(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुख्यमंत्र्यांच्या वॉर-रूमवरून शिंदे आणि अजित पवारांमध्ये कोल्ड वॉर, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा दावा
महाराष्ट्रात 28 मंत्री आहेत. परंतु, सर्व पालकमंत्री नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांना ध्वजारोहण करावं लागतंय, हे दुर्दैवी आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलीय.
नागपूर: विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी महायुतीवर घणाघाती टीका करताना अजित पवारांच्या (Ajit Pawar) बैठकीचं निमित्त साधलंय. अजित पवारांनी वॉररूमध्ये बैठक घेतली. त्यामुळे मुख्यमंत्र्याच्या वॉर रूमवरून कोल्ड वॉर सुरू झाल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. मुख्यमंत्र्याच्या वॉर रूमवरून कोल्ड वॉर सुरू झाला आहे. कारण अधिकार नसताना उपमुख्यमंत्री अजित पवार वॉररूमध्ये बैठक घेतली.
खात्याचा संबंध नसताना वॉर रुमध्ये राज्यातील प्रोजेक्ट्सचा आढावा घेतला जातो. मुख्यमंत्र्यांना तो अधिकार आहे. मुख्यमंत्र्याच्या वॉर रूमवरून कोल्ड वॉर सुरू झाला आहे. कालच्या झालेल्या मंत्रालयाच्या बैठकीतून तो सगळ्यांना दिसला. तीन दिशेला तीन तोंडं आहेत. केवळ सत्तेसाठी एकमेकांकडे बघतात मलिदा खायचं असेल तर मिळून खातात पण जनतेच्याा, महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी यांना वेळ नाही. राज्यात जे सुरू आहे ते सगळं हास्यस्पद आहे. पालकमंत्र्याचा पत्ता नाही, मंत्रिमंडळ विस्तार व पालकमंत्री नियुक्ती रखडल्या आहेत. 28 मंत्री कार्यरत आहेत. 28 मंत्री 28 जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून जाऊ शकले असते आणि जनतेला न्याय देऊ शकले असते. परंतु तिथे पालकमंत्री नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांना ध्वजारोहण करावं लागतंय, हे दुर्दैवी आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलीय.
केंद्र सरकारने केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठीच्या समितीत बदल केले आहेत. यावर देखील विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, या देशातील निवडणुका निष्पक्ष, निष्पक्ष, पारदर्शी पद्धतीनं होण्यासाठी सुप्रीम कोर्टाने सरन्यायाधीशांची नियुक्ती केली होती. परंतु केंद्र सरकारने यामध्ये बदल करत सरन्यायाधीशांना वगळून ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याचा समावेश केला आहे. आता पंतप्रधानानी मंत्र्यांचे नाव सुचवावं म्हणजे जी मंडळी त्या ठिकाणी बसणार आहेत,ज्यांची निवड करण्यात त्याची निवड निष्पक्षपणे होणार नाही.
मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या वॉर रुम बाजूला सारून नवीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिटची स्थापना केली. या युनिटच्या माध्यमातून अजित पवार राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांचा दर 15 दिवसांतून आढावा घेणार आहे. या युनिटची पहिली बैठक मंत्रालयात गुरुवारी पार पडली असून या बैठकीला मंत्रालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी आणि मुख्यमंत्री वॅार रुमचे सर्वेसर्वा राधेश्याम मोपलवार ही उपस्थित होते.
हे ही वाचा :