एक्स्प्लोर

Aadhar Card Update: दहा वर्ष पूर्ण झालेल्या आधारकार्डधारकांनी आपले आधार अपडेट करावे; प्रशासनाचे आवाहन

Aadhar Card News: आधार अपडेट न केल्यास भविष्यात आधार नोंदणी स्थगित होण्याची शक्यता आहे.

Aurangabad Aadhar Card News: शासनाच्यावतीने देशभर नागरिकांच्या आधारकार्ड नोंदणीची मोहिम मोठया प्रमाणावर राबविण्यात आली. आज रोजी बहुतांश नागरिकांचे आधारकार्ड (Aadhar Card) काढण्यात आले. शासनाने जारी केलेल्या नियमावलीनुसार दहा वर्षानी आधारकार्ड अपडेट (Aadhar Card Update) करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हयातील ज्या नागरिकांचा आधार नोंदणी करुन दहा वर्ष इतका कालावधी पूर्ण झाला आहे. त्यांनी आपले आधारकार्ड अपडेट करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले आहे.

आधारकार्ड काढल्यानंतर कालांतराने अनेक बदल होतात. जसे पत्ता, बोटांचे ठसे, नावातील चुका, मोबाईल क्रमांक नोंदीचे अद्यावतीकरण होणे आवश्यक असते. त्यासाठी दहा वर्षांनी आधार ईकेवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या नागरिकांना आधारकार्ड काढून दहा वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला आहे. त्यांनी आपल्या नजीकच्या आधार केंद्रावर जाऊन केवायसी करुन घेणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ज्या नागरिकांचे आधार कार्ड काढून दहा वर्षे पूर्ण झाले आहेत, त्यांनी आपलं आधार कार्ड अपडेट करून घेण्याचं आव्हान जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी केले आहे.

अन्यथा आधार नोंदणी स्थगित होण्याची शक्यता

याबाबत बोलताना पाण्डेय म्हणाले की, शासनाच्या 9 नोव्हेंबर 2022 रोजीच्या राजपत्रान्वये 18 वर्षावरील नागरीकांनी आपले आधारकार्ड काढले नसल्यास व 18 वर्षांनंतर पहिल्यांदाच आधार नोंदणी करीत असल्यास अशा नागरिकांच्या कागदपत्राची यापुढे जिल्हा स्तरीय आधार समिती मार्फत तपासणी करण्यात येणार आहे. आतापर्यंत आधारकार्ड का काढला गेले नाही याची तपासणी या समितीकडे सदर नागरिकांचे कागदपत्र ऑनलाईन सादर झाल्यानंतर केली जातील. त्यामुळे ज्यांनी अद्याप आधारकार्ड काढलेले नाही त्यांनी कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करावे व ज्यांनी आधारकार्ड काढून दहा वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला आहे. त्यांनी आपले आधारकार्ड ईके- वायसी अपडेट करुन घ्यावे. आधार अपडेट न केल्यास भविष्यात आधार नोंदणी स्थगित होण्याची शक्यता आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली बैठक...

तर केंद्र शासनाच्या आधार विनियमन 2016 मधील नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा आधार नियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. दरम्यान बुधवारी  जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अक्षया यादवा डायरेक्टर आधार कार्यालय मुंबई तसेच अभिषेक पांडे मॅनेजर आधार कार्यालय मुंबई यांनी वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन केले सदर मीटिंगमध्ये जिल्हा नोडल ऑफिसर तथा उपजिल्हाधिकारी निवडणूक तसे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक महाआयटी, इंडिया पोस्ट ,बँक एज्युकेशन ,हेल्थ या सर्व डिपार्टमेंटचे प्रमुख सदर बैठकीत उपस्थित होते.

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये का प्रवेश केला? मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी सांगितलं कारण...
राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये का प्रवेश केला? मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी सांगितलं कारण...
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
Raveena Tondon: मोदी सरकार फक्त बोलत नाही करुन दाखवते; रविना टंडनकडून कौतुक, म्हणाल्या, आज नारी शक्तीला सन्मान
मोदी सरकार फक्त बोलत नाही करुन दाखवते; रविना टंडनकडून कौतुक, म्हणाल्या, आज नारी शक्तीला सन्मान

व्हिडीओ

Anjali Damania Pc : चाकणकरांचे खरातला 177 फोनकॉल, सगळ्यात मोठा कॉल 22 मिनिटांचा, दमानियांचा गौप्यस्फोट
Kishori Pednekar On Sanjay Shirsat : गद्दारी करणाऱ्या भामट्याने आमच्या पक्षावर बोलू नये - पेडणेकर
Praful Hinge IPL : कोण आहे पहिलाच सामना गाजवणारा प्रफुल हिंगे? Special Report
Nagpur Shampoo Drugs : शाम्पूची बाटली, कोकेनचा फेस, तस्करीचा पर्दाफाश Special Report
Amravati Scandal : आरोपी अयान अहमदकडून किती जणींचं शोषण? भाजप आक्रमक Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
Raveena Tondon: मोदी सरकार फक्त बोलत नाही करुन दाखवते; रविना टंडनकडून कौतुक, म्हणाल्या, आज नारी शक्तीला सन्मान
मोदी सरकार फक्त बोलत नाही करुन दाखवते; रविना टंडनकडून कौतुक, म्हणाल्या, आज नारी शक्तीला सन्मान
खरात प्रकरणाची माहिती गृह खात्याला तीन महिन्यापूर्वी असताना मग का थांबवली होती? ती चौकशी खोलपर्यंत जाणार का? केसरकर, रूपालीताईंनी खुलासा करावा; सतेज पाटलांची मागणी
खरात प्रकरणाची माहिती गृह खात्याला तीन महिन्यापूर्वी असताना मग का थांबवली होती? ती चौकशी खोलपर्यंत जाणार का? केसरकर, रूपालीताईंनी खुलासा करावा; सतेज पाटलांची मागणी
आरसीबीला आज घरच्या मैदानात लखनौला हरवण्यासाठी 'विराट' इतिहास करावा लागणार! 'राॅयल' विजयासह पाँईंट टेबलमध्ये अग्रस्थानी पोहोचण्याची सुद्धा संधी
आरसीबीला आज घरच्या मैदानात लखनौला हरवण्यासाठी 'विराट' इतिहास करावा लागणार! 'राॅयल' विजयासह पाँईंट टेबलमध्ये अग्रस्थानी पोहोचण्याची सुद्धा संधी
Embed widget