Aurangabad: औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी दोन हजार लिटर बनावट दारू पकडली; 23 लाखांचा मुद्देमाल जप्त
Aurangabad Crime News: तब्बल 23 लाख 23 हजार रूपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला आहे.
Aurangabad Crime News: औरंगाबाद (Aurangabad) ग्रामीणच्या फुलंब्री पोलिसांनी बनावट दारू विरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत जळगाव जिल्ह्यातून येणाऱ्या दोन हजार लिटर बनावट दारू (Fake Liquor) आणि त्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. एकूण 23 लाख 23 हजार रूपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला आहे. तर पोलिसांनी केलेल्या या कारवाईत दोघांना ताब्यात घेतले असून, किरण मधुकर थोरकर (वय 28 वर्ष रा. झोडगे ता. मालेगाव जि. नाशिक) आणि प्रविण लोटक गंवादे (रा. जाजवाडे ता. मालेगाव जि. नाशिक) असे त्यांची नावं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र निकाळजे यांना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली होती की, एका ट्रकमधून बनावट दारु तयार करण्यासाठी लागणारे स्पिरीट अवैधरित्या जळगावकडून औरंगाबादच्या दिशेने येत असून, ते फुलंब्री पासुन पुढे जाणार आहेत. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निकाळजे यांनी आपल्याला पथकाला सूचना देत फुलंब्री येथील ग्रामीण रूग्णालयाजवळ सापळा लावला.
बनावट दारू तयार करणारे साहित्य घेऊन एक वाहन येत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सापळा लावला होता. तसेच या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक वाहनांवर पोलिसांची नजर होती. दरम्यान याचवेळी माहिती मिळेलेल्याप्रमाणे संशियत ट्रक येताना पोलीस पथकाला दिसून आला. त्यामुळे सापळा लावून, बसलेल्या पोलिसांनी तत्काळ तो ट्रक (क्रमांक एमएच 31 सी.बी. 0748 ) थांबवला. पोलिसांनी ट्रक चालकास विश्वासात घेऊन नाव, गाव विचारले असता, त्याने स्वतःचं नाव किरण मधुकर थोरकर आणि आपल्या साथीदाराचे नाव प्रविण लोटक गंवादे असल्याचे सांगितले.
एकुण 23 लाख 23 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त
दरम्यान ट्रकमध्ये काय आहे? याबाबत पोलिसांनी दोघांना विचारणा केली असता, त्यानी उडवाउडवीचे दिली. तसेच ट्रकमधून उग्रवास येत असल्याने पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांनी ट्रकची पाहणी केली. तर यावेळी त्यात निळ्या रंगाचे उग्रवास येत असलेल्या आठ लाखांचे 200 लिटर क्षमतेचे 10 ड्रम स्पिरिटने (बनावट दारू बनविण्यासाठी वापरण्यात येणारे) भरलेले मिळुन आले. तसेच 23 हजारांचे 23 बॉक्स झाकणे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत 15 लाखांच्या ट्रकसह एकुण 23 लाख 23 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई!
ही कारवाई पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र निकाळजे, पो.उप.नि. धुळे, पोलीस अंमलदार आर.पी. सोनूने, मुजीब सय्यद, अनिल शिंदे, संतोष डोंगरे, यांनी केली आहे.
इतर महत्वाचे बातम्या: