(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Parbhani: 'परभणी जिल्ह्यात भारनियमन कशाच्या आधारे...'; बबनराव लोणीकरांचे फडणवीसांना पत्र
Parbhani: परभणी जिल्ह्यातील गंभीर बनवलेल्या विजेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी मागणी लोणीकर यांनी पत्राद्वारे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
Parbhani News: परभणी जिल्ह्यामध्ये (Parbhani District) विजेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून शेतकऱ्यांना आठ दिवस दिवसा तर, आठ दिवस रात्री वीज मिळते आहे. त्यामुळे भारनियमन अधिकाऱ्यांनी कशाच्या आधारे केले आहे याचे उत्तर महावितरणच्या (Mahavitaran) कोणत्याही अधिकाऱ्याकडे नसल्याचा आरोप करत माजी मंत्री बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहले आहे. तर परभणी जिल्ह्यातील गंभीर बनवलेल्या विजेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी मागणी लोणीकर यांनी पत्राद्वारे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
लोणीकर यांनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, परभणी जिल्ह्यातील विजेचा प्रश्न सोडवायचा असेल तर त्यासाठी जिल्ह्यात एक 220 केव्ही, दोन -132 केव्ही व साधारणपणे वीस 33 केव्ही करणे आवश्यक आहेत. तर सद्यस्थितीत परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची विजेसंबंधीची अवस्था अत्यंत बिकट बनली आहे. अशी माहिती देखील लोणीकर यांनी पत्राद्वारे फडणवीस यांना दिली आहे.
जालन्याच्या धर्तीवर निर्णय घ्यावा...
पुढे बोलतांना लोणीकर म्हणाले की, मागील पंचवार्षिक मध्ये तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जालना जिल्ह्यात (Jalna District) दोन 220 केव्ही, एक 132 केव्ही व 49 –33 केव्ही मंजूर करून जालना जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. त्यामुळे आज जालना जिल्ह्यातील विजेची परिस्थिती अत्यंत चांगली असून त्याबाबत शेतकरी समाधानी आहे. त्याच धर्तीवर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विचार करून लवकरात लवकर याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात यावा अशी मागणी तमाम शेतकरी बांधवांची असल्याचे देखील लोणीकर यांनी पत्रात म्हटले आहे.
शेतकरी संकटात...
परभणी जिल्ह्यात विजेचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेष म्हणजे याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. आधीच अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. आता त्यातून सावरत कुठेतरी रब्बीची पेरणी करण्याचा काळ असतानाच विजेचा लपंडाव आणि भारनियमनमुळे बळीराजा हतबल झाला आहे. अनेक ठिकाणी रात्रीची वीज असल्याने जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांना पिकांना पाणी भरावे लागत आहे. त्यात पूर्णवेळ वीज राहत नाही, सतत लपंडाव सुरूच असतो. त्यामळे अशा परिस्थितीत पीके वाचवण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान बनले आहे. तर यावर प्रशासनाने आणि सरकारने मार्ग काढावा अशी मागणी शेतकरी करत आहे.