Karuna Sharma: आता बीडमध्येच घर घेतलंय, धनंजय मुंडेंना सोडणार नाही; करुणा शर्मांना अश्रू अनावर
Beed News: स्वतःच्या अनेक कार्यकर्त्यांना धनंजय मुंडे यांनी खोट्या गुन्ह्यात जेलमध्ये टाकले आहे: करुणा शर्मा
Beed News: करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी पुन्हा एकदा माजी मंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांच्यावर निशाणा साधला असून, मुंडेंना सोडणार नाही असा इशारा दिला आहे. गेल्या काही वर्षांपासून करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्यात वाद सुरु आहे. दरम्यान प्रकरण न्यायालयात पोहचले आहे. त्यातच आता करुणा शर्मा यांनी पुन्हा एकदा मुंडे यांच्यावर टीका केली आहे. आता मी बीडमध्ये घर घेतले असून, धनंजय मुंडे यांना सोडणार नसल्याचं करुणा शर्मा म्हणाल्या आहेत.
बीड येथे आलेल्या करुणा शर्मा माध्यमांशी बोलतांना म्हणाल्या की, गेल्यावर्षी याच बीडमध्ये मला एका खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले होते. त्यामुळे मी निर्णय घेतला असून, या घाणीत उतरूनच ही घाण साप करणार आहे. माझ्यावर जो अन्याय झाला आहे, त्याविरुद्ध येथे येऊन मी लढणार आहे. त्यासाठी मी बीडमध्ये घर खरेदी केला असून, धनंजय मुंडे यांना सोडणार नसल्याचं करुणा शर्मा यावेळी म्हणाल्यात.
पुढे बोलतांना त्या म्हणाल्यात की, धनंजय मुंडे यांच्या विरोधात लढण्यासाठी मी कंबर कसली असून, त्यांनी देखील आपली कंबर कसून घ्यावी असं करुणा शर्मा म्हणाल्या आहे. त्यामुळे आज बीडमध्ये घर घेतलं असून, बीडचे लोकं माझ्यासोबत आहे. बीडच्या जनतेने नेहमी न्याय दिला आहे. फक्त मलाच नाही तर आपल्या अनेक कार्यकर्त्यांना धनंजय मुंडे यांनी खोट्या गुन्ह्यात जेलमध्ये टाकले आहे. त्यामुळे ते सर्व लोकं माझ्यासोबत असल्याच देखील करुणा शर्मा म्हणाल्यात. दरम्यान यावेळी बोलतांना करुणा शर्मा यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
पोलीस भरती परीक्षेत पास होऊनही नियुक्ती नाही...
दरम्यान दोन दिवसांपूर्वी करुणा शर्मा यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस भरती परीक्षेत (Police Bharti Exam) पास होऊनही काही महिलांना नियुक्ती देण्यात आली नसल्याचं म्हंटलं होतं. नशिकमधील काही महिला मला येऊन भेटल्या असून, 2019 मध्ये वाहनचालकसाठी पोलीस भरती घेण्यात आली होती. यावेळी परीक्षेत पास होऊन देखील त्या महिला उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली नसल्याची त्यांची तक्रार असल्याचं करुणा शर्मा म्हणाल्या होत्या. त्यामुळे मुंबईतील आझाद मैदानात याबाबत आंदोलन केले जाणार असल्याची माहिती देखील शर्मा यांनी दिली होती.
मोठी बातमी! माजी आमदार हर्षवर्धन जाधवांवर महिलेला बेदम मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल