एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Thirty Thirty Scam : तीस-तीस घोटाळ्यातील आरोपीच्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिपमधील संपूर्ण संभाषण; न्यायालयीन कोठडीत पुरवला गेला मोबाईल

Thirty Thirty Scam: न्यायालयीन कोठडीत असताना देखील संतोष राठोड याला फोन करण्यासाठी कोणी मदत केली असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

Thirty Thirty Scam: राज्यात गाजलेल्या तीस-तीस घोटाळ्यातील मुख्य आरोप संतोष राठोड सध्या हर्सूल कारागृहात आहे. दरम्यान या प्रकरणी 'ईडी'कडून (ED) माहिती मागवण्यात आल्याची बातमी 'एबीपी माझा'ने गेल्या आठवड्यात दाखवली होती. मात्र याप्रकरणी संतोष राठोड यांनी न्यायालयीन कोठडीत असताना आपल्या नातेवाईकांशी फोनवरुन संभाषण केल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे आता कारागृह प्रशासन आणि औरंगाबाद शहर पोलिसांवर यावरुन प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. न्यायालयीन कोठडीत असताना देखील संतोष राठोड याला फोन करण्यासाठी कोणी मदत केली असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. या ऑडिओ क्लिपमधील संभाषण जसंच्या तसं...

संतोष राठोड यांच्यातील संपूर्ण संभाषण! 

एक व्यक्ती: हॅलो.... हा भाऊ कुठे आहेस? 

संतोषचा नातेवाईक: बिडकीनला 

एक व्यक्ती: एक मिनिट..

संतोष राठोड: राम राम भाऊ, बोला कुठं आहेस

नातेवाईक: बिडकीनला  
 
संतोष राठोड: कसे आहेत?
 
नातेवाईक: मजेत 

संतोष राठोड: काय चाललंय?

नातेवाईक: उद्याची वाट बघतोय

संतोष राठोड: उद्याची वाट पाहतोय

नातेवाईक: उद्या होऊन जाईल 

संतोष राठोड: गुड न्यूज चांगली राहील, हायकोर्टकडून बेल होईल 

संतोष: चालेल चालेल... 

नातेवाईक: शंभर टक्के चान्सेस आहे, उद्या बेल होईल

संतोष राठोड: चालेल चालेल... 

 नातेवाईक: इकडे वेगळीच अफवा झाली... ईडीने उचललं म्हणून

संतोष राठोड: काय ईडीने उचललं म्हणजे काय तोंडाचा खेळ आहे का? आले आणि घेऊन गेले... त्याची प्रक्रिया असते, कोर्ट ऑर्डर वगैरे सर्व

नातेवाईक: अरे तो पऱ्या, आणि तुमचा ज्ञानेश्वर यांनी अफवा केली आणि सर्व जण परेशान झाले आहेत. 
 
संतोष राठोड: भाऊ अरे तो प्रल्हाद मामा प्रत्येक तारखेला येऊन काही न काही करतो, ज्ञानेश्वरही वकिलाला बोलू देत नाही. 

नातेवाईक: मी त्यांना नीट करतो 

संतोष राठोड: भाऊ माझा एक मिनिट ऐका, मी काय म्हणतो... आज मी ज्या कंडिशन, पोझिशनमध्ये आहे. या कंडिशन, पोझिशनमध्ये कुणी कितीही काहीही कोर्टात येऊन बोलून भांडून, शिव्या दिल्या किंवा मारहाण करुन, जिवे जरी मारलं तरी माझ्याकडून काही होईल का? या परिस्थितीत
 
नातेवाईक: भाऊ काहीच होणार नाही 

संतोष राठोड: मग त्यासाठी या लोकांना आळा घाला, लबाड परल्या आणि ज्ञानेश्वर उगाच का त्रास देताय म्हणा?... तुमचे पैसे आहेत आमचे नाहीत का?

नातेवाईक: करतो मी सांगतो त्यांना.

संतोष राठोड: हाव ना, मला काय हौस आहे का आत राहण्याची?  मला पण बाहेर यायचं आहे ना.. आपण काय मधी राहणारे लोक आहोत का? 

नातेवाईक: भाऊ काही नाही 

संतोष राठोड: मग?  

नातेवाईक: भाऊ उद्याचे 100% खात्री आहे. 

संतोष राठोड: बरं बरं...

