एक्स्प्लोर

Maharashtra Mumbai Rain LIVE Updates : राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस, मराठवाड्यासह विदर्भात काही ठिकाणी पूरस्थिती

राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसामुळं नदी नाल्यांना पूर आला आहे. तर काही ठिकाणी गावात पाणी शिरल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.

LIVE

Key Events
Maharashtra Mumbai Rain LIVE Updates : राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस, मराठवाड्यासह विदर्भात काही ठिकाणी पूरस्थिती

Background

Maharashtra Mumbai Rain LIVE Updates : राज्यातील काही भागात सध्या मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना पूर आला आहे. काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात पावसानं धुमाकूळ घातला आहे. विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अकोला, वाशिम  या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. तर मराठवाड्यातील, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पाऊस होत आहे. तसेच नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली, कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागासह मुंबई, ठाणे पालघर या भागातही पाऊस पडत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री गडचिरोली दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीत पूरस्थितीची पाहणी केली. गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पुलावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष पूर परिस्थितीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीना व पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पाणी पातळी व उपाय योजने संदर्भात माहिती दिली. 

गडचिरोलीत पुढचे तीन दिवस रेड अलर्ट 

गडचिरोली जिल्ह्यात हवामान खात्याने 3 दिवसाचा रेड अलर्ट जारी केला होता. पहिल्या दिवशी जिल्हाभर रिमझिम पाऊस पडला. मात्र रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे आलापल्ली गावाला लागून असलेल्या नाल्यांना  पूर आला असून पुराचे पाणी अनेक घरात शिरलं आहे. आलापल्ली गावाला चारही दिशेनं पाण्यानं वेढा दिला आहे. अनेक घरात पाणी शिरल्याने लोकांना मध्यरत्री घरातील सामान, गाडी व इतर वस्तू घेऊन सुरक्षितस्थळी जावे लागले. 

नंदूरबार पाऊस

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर नंदूरबार जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. नवापूर तालुक्यातील शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तालुक्यातील नदी नाल्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील अनेक लघु प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. गोमाई, शिवण, नागन, नदी काठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नवापूर शहरातील रंगावली काठावरील 100 घरातील 400 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे. जिल्ह्यात येत्या 48 तासात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

अकोला आणि वाशिममध्ये जोरदार पाऊस

गेल्या तीन दिवसांत झालेल्या पावसामुळं अकोला जिल्ह्यातील नदी नाल्यांच्या पाण्यात वाढ झाली आहे. बाळापूर तालुक्यातल्या कारंजा रमजानपुरचा पानखास नदीवरील लघुप्रकल्प 100 टक्के भरला आहे. प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरु केल्याने अंत्री परिसरात पानखास नदीला पूर आला आहे. तसेच
वाशिम जिल्ह्यात सकाळपासून मध्यम स्वरुपाच्या पावसाला सुरुवात झाली आहे. तिथे सध्या दाट ढगाळ वातावरण असून दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता आहे.

वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

हवामान खात्याकडून प्राप्त झालेल्या सुचनेनुसार, 14 जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात दिनांक 1 जूनपासून 11 जुलैपर्यंत सरासरी 375 मीमी. म्हणजे 42.9 टक्के (जुन ते सप्टेंबर सरासरी पर्जन्यमानाच्या) पर्जन्यमान झाले आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

यवतमाळ पाऊस

फुलसावंगी ते ढाणकी राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सध्या सुरु आहे. ठिकठिकाणी नवीन पुलाच्या निर्मितीचे कार्य सुरु आहे. त्या ठिकाणी पर्यायी बनवलेला पुल पावसाने वाहून गेला आहे. मुसळधार पावसाने येथील ढाणकी ते फुलसावंगी रस्त्यावरील पर्यायी पूर वाहून गेला. त्यामुळे वाहतूकीवर परिणाम झाला.

