(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Mumbai Rains LIVE : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर , महाड , माणगाव, पनवेल , पेण , मुरूड तालुक्यातील रहिवाशांचे स्थलांतरण
Maharashtra Rain : सध्या राज्याच्या काही भागातच पाऊस पडत आहे. मुंबई परिसरासह कोकणात चांगला पाऊस पडत आहे. इतर ठिकाणी मात्र, पावसाची प्रतिक्षा कायम आहे.
LIVE
Background
Maharashtra Mumbai Rains LIVE : सध्या राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्यापही पाऊस पडताना दिसत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. शेतकरी संध्या पावसाची वाट बघत आहे. सध्या मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात चांगला पाऊस पडताना दिसत आहे. तसेच कोकणात देखील चांगला पाऊस पडत असल्याचे चित्र दिसत आहे. त्याचबरोबर पालघर जिल्ह्यातही पावसानं चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळं तेथील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. जूनमध्ये उघडीप दिलेल्या पावसाचा जुलैमध्ये काही भागात जोर वाढल्याचे चित्र दिसत आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, साताऱ्यातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विदर्भात काय स्थिती
दरम्यान, नेहमीप्रमाणे यंदाही भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या पावसाचा अंदाजापेक्षा एकदम उटल परिस्थिती निर्माण झाली. जून महिन्यात विदर्भातील अकराही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून लवकर दमदार पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येणार असल्याची स्थिती आहे.
शेतकऱ्यांच्या सर्व आशा आता जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांवर आहेत. या महिन्यांत समाधानकारक पाऊस पडला तरच चांगले पीक होणार आहे. 16 जूनला मॉन्सून दाखल झाल्यापासून नागपुरात केवळ एकच दिवस (23 जूनला) 60 मिलिमीटर पाऊस बरसला. त्यानंतर वरुणराजाने केवळ नावापुरतीच अधूनमधून हजेरी लावली. उशिरा आलेल्या व पुरेशा पावसाअभावी सध्या पेरण्या खोळंबल्या असून, अनेक जिल्ह्यांत दुबार पेरणीची स्थिती निर्माण झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे, भारतीय हवामान विभागाने यंदा 103 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे. तो अंदाज आतापर्यंत तरी खोटा ठरला आहे.
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर , महाड , माणगाव, पनवेल , पेण , मुरूड तालुक्यातील रहिवाशांचे स्थलांतरण
Raigad : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर , महाड , माणगाव, पनवेल , पेण , मुरूड तालुक्यातील रहिवाशांचे स्थलांतरण केले आहे. रायगड जिल्ह्यातील 26 गावातील रहिवाशांचे स्थलांतरण केले आहे. रायगड जिल्ह्यातील 1716 रहिवाशांचे स्थलांतरण केले आहे.
Mumbai Rains : सर्व मार्गावर ट्रेन्स सुरु, मेन लाईन, हार्बर मार्गावर काही गाड्या 10-15 मी. विलंबानं
T/3/5.7.2022
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) July 5, 2022
ट्रेन अलर्ट! 9.30AM
सर्व मार्गावर ट्रेन्स सुरु आहेत. मेन लाईन, हार्बर मार्गावर काही गाड्या 10-15 मी.विलंबाने आहेत.
Train Alert! 9.30AM
Trains on all corridors are running. Few trains on Main, Harbor line are running 10-15 mins late.#MumbaiRains #MumbaiLocals
कल्याण-डोंबिवलीत जोरदार पावसाची हजेरी, सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात
आज दुपार पासून कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या तीन तासापासून कोसळणाऱ्या पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. डोंबिवली, नांदीवली, कल्याण पूर्वेकडील मलंग रोड, आडीवली, ढोकली परिसर यंदा ही जलमय झाला आहे.
Kolhapur Rain : पंचगंगा नदी पाणी पातळीत झपाट्याने वाढ
Kolhapur Rain : पंचगंगा नदी पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे. राजाराम बंधाराचे पाणी पातळी 16.8 फुटावर गेले आहे. राजाराम बंधारा वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षक तैनात करण्याची परिसरातील स्थानिकांकडून मागणी करण्यात आली आहे.
महाड येथील रेवतळे गावाजवळील पूलावर पाणी आल्याने वाहतूक वळविण्यात आली
महाड येथील रेवतळे गावाजवळील पूलावर पाणी आल्याने वाहतूक वळविण्यात आली आहे. दापोली - मंडणगडकडे जाणारी वाहतूक वळविण्यात आली. वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात विन्हेरे बाजूकडून वळविण्यात आली.