एक्स्प्लोर

Maharashtra: पावसाळा आला! विकेंडला फिरायचा प्लॅन करताय? तर 'या' पर्यटनस्थळांना एकदा भेट द्यायलाच हवी

Monsoon: यंदा पावसाळ्याने जूनच्या अखेरीस आपलं डोकं वर काढलं आहे आणि पावसाच्या आगमनाने अनेकांना फिरायला जाण्याचे वेध लागले आहेत. मात्र फिरायला जायचं कुठे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर पाहूया...

Monsoon Tourist Spots: पावसाळा आला की आपल्याला बाहेर फिरायला जाण्याचे (Monsoon Tourist Places) वेध लागतात. आपली पाऊलं घराबाहेर पडतात. पण,  फिरण्यासाठी जायचं नेमकं कुठे? असा प्रश्न सर्वांनाच पडतो. पावसाळ्यात थंड हवेची ठिकाणं, धुक्यात हरवलेला आसमंत आणि गरज चहा आणि कांद्याची भजी खाण्याचा आनंदच वेगळा असतो. हे सर्व अनुभवण्यासाठी तुम्ही काही पर्यटनस्थळांना भेट देऊ शकता. पावसाळ्यात (Monsoon) महाराष्ट्रातील पुढील सहा ठिकाणांना भेट देऊन तुम्ही हिरवागार निसर्ग एक्सप्लोर करू शकता.

लोणावळा, खंडाळा

पुणे-मुंबई महामार्गावर सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावर असलेली ही थंड हवेची ठिकाणं आहेत. मुंबई-पुण्यात राहणाऱ्यांसाठी हे ठिकाण एकदम सोयीचं पर्यटनस्थळ आहे. टायगर पॉईंट, लायन पॉईंट, भुशी डॅम, वाळवळ डॅम ही लोणावळ्यातील प्रसिद्ध ठिकाणं आहेत. लोणावळा-खंडाळ्याचा हिरवागार निसर्ग, थंड हवा, डोंगरमाथ्यावरुन कोसळणारे धबधबे आणि दाट धुकं ही पर्यटकांना आकर्षित करणारी बाब आहे. हे सारं निसर्ग सौंदर्य पाहून मनाला सुखद वाटतं. म्हणूनच या ठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते.

माथेरान

पावसाळ्यात माथेरानमध्ये ट्रेकिंग करण्याची आणि तिथलं वन सौंदर्य पाहण्याची मज्जाच वेगळी असते. माथेरानचा संपूर्ण माथा हा घनदाट झाडी आणि लाल पायवाटांनी भरलेला आहे. शार्लोट लेक, पॅनारोमा पॉईंट, लुईझा पॉईंट, सनसेट पॉईंट अशा अनेक ठिकाणांवरुन दिसणारी डोंगरदऱ्यांची दृश्य मनाला भुरळ घालतात. मुंबई आणि पुण्याच्या पर्यटकांसाठी माथेरान हे सोयीचं ठिकाण आहे. माथेरानच्या माथ्यावर राहण्याची सोय देखील आहे. विविध हॉटेल्समध्ये तुम्ही राहायला देखील जाऊ शकता. पर्यावरणमुक्त हिल स्टेशन अशी ओळख असलेल्या माथेरानमध्ये पर्यटक सुट्टीचा खरा आनंद घेऊ शकतात. मुंबईपासून 110 किलोमीटर अंतरावर आहे.

माळशेज घाट

 माळशेज घाटाचं निसर्ग सौंदर्य हे पावसाळ्याच्या दिवसांत आणखी खुलतं. या पावसाळ्यात तुम्हाला खरी मजा घ्यायची असेल तर माळशेज घाटाला नक्की भेट द्या. पावसाच्या सरी अंगावर झेलत आणि ढगांच्या ओलसर धुकट वातावरणात हरवून जाण्यात खूपच मजा वाटते. ना शहर ना गाव, फक्त हिरव्यागार झाडांमधून जाणारा घाट रस्ता, ही आहे माळशेज घाटाची ओळख. पावसाळ्यात भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी माळशेज घाट हे एक ठिकाण आहे. मोहक वळणदार रस्त्यांपासून ते हिरवी चादर घातलेल्या उंच पर्वतांपर्यंत हे एक उत्तम ठिकाण आहे. माळशेज घाटातील बरीचशी वळणं आणि बरीचशी ठिकाणं पृथ्वीवरील स्वर्गासारखीच वाटतात.

