एक्स्प्लोर

Weekly Recap : अजित पवार नवे उपमुख्यमंत्री, धुळ्यात भीषण अपघात; सरता आठवडा कसा होता? वाचा सविस्तर...

Weekly Recap : या आठवड्यात 2 जुलै ते 7 जुलै दरम्यान राज्यात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. आठवडाभरातील अशाच काही चांगल्या, वाईट आणि महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आम्ही तुमच्यासाठी सविस्तरपणे घेऊन आलोय.

India This Week : सरत्या आठवड्याभरात अनेक घडामोडी घडल्या, ज्यातील काही चांगल्या तर काही वाईट होत्या. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप आला ज्यामुळे राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली. यासोबतच देशातही काही मोठ्या घडामोडी घडल्या. सरत्या आठवड्यातील काही चांगल्या आणि वाईट घडमोडींचा सविस्तर आढावा पाहा...

महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार 

अजित पवार यांनी 2 जुलै रोजी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉलमध्ये आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथविधी पार पडला. अजिप पवारांसोबत राष्ट्रवादीचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारसोबत सामील झाला आहे. राष्ट्रवादीचे सुमारे 40 आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चन्द्रशेखर बावनकुळे यांनी केला. राष्ट्रवादीचे फक्त आमदारचं नव्हे तर 2 खासदार देखील अजित पवारांच्यासोबत गेले आहेत. वाचा सविस्तर...

शरद पवार प्रितीसंगमावर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांनी बंड केल्याचं मान्य करत पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. ज्या पद्धतीने शरद पवारांनी 2019 विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप शिवसेनेला प्रचार करून घाम फोडला होता आणि सातारमधील पावसातील सभा अविस्मरणीय झाली होती, त्याच पद्धतीने पुन्हा एकदा सातारमधून राजकीय अन् सामाजिक उर्जा देणाऱ्या प्रितीसंगमावर शरद पवार पोहोचले. 3 जुलै रोजी शरद पवारांनी प्रितीसंगमावर यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळाचं दर्शन घेत पुन्हा एकदा लढण्यासाठी रणशिंग फुंकले आहे. वाचा सविस्तर...

अजित पवारांचा पक्षावर दावा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्याचं स्पष्ट आहे. अजित पवारांनी नेमके किती आमदार फोडले हा आकडा अजूनही निश्चित नसला, तरी त्यांनी पक्षात फूट पाडून थेट पक्षावर दावा केला आहे. वाचा सविस्तर...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू विदर्भ दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) 4 जुलैपासून विदर्भ (Vidarbha) दौऱ्यावर होत्या. राष्ट्रपतिपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर राष्ट्रपतींचा हा पहिलाच विदर्भ दौरा होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं 4 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता नागपुरात आगमन झालं. 5 जुलै रोजी त्यांनी सकाळी गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ तसेच कोराडीतील सांस्कृतिक केंद्राच्या उदघाटन सोहळ्याला हजेरी लावली. वाचा सविस्तर...

मुख्यमंत्री शिंदेंचा नागपूर दौरा रद्द

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मंगळवारी नागपूर आणि गडचिरोलीच्या दौऱ्यावर आल्या होत्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राजभवनात सोडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील नागपूरात थांबणार होते. राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री गडचिरोली आणि नागपूरमध्ये थांबणार होते. मात्र, राष्ट्रपतींचा आजचा मुक्काम असलेल्या राजभवनात त्यांना सोडल्यानंतर मुख्यमंत्री तडकाफडकी मुंबईला रवाना झाले. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शिंदे गटात नाराजी असल्याचं बोललं जात आहे. अजित पवारांचं येणं शिंदे गटातील बऱ्याच आमदारांच्या पचनी पडलेलं नाही, असंही बोललं जात आहे. वाचा सविस्तर...

शिंदे गटाचं नाराजी नाट्य

राष्ट्रवादीतील बंडानंतर राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. अजित पवार यांनी भाजप (BJP) आणि शिंदे गटाच्या (Shinde Group) साथीनं उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण दुसरीकडे आधीपासूनच भाजपसोबत असलेला आणि शिवसेनेतून (Shiv Sena) बंड करुन बाहेर पडलेला शिंदे गट मात्र नाराज असल्याच्या चर्चा आहेत. तशी नाराजी शिंदेंच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी शिंदेंकडे व्यक्त केल्याचीही माहिती मिळत आहे. वाचा सविस्तर...

नीलम गोऱ्हे शिंदे गटात 

बंडाच्या एकवर्षानंतरही ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गटातील संघर्ष कायम आहे. अजूनही ठाकरेंकडून शिंदेंच्या शिवसेनेत (Shiv Sena) येणाऱ्यांचा ओघ काही कमी होण्याचं नाव घेत नाही. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंची कास धरली आहे. शुक्रवारी (7 जुलै) विधीमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. वाचा सविस्तर...

मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात, कंटेनर हॉटेलमध्ये शिरला

मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरती झालेल्या पळासनेर गावा जवळच्या अपघातात 10 जणांचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात 27 जण जखमी झाले. सिमेंट फॅक्टरीसाठी लागणारी खळी घेऊन जाणारा कंटेनर हा ब्रेक फेल झाल्याने अनियंत्रित होऊन एका हॉटेलमध्ये घुसला आणि हा भीषण अपघात घडला.यादरम्यान कंटेनरने दोन वाहनांना धडक दिली. वाचा सविस्तर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Embed widget