Nandurbar Vaccination Drive : अभिनंदन, तुमचे दोन्ही डोस पूर्ण झाले, 8 महिन्यापूर्वी मृत्यू झालेल्या महिलेच्या नावाने मेसेज!
Maharashtra Vaccination : या घटनेमुळे नंदुरबारमध्ये खळबळ माजली आहे. पण या घटनेमुळे प्रशासनातील तृटी समोर आल्या आहेत.
![Nandurbar Vaccination Drive : अभिनंदन, तुमचे दोन्ही डोस पूर्ण झाले, 8 महिन्यापूर्वी मृत्यू झालेल्या महिलेच्या नावाने मेसेज! Maharashtra Nandurbar News Covid-19 Vaccination Drive name of woman who died eight months ago Nandurbar Vaccination Drive : अभिनंदन, तुमचे दोन्ही डोस पूर्ण झाले, 8 महिन्यापूर्वी मृत्यू झालेल्या महिलेच्या नावाने मेसेज!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/21/7d19338fb8fa42e607fd69f4c77367f8_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Vaccination : महामारीच्या विरोधात लढण्यासाठी देशभरता कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. देशभरात 100 कोटींपेक्षा जास्त लसीचे डोस देण्यात आले आहेत. लसीकरणाला वेग येण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. अशातच नंदुरबारमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. आठ महिन्यापूर्वी मृत पावलेल्या महिलेच्या नावाने लसीकरण झालेला संदेश आणि प्रमाणपत्र समोर आलेय. तर दुसरीकडे तरूणाला प्रत्यक्षात लसची दुसरी मात्रा न घेता त्यांचे लसीकरण पूर्ण झाल्याचा दाखला प्रशासनाने दिला. या घटनेमुळे नंदुरबारमध्ये खळबळ माजली आहे. पण या घटनेमुळे प्रशासनातील तृटी समोर आल्या आहेत.
रेल्वे प्रवास, मॉल प्रवेश तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी लसीकरणाच्या दोन मात्रा घेणे बंधनकारक असताना नवापूर शहरातील एका मृत महिलेला दुसरा लसीकरणाची मात्रा दिल्याचे संदेश व प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे या संपूर्ण व्यवस्थेतील त्रुटी उघडकीस आल्या असून एका तरूणाचे प्रत्यक्षात लसची दुसरी मात्रा न घेता त्यांचे लसीकरण पूर्ण झाल्याचा दाखला प्रशासनाने दिला आहे. नवापूर शहरातील सराफ गल्ली येथे राहणार जयाबेन हरिष पारेख वय ५७ त्यांनी १७ मार्च २०२१ रोजी नवापुर उपजिल्हा रुग्णालयात लसीची कोविशिडची पहिली मात्रा घेतली. त्यानंतर जयाबेन पारेख २६ मार्च कोरोनाची लागण झाली, त्यांचावर गुजरात राज्यातील मांडवी येथे उपचार केला प्रकृतीत बिघाड झाल्याने सुरत येथे दाखल केले ७ एप्रिल २०२१ रोजी मृत्यू झाला तर जयाबेन पारेख यांना दरम्यानच्या काळात करोना आजाराने ग्रासल्याने त्यांनी लसीची दुसरी मात्रा घेतली नाही. एका मृत ज्येष्ठ महिलेला लसीची दुसरी मात्र घेतले नसताना त्यांना लसीकरण पूर्ण झाल्याचे संदेश (एसएमएस) प्राप्त झाले. त्याच पद्धतीन लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र जारी करण्यात आले असून नंदुरबार जिल्हा परिषदेमधील लसीकरणात मधील भोंगळ कारभार उघडकीस आला आहे.
माझ्या आईचा कोरोनाने मृत्यू होऊन आठ महिने झाले.त्यानंतर २७ नोव्हेंबर २०२१ ला संध्याकाळी ६:०६ वाजेला कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस घेतल्याचे संदेश व प्रमाणपत्र आल्याने मला धक्काच बसला एकीकडे आईचे मृत्यु प्रमाणपत्र तर दुसरीकडे शनिवारी कोरोना लसीकरणाचा दुसरा ठोस घेतल्याचे प्रमाणपत्र असा अजब प्रकार नवापूर शहरातील सोन्या-चांदीचे व्यापारी मेहूल पारेख यांना अनुभवास आला आहे.
एखाद्या व्यक्तीने कोरोना लसीकरणाचे अपडेट करताना मोबाईल क्रमांक चुकून दुसरा दिला गेल्याने होऊ शकते तरी यासंदर्भात चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे, असे नवापूर येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. शशिकांत वसावे म्हणाले.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)