नातेवाईक: एखादी तारीख वाढेल आज जरा, जास्तच अडचण झाली मीडिया वाले वगैरे 

संतोष राठोड: ते मीडियाच तुमच्या लक्षात आलं का? एक काही भाग नाही त्यात, त्यात राजकारण गुसलंय 

नातेवाईक: हो, पण माझं पण नाव आहे त्यात 
 
संतोष राठोड: काय 

नातेवाईक: माझं पण नाव आहे

संतोष राठोड: बरं ते तुमचे भाजपा वाले लोकांनी उचललं तुमच्या शिवसेना वाल्याना 

नातेवाईक: हं बरं... 

संतोष राठोड: चालेल सर्वजण मिळून दाबून टाका तो विषय.

नातेवाईक: काही नाही आम्ही दाबलं ते काही अडचण नाही. फक्त आता तुम्ही बाहेर येऊन तुम्ही आम्हाला वाचवा.

संतोष राठोड: मला बाहेर काढा तुम्ही, (शिवी देऊन त्यांच्या*****) नाही पैसे दिले ना भाऊ तर काय म्हणावं तुम्हाला, ही गोष्ट किती वेळेस सांगितली तुम्हाला

नातेवाईक: या शब्दावरच जगतोय भाऊ 

संतोष राठोड: जगतोय नाही, तुम्हाला असं जीवदान देऊन टाकतो बाहेर आल्यावर, तुम्ही पण सांगायला पाहिजे खूप लोक बघितले, खूप लोक पाहिजे आयुष्यात, खूप लोकांच इतिहास ऐकले पण असा माणूस आणि असा इतिहास घडवणारा नाही बघितला कधी कुठे

नातेवाईक: भगवानच होऊन जाईल, आमच्या मते तुम्ही देवच होऊन जाताल.

संतोष राठोड: हाहा...

नातेवाईक: तुम्ही तरी मध्ये चांगले आहात, पण बाहेर माझे असे हाल होताय.

संतोष राठोड: हॅलो...

नातेवाईक: हं भाऊ...
 
संतोष राठोड: रेंज मध्ये या रेंज...

नातेवाईक: मी काय म्हणतो भाऊ, काही अडचण नाही, बाहेर आम्ही सर्व व्यवस्थित सांभाळलेलं आहे

संतोष राठोड:  बरं बरं...

नातेवाईक: पूर्ण वेळ काम करतोय

संतोष राठोड: बरं बरं...

नातेवाईक: माणिक मामा आणि आम्ही सोबतच आहोत. 

संतोष राठोड: बरं...

नातेवाईक: आम्ही उद्याच करतो आणि संपावतो... उद्याची खूप मोठी संधी आहे. उद्या होईल असं वाटतं

संतोष राठोड: हं हं...

नातेवाईक: एखादा दिवस किंवा एखादी तारीख पडते का? होईल म्हणून वाटतं

संतोष राठोड:  बरं ठीक आहे, बघा तुमच्या हिशोबाने कसं आणि काय आहे ते...

नातेवाईक: बाकी तर काही अडचण नाही ना? 

संतोष राठोड: अडचण येवढीच आहे, लबाड परल्या आणि ज्ञानेश्वर

नातेवाईक: चालेल चालेल मामाला बोला.. 

 संतोष राठोड: हं...

नातेवाईक (तिसरा नातेवाईक): हं भाऊ..

संतोष राठोड: राम राम मामा..

नातेवाईक (तिसरा नातेवाईक): कशी आहेत तब्बेत? 

संतोष राठोड: कुठे आहात... 

नातेवाईक (तिसरा नातेवाईक): इथेच आहे बिडकीला..
 
संतोष राठोड: कसे आहात काय चाललंय..

नातेवाईक (तिसरा नातेवाईक): आम्ही तर ठीक आहे, आम्ही काही मरत नाहीत.

संतोष राठोड: काय चाललंय, काय चाललंय...

नातेवाईक (तिसरा नातेवाईक): नातेवाईक एकदम मजेत तुमचे...

संतोष राठोड: पुन्हां तब्बेत कशी, तब्बेत कशी आहे. 

नातेवाईक (तिसरा नातेवाईक): एकदम (बढिया) चांगली!

संतोष राठोड: माझी पण तब्बेत चांगली आहे, पण तुमच्या भरोशावर बसलोय, बाहेर काढतील म्हणून. 

नातेवाईक (तिसरा नातेवाईक): बिलकूल,बिलकुल... हनुमान चाळीसाचा रात्रभर थोडंस जप कर, उद्या काम होतंय.

