एक्स्प्लोर

Crime: फेसबुकवर भेटलेल्या प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीला कायमचं संपवलं, कारण होतं...

Aurangabad: विशेष म्हणजे आरोपी महिलेने पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी फेसबुकवर भेटलेल्या प्रियकराची मदत देखील घेतली होती.

Aurangabad Crime News:  विभक्त होऊन देखील पती सतत त्रास देत असल्याने पत्नीने पतीची निर्घुण  हत्या केल्याची घटना औरंगाबादमध्ये समोर आली आहे. पतीला मनसोक्त दारू पाजून त्यानंतर त्याच्यावर पोटात चाकूने वार करीत पत्नीने त्याचा काटा काढला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तब्बल बारा दिवसांनंतर या खुनाला वाचा फुटली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे आरोपी महिलेने पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी फेसबुकवर भेटलेल्या प्रियकराची मदत देखील घेतली होती. विजय संजयकुमार पाटणी (35, रा. एन-६, सिडको) असे मृताचे नाव असून, पत्नी सारिका विजय पाटणी (30, रा. सलामपुरेनगर, वडगाव कोल्हाटी) आणि तिचा प्रियकर सागर मधुकर सावळे (25 रा. शिवाजीनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय आणि सारिका या दोघांमध्ये पटत नसल्याने त्यांनी चार महिन्यांपूर्वी विभक्त राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे विजय त्याच्या वृद्ध आईसह आणि सारिका तिच्या आई व भावासह राहू लागले होते. यादरम्यान, सारिकाची फेसबुकवरून सागरशी ओळख झाली आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. याबाबत विजयला कळाले आणि तो सारिका सतत त्रास देऊ लागला. तसेच पुन्हा एकत्र राहण्याचा हट्ट करायला लागला. यादरम्यान तो अनेकदा दारू पिऊन सारिकाच्या घरी जाऊन त्रास देत होता. त्यामुळे या सर्व त्रासाला सारिका कंटाळली होती. 

आणि कायमचं संपवलं...

पतीच्या त्रासाला कंटाळलेल्या सारिकाने विजयचा कायमचा काटा काढण्याचं ठरवलं. त्यामुळे 18 ऑक्टोबरला सारिकाने विजयला फोन केला आणि सोबत फिरायला जाण्यासाठी गळ घातली. त्यापूर्वीच तिने चाकू आणि डोळ्यात मारायला स्प्रे खरेदी केला होता. फिरायला गेल्यावर आधीपासूनच तयारीत असलेल्या सारिकाने विजयला दारू पिण्याची इच्छा व्यक्त केली. दोघांनी सोबत दारू पिली. मात्र विजयला सारिकाने जास्तीची दारू पाजली. दरम्यान दोघे नवीन धुळे-सोलापूर हायवेवर वाल्मीजवळील उड्डाणपुलाजवळ पोहचले. ठरल्याप्रमाणे सारिकाने विजयच्या डोळ्यात स्प्रे मारला. तो गांगरला की लगेचच चाकूने सपासप त्याच्या पोटात वार केले. विजय रक्तबंबाळ होऊन रस्त्यावर कोसळला. 

प्रियकराला घटनास्थळी बोलावून घेतले....

सारिकाने केलेल्या चाकू हल्ल्यात विजय जागेवर कोसळला. त्याला काहीसे बाजूला सारून तिने फेसबुकवर भेटलेल्या प्रियकर सागर सावळेला फोन लावला आणि त्याला घटनास्थळी बोलावून घेतले. मात्र घाबरलेल्या सागरने तिला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास नकार दिला होता. पण त्याला खुनाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत, त्याच्या मदतीने सारिकाने विजयाचा मृतदेह स्त्याच्या कडेला असलेल्या गर्द झाडीत फेकून दिला. त्यानंतर तिने पोलिसात पती बेपत्ता असल्याची तक्रार देखील दाखल केली होती. मात्र पोलिसांच्या तपासात तिनेच आपल्या पतीचा खून केल्याचे समोर आले आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime: झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
Uddhav Thackeray : मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
Ayushmann Khurrana T-20 World Cup :   टी-20 विश्वविजेत्या टीम इंडियाचे कौतुक, अभिनेता आयुष्यमान खुरानाने लिहिली भन्नाट कविता...
टी-20 विश्वविजेत्या टीम इंडियाचे कौतुक, अभिनेता आयुष्यमान खुरानाने लिहिली भन्नाट कविता...
Pune Wari Accident:  विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  1:00PM : 1 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPratap Sarnaik vs Jitendra Awhad : जिथे रेव्ह पार्ट्या सुरु आहेत तिथे कारवाई झालीच पाहिजेAnil Deshmukh on Samruddhi Accident : समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघात, अहवाल कधी येणार?Amarnath Yatra Jammu Kashmir : अमरनाथ यात्रेला सुरूवात; 28 हजारहून अधिक भाविकांनी घेतलं दर्शन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime: झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
Uddhav Thackeray : मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
Ayushmann Khurrana T-20 World Cup :   टी-20 विश्वविजेत्या टीम इंडियाचे कौतुक, अभिनेता आयुष्यमान खुरानाने लिहिली भन्नाट कविता...
टी-20 विश्वविजेत्या टीम इंडियाचे कौतुक, अभिनेता आयुष्यमान खुरानाने लिहिली भन्नाट कविता...
Pune Wari Accident:  विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
Rajeshwari Kharat Relationship :  ''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस
''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस
आनंदाच्या भरात लोक पाण्यात जातात आणि..., भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन
आनंदाच्या भरात लोक पाण्यात जातात आणि..., भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन
T20 World cup: विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाच्या 11 खेळाडुंचं अभिनंदन करण्याऐवजी BCCIचे खजिनदार आशिष शेलारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव; विरोधकांचा सभात्याग
टीम इंडियाच्या खेळाडुंचं अभिनंदन करण्याऐवजी सभागृहात आशिष शेलारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडल्याचा आरोप, विरोधकांचा सभात्याग
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतमोजणीत पुन्हा आढळल्या दोन जास्त मतपत्रिका; मतमोजणी केंद्रावर खळबळ
मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतमोजणीत पुन्हा आढळल्या दोन जास्त मतपत्रिका; मतमोजणी केंद्रावर खळबळ
Embed widget