19:43 PM (IST)  •  12 Jul 2022

पाली, रोहा, खालापूर येथील नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ

पाली, रोहा, खालापूर येथील नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.  अंबा, कुंडलिका, पाताळगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.  अंबा 8.80  मीटर, कुंडलिका 23.75 मीटर, पाताळगंगा 20.55 मीटर एवढया पाणी पातळीची नोंद.

19:40 PM (IST)  •  12 Jul 2022

पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली

PUNE | बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला की पाऊस झाला असा अंदाज वर्षानुवर्षे पुणेकर वर्तवतात. गेले तीन दिवस पुण्यात संततधार पाऊस पडल्याने खडकवासला धरण 100 टक्के भरलं. धरणातील पाण्याचा विसर्ग मुठा नदीत सोडण्यात आलं. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. भिडे पूल पाण्याखाली गेला म्हणजे पुण्यात पाण्याचा प्रश्न मिटला असं समजल्या जातं.

15:11 PM (IST)  •  12 Jul 2022

गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु

गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने गोदावरी नदीला सलग दुसऱ्या दिवशी पूर कायम आहे. विशेष म्हणजे विसर्गात वाढ झाल्यास पुराचे पाणी थेट सराफ बाजार, भांडी बाजार आणि जूने नाशिक परिसरात शिरण्याची शक्यता आहे. तसेच जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आल्याने प्रशासनाकडून नागरिकांसह व्यावसायिकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. भांडी बाजारातील व्यावसायिकांनी आता दुकानातील साहित्य हलवण्यास सुरुवात केली असून दुकाने त्यांनी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय.

15:11 PM (IST)  •  12 Jul 2022

कल्याण मधील दुर्गाडी खाडी परिसरात NDRF ची प्रात्यक्षिके

कल्याण मधील दुर्गाडी खाडी परिसरात एनडीआरएफ ची प्रात्यक्षिके झाली. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात पूर परिस्थिती उद्भवते. या पार्शवभूमीवर कल्याण मध्ये एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहे. 25 जणांचे हे पथक अत्याधुनिक सामुग्रिने सज्ज आहे. आज कल्याण दुर्गाडी खाडी परिसरात या पथकाने मोकड्रील केलं. आपत्कालीन परिस्थितीचा सामना कसा करणार याबाबत प्रत्याक्षिक सादर करण्यात आली.

13:12 PM (IST)  •  12 Jul 2022

धुळे जिल्ह्यात मुसळधार पाऊस, अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत पाण्याचा विसर्ग

Dhule Rain : धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. साखरी माळमाथा परिसरात झालेल्या पावसामुळं अक्कलपाडा धरणात देखील जलसाठा वाढला आहे. अक्कलपाडा धरणातून तब्बल 13 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग पांझरा नदी पात्रात करण्यात आला आहे. यामुळं नदीतील पाणी पातळीत वाढ झाली आहे. शहरातील फरशी पूल पाण्याखाली गेला असून काही तासात शहरातील लहान पूल देखील पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. नदीच्या पुलावर एनडीआरएफ तसेच अग्निशामक दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे. नागरिकांनी या ठिकाणी गर्दी करु नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीनं आवाहन करण्यात आलं आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विराट नाचला , रोहितने उड्या मारल्या, भरलेल्या बसमधील सेलिब्रेशन बघाचTeam India Victory Parade : पांड्या, कोहली, हिटमॅन ते द्रविड; टीम इंडियाची विजयी मिरवणूकTeam India Victory Parade : टीम इंडियाची विजयी मिरवणूक; लाखोंचा जनसमुदाय मरिन ड्राईव्हवरTeam India Victory Parade : हिटमॅनची झलक, पांड्याचा स्वॅग;  टीम इंडियाची विजयी मिरवणूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
महायुतीचा 'मुख्यमंत्री'पदाचा चेहरा कोण असेल?; विधानपरिषद मिळताच पंकजांचं आश्चर्यकारक उत्तर
महायुतीचा 'मुख्यमंत्री'पदाचा चेहरा कोण असेल?; विधानपरिषद मिळताच पंकजांचं आश्चर्यकारक उत्तर
Embed widget