संतोष राठोड: बरं ठीक आहे, ठीक आहे... देवाची कृपा थोडीशी उटी लागली, तर काम होऊन जाईल आपलं 

संतोष राठोड: बघू नशीब किती साथ देतं आपलं.

नातेवाईक (तिसरा नातेवाईक): आज काय वेगळंच चालू झालंय.

संतोष राठोड: हाव ना.. कुठून लागली काय माहित.. काही घेणं न देणं नाही... वर्षांपासूनमध्ये बसलोय,  राजकारण गुसलंय मामा त्यात.

नातेवाईक (तिसरा नातेवाईक): हो ना, उद्या आहे आणि आज हे निघालं मध्येच

संतोष राठोड: जाणून बुजून मुद्दाम आपली तारीख बघून हा राडा मध्येचं टाकलंय त्यांनी...

नातेवाईक (तिसरा नातेवाईक): हो ना, हो ना... त्यामुळे काही अडचण येणार नाही, आम्ही बघितलं आणि मी आणि कृष्णाने..

संतोष राठोड: मीडियावाले असेच प्रकरण वाढवतात..

नातेवाईक (तिसरा नातेवाईक): मी आणि कृष्णा, बॉसकडे जाऊन आल्यापासून खूप खुश झालो होतो.

संतोष राठोड: हं हं.. चला मामा उद्या बघू नशीब काय करत ते?

नातेवाईक (तिसरा नातेवाईक): चालेल चालेल....

 संतोष राठोड: मामा मी काय म्हणतो, लबाड परल्या आणि ज्ञानेश्वरला थोडा आळा घाला...

नातेवाईक (तिसरा नातेवाईक): साले नालायक आहेत, सांगून सांगून थकलोय त्यांना... अक्कल नाही त्यांना.

संतोष राठोड: या परिस्थितीत कुणी कितीही बोललं, शिव्या दिल्या, मारहाण केली तर पैसे देणं होत नाही मामा.

नातेवाईक (तिसरा नातेवाईक): होना होना...

संतोष राठोड: प्रत्येक तारखेला तिथं  येतात आणि तीच भन भन.... अरे मला वकिलाला भेटून देत नाही, बोलून देत नाही... काय करतोय ते विचारू देत नाहीत मामा, काय करु मी 

नातेवाईक (तिसरा नातेवाईक): हं हं हं...

संतोष राठोड: मला म्हणतात, आम्ही काय करू, मी काय जीव देऊ जेल मध्ये...

नातेवाईक (तिसरा नातेवाईक): मी काय मैदानात आहे का? मैदानात असतो तर केलं असत.

संतोष राठोड: बिनडोक माणसं आहेत ती? 

नातेवाईक (तिसरा नातेवाईक): हो...

संतोष राठोड: तेवढ्या दोन लोकांना आळा घाला तुम्ही? 

नातेवाईक (तिसरा नातेवाईक): चालेल चालेल...

संतोष राठोड: जातोय मी मध्ये, आता ठेवतो.

नातेवाईक (तिसरा नातेवाईक): तब्बेतची काळजी घे, उद्या होऊन जाईल काम.

संतोष राठोड: चालेल चालेल मामा...

नातेवाईक (तिसरा नातेवाईक): हो हो... 

संतोष राठोड: चालेल चालेल...

नातेवाईक (तिसरा नातेवाईक):  हं भाऊ....(फ़ोन कट)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Waether Update: अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
Ajit Pawar: अजित पवारांवर दिल्लीत तिष्ठत बसण्याची वेळ, अमित शाहांची भेट मिळालीच नाही, वेगळ्याच चर्चांना उधाण
अजित पवार करायला गेले एक अन् झालं भलतंच, अमित शाह नाराज? दिल्लीत जाऊन भेट मिळालीच नाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 3 डिसेंबर 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  3 डिसेंबर 2024 : ABP MajhaAjit Pawar Delhi : अजित पवारांच्या दिल्लीवारीमुळे भुवया उंचावल्याMarkadwadi Protest : व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचं मत भाजपकडे वळत असल्याचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Waether Update: अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
Ajit Pawar: अजित पवारांवर दिल्लीत तिष्ठत बसण्याची वेळ, अमित शाहांची भेट मिळालीच नाही, वेगळ्याच चर्चांना उधाण
अजित पवार करायला गेले एक अन् झालं भलतंच, अमित शाह नाराज? दिल्लीत जाऊन भेट मिळालीच नाही
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
Embed widget