Chiplun : विघ्नहर्त्याच्या आगमनाची तयारी, मात्र महापुराची भीती आजही: चिपळूणात यंदा गणेशमूर्ती शाळा बाल्कनी, टेरेसवर
Chiplun News : गतवर्षीच्या महापुराची भीती आजही चिपळूणकरांच्या मनामध्ये आहे. नदीकाठचे रहिवासी आजही रात्र रात्र जागून काढत आहेत.
Chiplun News : एकीकडे धोधो पाऊस पडत होता तर दुसरीकडे या मुसळधार पावसामुळे वशिष्टी नदीपात्राचे पाणी वाढत होते. 22 जुलै 2021 रोजी आलेल्या महापुराने चिपळूण शहर उध्वस्त केले. शहरात वशिष्ठी नदीच्या पुराचे पाणी शिरले क्षणांतच होत्याच नव्हतं झाले. त्यात अनेकांचा संसार वाहून गेला तर काहींची घरें उध्वस्त झाली तर बाजारपेठेचेही मोठ नुकसान झालं. गतवर्षीच्या महापुराची भीती आजही चिपळूणकरांच्या मनामध्ये आहे. नदीकाठचे रहिवासी आजही रात्र रात्र जागून काढत आहेत. तर गतवर्षीच्या महापूरात चिपळूणकरांचे प्रचंड नुकसान झाले होते.
गणपती कारखानदारांना मोठा फटका
गेल्या वर्षीच्या महापुरामुळे मुरादपुर पेठमाप भागातील 5 गणपती कारखानदारांना मोठा फटका बसला. या महापुरात 200 पेक्षा जास्त गणेशमूर्ती वाहून जाऊन सुमारे 24 लाखांचे नुकसान झाले होते. त्यामुळे यावर्षी गणपती कारखानदार अलर्ट झाले असून त्यांनी यावर्षी आपल्या गणेशमूर्ती कार्यशाळा आपल्या वरच्या मजल्यावर थाटल्या आहेत. गेल्या वर्षी प्रशासनाने आम्हांला वेळीस सूचना दिल्या असत्या तर आमच्या कारखान्याचे नुकसान झाले नसते. पहाटे झोपलेले असतांनाच पाणी भरायला सुरुवात झाली..त्यावेळी कार्यशाळेतील गणेशमुर्ती मातीला मिळाल्या. या मुर्ती दीर्घ काळ पाण्यात राहिल्यानें पाण्यात सर्व गणेशमुर्ती विरघळल्या, राहिली फक्त माती.. यावर्षी मात्र गणेशमूर्ती कारखाने हे बाल्कनी टेरेसवर नेण्यात आले आहेत. आता यंदाच्या पावसाकडे चिपळूणकरांच्या नजरा लागल्या आहेत.
विघ्नहर्त्याच्या आगमनाची तयारी, मात्र महापुराची भीती आजही
त्रिमूर्ती गणेश कारखान्यात जवळपास सर्वच मातीच्या गणेशमूर्ती असल्याने गेल्या वर्षीच्या महापुराच्या पाण्यात सर्वच मुर्ती विरघळल्या आणि राहिली फक्तं मातीच. त्यामुळे यावर्षी खाली असलेला कारखाना वर घेतला आहे. अचानक पाणी शिरले तर या मुर्ती हलवण्यात वेळ जातो, त्यासाठी सौरभने आपल्या कारखान्यात एक ट्रॉली स्वतः बनवून त्यातूनच खालून वरती गणेशमूर्तीची ने-आण केली जाते. यावर्षी वशिष्ठी नदीतील गाळ काढण्यात आला आहे. पूर येऊ म्हणजे शासन, प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी, उपाययोजना घेण्यात आल्या आहेत. मात्र गेल्या वर्षीच्या पुराची दहशत कायम आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Rainy season : आनंद पावसाचा, क्षण दक्षतेचा, पावसाळ्यात नेमकी काय काळजी घ्यावी?
- Kolhapur Rain : पंचगंगा नदीचं पाणी पात्रा बाहेर, पाणी पातळी पोहोचली 30 फुटांच्या वर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा