(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आपलं राजकीय दुकान चालवण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी नामांतराची मागणी केली; जलील यांची टीका
Imtiyaz Jaleel : खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
Imtiyaz Jaleel On Balasaheb Thackeray: औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या निर्णयानंतर राजकीय वातावरण देखील तापले आहे. एमआयएमने या निर्णयाला विरोध करत, रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. तर यावरूनच आज पत्रकार परिषेदत खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. आपलं राजकीय दुकान चालवण्यासाठी बाळासाहेबांनी नामांतराची मागणी केली होती, अशी टीका जलील यांनी केली आहे.
दरम्यान यावेळी बोलताना जलील म्हणाले की, कधीकाळी बाळासाहेब ठाकरे औरंगाबाद जिल्ह्यात आले आणि आपली राजकीय दुकान चालवण्यासाठी त्यांनी या शहराचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची मागणी केली. त्यांना या शहरात आपला गड बनवायचा होता, त्यामुळे त्यांनी असे विधान केले होते. तेव्हापासून गेल्या तीस-पसतीस वर्षांपासून यावरून घाणेरडे राजकारण करण्यात येत आहे. तर छत्रपती संभाजी महाराज यांना आमचा कधीच विरोध नव्हता आणि असणार देखील नाही. मात्र त्यांच्या नावाने सुरु असलेल्या राजकारणाला आमचा नक्कीच विरोध असणार असल्याचे जलील म्हणाले.
बिहारमधील औरंगाबाद तुम्हाला कसे चालतो
दरम्यान याच पत्रकार परिषदेत बोलताना जलील यांनी भाजपवर देखील तजोरदार टीका केली आहे. भाजपला माझा प्रश्न आहे की, महाराष्ट्रातील औरंगाबाद तुम्हाला चालत नाही, मात्र बिहारमधील औरंगाबाद तुम्हाला कसे चालतो. विशेष म्हणजे बिहारमधील औरंगाबाद शहराचे खासदार भाजपचे आहेत, असे जलील म्हणाले. तर भाजप दुट्टपी भूमिका घेत असल्याचं जलील म्हणाले.
फडणवीसांनी फोन करून विनंती केली...
औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णयाला जलील यांनी आज देखील विरोध केला. तसेच आपण जी-20 परिषेदच्या बैठक काळात आंदोलन करणार होतो असेही जलील म्हणाले. मात्र केंद्रीय मंत्र भागवत कराड, पोलीस आयुक्त निखील गुप्ता आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मला फोन आले. सद्या जी-20 निमित्ताने शहरात विदेशी पाहुणे आले असून, त्यामुळे या काळात कोणतेही आंदोलन न करण्याची त्यांनी विनंती केली. त्यामुळे आपण सद्या आंदोलन करणार नसल्याचे जलील म्हणाले. मात्र सद्या आंदोलन करत नसलो तरीही, जी-20 ची बैठक झाल्यावर आणि 27 मार्चच्या आधी आम्ही आंदोलन करू असे जलील म्हणाले. तर हे आंदोलन मोठ्याप्रमाणावर करणार असल्याचे देखील जलील म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
Imtiyaz Jaleel : इम्तियाज जलील यांनी आंदोलनाचा इशारा देताच फडणवीसांचा फोन, म्हणाले...