(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Breaking News LIVE Updates: पुणे सोलापूर हायवेवर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, तीन जण जखमी
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
26/11 Mumbai Attack : 26 नोव्हेंबर 2008... काळरात्र ठरलेला दिवस; थरारक, वेदनादायी आठवणी कायम
26/11 Mumbai Attack : 26 नोव्हेंबर 2008... मुंबईला हादरवणारा दिवस. आजही मागे वळून पाहिलं तर अंगावर काटा येतो. आज या हल्ल्याला तेरा वर्ष पूर्ण झाली आहे. तरिदेखील या हल्ल्याच्या आठवणी मात्र प्रत्येक मुंबईकराच्या मनात ताज्याच आहेत. दहशतवाद्यांनी मुंबई वेठीस धरली होती. 26/11 मुंबई हल्ल्याच्या थरारक, वेदनादायी, कटू आठवणी आजही प्रत्येक मुंबईकर आणि भारतीयांच्या मनात कायम आहेत.
स्वातंत्र्यानंतर देश अनेक दहशतवादी हल्ल्यांचा साक्षीदार बनला आहे. याच हल्ल्यांमध्ये मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचाही समावेश आहे. 26 नोव्हेंबर 2008 हा दिवस मुंबईसाठी काळा दिवस ठरला होता. समुद्रमार्गाने आलेल्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मुंबईला वेठीस धरलं होतं. आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात त्या दिवसाच्या जखमा ओल्या आहेत. या घटनेला आज 13 वर्ष पूर्ण झाली आहेत. आज संपूर्ण देश दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करत आहे. या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 166 लोक मृत्यूमुखी पडले होते, तर 300 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते.
26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा परिणाम संपूर्ण जगभरात पाहायला मिळाले. या हल्ल्यात भारतीयांसह अनेक परदेशी नारिकांचाही मृत्यू झाला होता. मुंबई हल्ल्याने संपूर्ण जग हादरलं होतं. 2008 मध्ये पाकिस्तानमधून दहा दहशतवादी समुद्राच्या मार्गे मुंबईत घुसले होते. लष्कर ए तोयबाच्या या अतिरेक्यांनी मुंबईची शान म्हणून ओळख असेलल्या ताज हॉटेलसह सहा ठिकाणी हल्ला केला होता, ज्यात 160 हून अधिक निरपराधांचे प्राण गेले होते.
Constitution Day : आज संविधान दिन... का साजरा केला जातो हा दिवस? इतिहास आणि रंजक गोष्टी
Constitution Day : 26 नोव्हेंबर, 1949 आणि 26 जानेवारी, 1950, भारतीय संविधानाच्या इतिहासातील हा दोन महत्त्वाच्या तारखा आहेत. 26 नोव्हेंबर, 1949 रोजी आपण संविधानाचा स्वीकार केला होता तर 26 जानेवारी, 1950 रोजी तो लागू करण्यात आलं. संविधान ज्या दिवशी स्वीकारलं त्या तारखेला म्हणजे 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जातो आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन. भारत सरकारने 2015 मध्ये 'संविधान दिन' साजरा करण्यास सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि संविधानाच्या महत्त्वाचा प्रसार करण्यासाठी 'संविधान दिन' साजरा केला जातो. आज संविधान दिनाच्या निमित्ताने आपलं संविधान कसं तयार केलं म्हणजेच त्याचा इतिहास काय आहे आणि याच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेऊया...
1946 मध्ये ब्रिटिशांनी भारताला स्वतंत्र करण्याबाबत गांभीर्याने विचार सुरु केला. ब्रिटीश सरकारने एक कॅबिनेट मिशन भारतात पाठवल्यानंतर याची सुरुवात झाली. कॅबिनेट मिशनला ब्रिटीश सरकार आणि भारताच्या विविध राज्यांच्या प्रतिनिधींना भेटायचं होतं. या प्रतिनिधींना भेटून भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्याच्या हेतूने, संविधान सभेच्या स्थापनेबाबत चर्चा करायची होती.
पुणे- सोलापूर हायवेवर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, तीन जण जखमी
पुणे- सोलापूर हायवेवर भीषण अपघात घडलाय. दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसी परिसरात सायंकाळी सात वाजताच्या सुमारास रस्ता ओलंडणाऱ्या नागरिकांना अज्ञात वाहनानं धडक दिलीय. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झालाय. तर, तीन जण जखमी झाल्याची माहिती समोर आलीय. जखमींवर दौंड मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये एक मुलगा, एक मुलगी आणि एका महिलेचा समावेश आहे.
परळीतील वैद्यनाथ मंदिर उडवून देण्याची धमकी
वैद्यनाथ मंदिर संस्थान कडे खूप पैसे आले आहेत 50 लाख रुपये द्या अन्यथा आर .डी .एक्स ने मंदिर उडवून देवू असे धमकी देणारे पत्र मुख्य विश्वस्त च्या नावाने आले आहे.
12 ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे राजेश देशमुख हे सचिव आहेत. त्यांना एक पत्र मिळालं ज्यामध्ये वैद्यनाथ मंदिर संस्थान कडे खूप पैसे आले आहेत. 50 लाख रुपये द्या अन्यथा आर डी एक्सने मंदिर उडवून देऊ असा मजकूर लिहलेला आहे.
एमपीएससीच्या अध्यक्षपदी किशोर राजे-निंबाळकर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदावर किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती निंबाळकर यांनी पदांचा कार्यभार स्वीकारल्यापासून 6 वर्षासाठी किंवा वयाची 62 वर्षे वय होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी राहील,असेही नमूद करण्यात आले आहे.
राज्यात आतापर्यंत 37 अंशतः डेपो सुरू
एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलगीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. राज्यातील अनेक जिल्ह्यातून राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला जातोय. याचपार्श्वभूमीवर राज्यातील 37 अंशतः डेपो आता सुरू झाल्याची माहिती समोर आलीय.
91 टक्के ठाणेकर नागरिकांमध्ये आढळली प्रतिपिंडे
कोविड 19 च्या लसीकरणानंतर नागरिकांमध्ये प्रतिपिंडे (ॲण्टीबॉडीज) तयार झाल्या आहेत किंवा नाहीत याचे सिरोसर्व्हिलन्स सर्वेक्षण प्रातिनिधीक स्वरुपात महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार 91 टक्के ठाणेकर नागरिकांमध्ये प्रतिपिंडे आढळून आल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. जरी नागरिकांमध्ये समाधानकारक प्रतिपिंडे तयार झाली असली तरी देखील नागरिकांनी मास्क व सॅनिटायझर लावणे, वारंवार हात स्वच्छ करणे, सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे तसेच घरामध्ये व ऑफिसमध्ये खेळती हवा ठेवणे याचे पालन करण्याचे आवाहन महापौर व आयुक्तांनी नागरिकांना केले आहे.