एक्स्प्लोर

प्रितीसंगमावरून आशीर्वाद घेताच शरद पवारांचा एल्गार; पहिली सभा दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात, राज्यव्यापी दौरा करणार

शरद पवार यांनी सामाजिक तीर्थक्षेत्र असलेल्या प्रितीसंगमावर जाऊन पुन्हा एकदा लढ्याचे रणशिंग फुंकले आहे. त्यांनी राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली आहे. त्यांची पहिली सभा जुन्नरमध्ये होणार आहे.

Sharad Pawar: अजित पवार यांनी राष्ट्रवादीत फूट पाडल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सामाजिक तीर्थक्षेत्र असलेल्या प्रितीसंगमावर जाऊन पुन्हा एकदा लढ्याचे रणशिंग फुंकले आहे. त्यांनी राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली आहे. त्यांची पहिली सभा जुन्नरमध्ये होणार आहे. ही पहिली सभा अजित पवारांसोबत जाऊन धक्का दिलेल्या माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात होणार आहे. त्यानंतर बीडमधील परळीला मुंडेंच्या मतदारसंघात दुसरी सभा होणार आहे. दरम्यान, काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला असल्यास संख्याबळाचा विचार करता तर उचित असल्याचेही ते म्हणाले. अजित पवार कुणी परके नव्हते, एकत्र काम केल्यानंतरही मतभिन्नता असते. त्यामुळे त्यांच्याविषयी संशय व्यक्त करणार नाही, असेही पवार यांनी नमूद केले. 

कोणताही संभ्रम नको, जाहीरपणे पक्षबांधणीसाठी जात असल्याचे शरद पवार यांनी ठामपणे सांगितले. ते पुढे म्हणाले की, आमचे अनेक सहकारी ज्यांना हजारो कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला, ज्यांच्याकडून संघटन मजबूत करावी अशी अपेक्षा होती. मात्र काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे नव्या पिढीतील कार्यकर्ता नाऊमेद होऊ नये म्हणून मी हा दौऱा सुरू केला आहे. कार्यकर्ते आणि त्यातीलही 70-80 टक्के तरूण आमच्या पाठीशी आहेत, हे चित्र आहे. आम्ही कष्ट केले, या तरूणांना दिशा दिल्यास मला खात्री आहे दोन ते तीन महिन्यांत संपूर्ण महाराष्ट्रातील चित्र राष्ट्रवादीला अनुकुल होईल.  

अजित पवार कुणी परके नव्हते

शरद पवार म्हणाले की, एखादी महत्वाची मोहिम सुरू करण्यासाठी गुरूपौर्णिमा हा चांगला दिवस असतो. म्हणून आज यशवंतरावांच्या स्मृतींना वंदन करून मी ही मोहिम सुरू केली. भाजपच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नातून राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होता.  सामाजिक सलोख्यासाठी प्रयत्न ही आमची अपेक्षा होती. ज्या प्रवृत्तींशी आमचा संघर्ष आहे, त्यांच्यासोबत गेले. पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी मी पुढाकार घेतला आहे. अजित पवार कुणी परके नव्हते, एकत्र काम केल्यानंतरही मतभिन्नता असते. त्यामुळे त्यांच्याविषयी संशय व्यक्त करणार नाही. 

ज्यांना एवढं समजत नाही की मी जाहीरपणानं पक्षाच्या बांधणीसाठी निघालो आहे, त्यावरून संभ्रम निर्माण करू नका. महाराष्ट्राच्या विधानसभेत राष्ट्रवादीनं ज्यांना पक्षाचं नेतृत्व दिलं ते जयंत पाटील आहेत. त्यामुळे नेत्यांनी एखादा निर्णय घेतला असले, पत्रव्यवहार केला असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. अडीच वर्षं आम्ही शिवसेनेबरोबर काम केलं तेव्हा त्यांना वाटलं नाही की आम्ही काही चूक करत आहोत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 26 June 2024Shivnath Darade on Election : मुंबई शिक्षक मतदारसंघात महायुतीत चढाओढ, शिवनाथ दराडे ExclusiveMahendra Bhavsar Dhule : निवडणुकीत विजय आमचाच, महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वासTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 26 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
Embed widget