इगतपुरी

रस्त्यालगत धबधबे, हिरव्यागार पर्वतरांगा आणि थंड वातावरणाचा आनंद घ्यायचा असेल तर इगतपुरी हे एक उत्तम ठिकाण आहे. विविध धरणं आणि धबधब्यांचं हे माहेर घर आहे. इगतपुरीचा उल्लेख फॉग सिटी असा देखील केला जातो. पावसाळ्यात इगतपुरीचं वातावरण मनमोहक असतं. निसर्गप्रेमींसाठी हे आश्रयस्थान आहे.

इगतपुरीत विविध धबधबे आणि गडकिल्ले आहेत. छायाचित्रकार आणि चित्रपट निर्मात्यांसाठी इगतपुरी हे एक स्वप्नवत ठिकाण आहे. पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी बहुतांश लोक इगतपुरीतील या विविध ठिकाणांना भेट देतात. पावसाळा आला की भंडारदरा धरण, कळसूबाई शिखर, भावली धरण, भावली धबधबा, सांधण व्हॅली, कसारा घाट ही काही स्थळं पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात.

भीमाशंकर

पावसाळ्यात भीमाशंकरला भेट दिल्यास येथील आल्हाददायक निसर्गसौंदर्याचा पुरेपूर आनंद घेता येतो. भीमाशंकरचं जंगल, सदाबहार अभयारण्य, हिरवा निसर्ग, भोवतालच्या नद्यांचा हा परिसर पर्यटकांचे मन आकर्षित करतो. पावसाळा आला की जंगलप्रेमी, ट्रेकर्स, पक्षीनिरीक्षक अशा सर्वांना भीमाशंकरच्या वाटा कायम खुणावत असतात. देवस्थान, हिल स्टेशन आणि वन्य प्राणी यांची संपदा असलेलं भीमाशंकर हे नैसर्गिक पर्यटनस्थळ आहे, येथील मनमोहक परिसर तुमच्या डोळ्यांचे पारणे फेडतो. महाराष्ट्राचा वन्य प्राणी शेकरु हा दुर्मिळ वन्य जीव येथे आढळतो. पावसाळ्यात हिरव्या निसर्गाचा आनंद घ्यायचा असल्यास भीमाशंकर हे उत्तम ठिकाण आहे.

आंबोली घाट

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे महाराष्ट्राची राणी म्हणून ओळखलं जाणारं हिल स्टेशन आहे. पावसाळ्यात या ठिकाणची शोभा आणखी वाढते. आंबोली घाटातील वातावरण थंड, शांत आणि प्रसन्न असतं. आंबोली घाट हा पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. हिरण्यकेशी धबधबा, आंबोली धबधबा आणि नांगरतास धबधबा हे पर्यटकांची प्रमुख ठिकाणं आहेत. आंबोलीपासून जवळच इतरही प्रसिद्ध पर्यटनस्थळं आहेत.

धबधब्यांव्यतिरिक्त आंबोली घाट समृद्ध जैवविविधतेसाठी देखील ओळखला जातो. घाटावर अनेक प्रजातींचे पक्षी, फुलपाखरं आढळतात. सनसेट पॉईंट हा घाटाच्या मुख्य आकर्षणापैकी एक आहे, येथून संपूर्ण घाटमाथ्याचे, दऱ्यांचे आणि टेकड्यांचे सुंदर दृश्य दिसते. पावसाळ्यात आंबोली घाटात मुसळधार पाऊस पडतो, ज्यामुळे संपूर्ण परिसर हिरव्यागार नंदनवनात बदलतो. आंबोली घाटातील दाट धुक्यात हरवून जाण्याची मज्जा एकदा तरी अनुभवण्यासारखी आहे.

हेही वाचा:

Monsoon : मान्सून मुंबईच्या वेशीवर दाखल, मोसमी वारे अलिबागपर्यंत सक्रिय; भारतीय हवामान विभागाची घोषणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis : कोण-कोणाला भेटलं यावर राजकारण नको : देवेंद्र फडणवीसSushma Andhare  : पापाचे भागीदार होऊ नये म्हणून दादा सावध भूमिका घेत असतील : सुषमा अंधारेAjit Pawar On Dhananjay Munde : राजीनामा द्यायचा की नाही धनंजय मुंडेंनी ठरवावं : अजित पवारNCP News : शरद पवारांचा आमदार अजित पवारांच्या भेटीला, संदीप क्षीरसागरांना घेतली दादांची भेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
Jaya Kishori on Mahakumbh : 'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
Elon Musk : अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
Nashik Crime : चॉपरने केक कापणं भोवलं, 'बर्थडे बॉय'ला नाशिक पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा
चॉपरने केक कापणं भोवलं, 'बर्थडे बॉय'ला नाशिक पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.