CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज छत्रपती संभाजीनगर दौरा; ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या कार्यक्रमाला लावणार हजेरी
Chhatrapati Sambhaji Nagar : विशेष म्हणजे या ठिकाणी जाहीर सभा देखील पार पडणार आहे. त्यामुळे यासाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.
CM Eknath Shinde in Chhatrapati Sambhaji Nagar : ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Chhatrapati Sambhaji Nagar District) कन्नड येथे आज शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे उपस्थित असणार आहे. यावेळी ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना अनेक शासकीय योजनांचे लाभ एकाच ठिकाणी मिळणार आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी जाहीर सभा देखील पार पडणार आहे. त्यामुळे यासाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा
- शुक्रवार, 26 मे रोजी सकाळी 11.40 वा. चिकलठाणा विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने क्रिडा संकुल कन्नड हेलिपॅडकडे प्रयाण.
- दुपारी 12.10 वा. क्रिडा संकुल कन्नड हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने पिरयानी फार्मकडे प्रयाण.
- दुपारी 12.15 ते 2.15 वा. शासन आपल्या दारी कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : पिरयानी फार्म, कन्नड, जि.औरंगाबाद)
- दुपारी 2.20 वा. पिरयानी फार्म, कन्नड येथून मोटारीने क्रिडा संकुल, कन्नड हेलिपॅडकडे प्रयाण.
- दुपारी 2.25 वा.क्रिडा संकुल, कन्नड हेलिपॅड येथे आगमन व हेलिकॉप्टरने मौजे जेऊर कुंभारी, ता.कोपरगाव जि.अहमदनगर हेलिपॅडकडे प्रयाण.
काय आहे ‘शासन आपल्या दारी’ अभियान?
‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत शासकीय योजनांच्या लाभांचे प्रमाणपत्र व कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळणार आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रशासन हे अभियान राबवत असुन यामध्ये महसुल, ग्रामविकास, कृषी, नगरविकास, कामगार, आदिवासी विकास, सैनिक कल्याण विभाग, वन विभाग, सहाकार विभाग, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, शालेय शिक्षण विभाग, उद्योग विभाग, महिला व बालविकास, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग आदि विभागांच्या योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात येणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावा निमित्त प्रत्येक जिल्ह्यातून 75 हजार लाभर्थ्यांना लाभ देण्यात येत असून यामध्ये प्रामख्याने आरोग्य, कृषी रोजगार यासारख्या विभागातील गरजू लाभर्थ्यांना एकाच छताखाली शासन सुविधा उपलब्ध करुन देत आहे. यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
थेट लाभार्थ्यांना योजनांचा लाभ
एका दिवसात शासन आपल्या दारी अभियानात औरंगाबाद जिल्हा प्रशासनाच्या वतीने एकाच ठिकाणी सर्व विभागाच्या योजनांची माहिती लाभ घेण्याची प्रक्रिया ते थेट लाभार्थ्यांना योजनांचा लाभ या अभियानातून मिळणार असल्याने नागरिकांनी या शासन आपल्या दारी अभियानात सहभागी होऊन संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन औरंगाबाद जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
...अन्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताफ्यात साप सोडू; संभाजीनगरच्या पँथर्स आर्मीचा इशारा