षटकारांचा भीम पराक्रम; थेट गेलची बरोबरी, कॅलिसला पछाडले!
IND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळं वाया? प्रेक्षकांना तिकिटाचे पैसे परत मिळणार का? जाणून घ्या
तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस पावसानं गाजवला, प्रेक्षकांसाठी गुड न्यूज, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hanuman Mandir Rada : दादरच्या हनुमान मंदिराबाहेर ठाकरेंचे शिवसैनिक, भाजप आमनेसामनेSanjay Raut On Hanuman mandir : मंदिराला हात लावून दाखवा मग शिवसेनेचं हिंदुत्व दाखवतोAjit Pawar Topi : भूमिपूजनाला टोपी नाही, अजितदादांनी थेट पुजारी काकांचीच टोपी घेऊन स्वत:ला घातलीAaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती
Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती
इंग्लंडचा ॲटकिन्सन : कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज!
इंग्लंडचा ॲटकिन्सन : कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज!
Tim Southee : कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या गोलंदाज टीम साऊथीनं केला षटकारांचा भीम पराक्रम; थेट गेलची बरोबरी, कॅलिसला पछाडले!
कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या गोलंदाज टीम साऊथीनं केला षटकारांचा भीम पराक्रम; थेट गेलची बरोबरी, कॅलिसला पछाडले!
IND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळं वाया? प्रेक्षकांना तिकिटाचे पैसे परत मिळणार का? जाणून घ्या
तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस पावसानं गाजवला, प्रेक्षकांसाठी गुड न्यूज, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय
Shrikant Shinde : संविधानावरील चर्चेदरम्यान श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल, राहुल गांधी ताडकन उठले अन्...; संसदेत मोठा गदारोळ
संविधानावरील चर्चेदरम्यान श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल, राहुल गांधी ताडकन उठले अन्...; संसदेत मोठा गदारोळ
Aadhaar Card Update : आधार कार्ड मोफत अपडेटला पुन्हा मुदतवाढ, जाणून घ्या नवी डेडलाईन
आधार कार्ड एक रुपया न देता अपडेट करा, पुन्हा मुदतवाढ, जाणून घ्या शेवटची तारीख 
India vs Australia 3rd Test : गाबा कसोटीत पहिला दिवस पावसाने वाहून गेला, फक्त 80 चेंडूचा खेळ; पुढील चार दिवस काय होणार?
गाबा कसोटीत पहिला दिवस पावसाने वाहून गेला, फक्त 80 चेंडूचा खेळ; पुढील चार दिवस काय होणार?
Aaditya Thackeray : भाजपचं सरकार आल्यानंतर हिंदू मंदिरं धोक्यात, उद्धव ठाकरेंनी भाजपचं नकली हिंदुत्व केलं एक्स्पोज; आदित्य ठाकरे कडाडले
भाजपचं सरकार आल्यानंतर हिंदू मंदिरं धोक्यात, उद्धव ठाकरेंनी भाजपचं नकली हिंदुत्व केलं एक्स्पोज; आदित्य ठाकरे कडाडले
Embed widget