![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dhananjay Munde : राष्ट्रवादीत All is well? धनंजय मुंडे म्हणतात Perfectly well
Dhananjay Munde : मतदारसंघातील कामासाठी मी मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्या सचिवांना भेटल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केलं.
![Dhananjay Munde : राष्ट्रवादीत All is well? धनंजय मुंडे म्हणतात Perfectly well Maharashtra Ncp Mla Dhananjay Munde comment on Maharashtra Politicis Ncp leader Ajit Pawar minister Mangal Prabhat Lodha Dhananjay Munde : राष्ट्रवादीत All is well? धनंजय मुंडे म्हणतात Perfectly well](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/18/c2a53548f15f53daffd5c943c0041aeb1681801242428339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Dhananjay Munde : प्रसारमाध्यमांनी राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार धनंजय मुंडेंना All is well आहे का? असा प्रश्न केला होता. त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना Perfectly well असं धनंजय मुंडे म्हणाले. मतदारसंघातील कामासाठी मी मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्या सचिवांना भेटल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केलं. धनंजय मुंडे हे मंगलप्रभात लोढा यांच्या कार्यालयात आले होते. त्यानंतर राजकीय चर्चांणा उधाण आलं होतं. कामांना स्थगिती देण्यात आल्या आहेत, त्याबाबत अजितदादांचं (Ajit Pawar) पत्र घेण्यासाठी मी विधानभवनात आलो होतो असेही मुंडे म्हणाले.
Ajit Pawar : अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या जोरदार चर्चा
महाराष्ट्राच्या राजकारणाचा सध्या अजित पवार केंद्रबिंदू ठरले आहेत. ते भाजपमध्ये (BJP) जाणार असल्याची वारंवार चर्चा होत आहे. त्यावर अजित पवार हे वारंवार खुलासा देखील करत आहेत. सोमवारीही त्यांनी पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केल्याची चर्चा होती. तसंच आज आमदारांची बैठक बोलावल्याचीही जोरदार चर्चा होत आहे. त्यातच राष्ट्रवादीचे अनेक आमदार मुंबईकडे निघाल्याची माहिती मिळत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. अजित पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असल्याचे काही आमदारांनी सांगितले आहे. त्यामुळं राजकीय वर्तळात विविध चर्चांणा उधाण आलं आहे. दरम्यान, धनंजय मुंडे हे नॉल रिचेबल असल्याच्या माध्यमात चर्चा सुरु होत्या. त्यानंतर धनंजय मुंडे हे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या कार्यालयात गेल्याची माहिती मिळाली होती. मात्र, आपल्या मतदारसंघातील कामासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या सचिवांना भेटल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
राज्यात नव्या राजकीय समीकरणांच्या फक्त चर्चा आहेत. त्यात काही तथ्य नाही, अशी माहिती अजित पवार यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. दरम्यान अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) 53 पैकी 40 आमदारांच्या सह्या घेतल्याचं वृत्त समोर आलं होतं. 'द न्यू इंडियन एक्स्प्रेस' या इंग्रजी वृत्तपत्राने ही बातमी दिली होती. सह्या मिळवण्यासाठी अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन करत आहेत, असंही वृत्तात म्हटलं आहे. परंतु अजित पवार यांनी हे वृत्त फेटाळलं आहे. मी पुन्हा पुन्हा प्रतिक्रिया देणार नाही, मीडिया स्वतःच्या मनाने बातम्या चालवत आहे, असं अजित पवार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
Anna Bansode : अजितदादांसोबत 40 पेक्षा जास्त आमदार असू शकतात, थोड्याच वेळात समजेल: अण्णा बनसोडे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)