Anna Bansode : अजितदादांसोबत 40 पेक्षा जास्त आमदार असू शकतात, थोड्याच वेळात समजेल: अण्णा बनसोडे
Anna Bansode : राष्ट्रवादी काँग्रेसचे किती आमदार अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत आहेत हे थोड्याच वेळात समजेल असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी केलं आहे.
![Anna Bansode : अजितदादांसोबत 40 पेक्षा जास्त आमदार असू शकतात, थोड्याच वेळात समजेल: अण्णा बनसोडे Maharashtra Politicis Ncp Mla Anna Bansode comment on Ncp leader Ajit Pawar maharashtra mumbai news Anna Bansode : अजितदादांसोबत 40 पेक्षा जास्त आमदार असू शकतात, थोड्याच वेळात समजेल: अण्णा बनसोडे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/18/07657a585cb96f3842fac53f13c9281b1681796252236339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mla Anna Bansode : राष्ट्रवादी काँग्रेसचे किती आमदार अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत आहेत हे थोड्याच वेळात समजेल असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे (Mla Anna Bansode) यांनी केलं. तासाभरात मी दादांना भेटणार आहे. तिथे गेल्यानंतर मी याबाबत सांगू शकतो असेही अण्णा बनसोडे म्हणाले. अजित पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. दादा जिथे जाणार तिथे अण्णा बनसोडे असणार असेही ते म्हणाले.
NCP Mla : राष्ट्रवादी काँग्रेसचे बरेच आमदार मुंबईत
मी काल रात्री मुंबईमध्ये आलो आहे. साडेअकरा वाजता मी अजित पवार यांची भेट घेणार असल्याचे अण्णा बनसोडे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे बरेच आमदार मुंबईत आले आहेत. अजित पवार यांनी मुंबईत बैठक बोलावली नाही. पण आम्ही त्यांना भेटण्यासाठी मुंबईत आलो असल्याचे बनसोडे म्हणाले. मी दादांना मानणारा कार्यकर्ता, त्यांच्यावर माझी श्रध्दा आहे. ते जो निर्णय घेतील तो मला मान्य असल्याचे बनसोडे म्हणाले.
शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत बोलणे झाले नाही
थोड्याच वेळात अजित पवार यांच्यासोबत किती आमदार हे समजेल असे अण्णा बनसोडे म्हणाले. अजितदादांसोबत 40 पेक्षा जास्तही आमदार असू शकतात अशी शक्यता असल्याचे बनसोडे म्हणाले. कामाच्या निमित्ताने अजित पवार यांच्याशी माझे बोलणे झाल्याचे बनसोडे म्हणाले. मात्र, शरद पवार यांच्यासोबत कोणतेही बोलणे झाले नाही किंवा त्यांचा फोन आला नसल्याचे बनसोडे म्हणाले. पुढच्या तासाभरात अजित पवार यांनी भेटणार आहे, त्यानंतरच आम्हाला समजेल असे बनसोडे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
Sanjay Raut : अजित पवार महाविकास आघाडीचे आधारस्तंभ, भाजपकडून त्यांच्याबाबत अफवा : संजय राऊत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)