(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Breaking News LIVE Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी रस्त्यावर, मोठा पोलिस बंदोबस्त तैनात
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Coronavirus : चिंता वाढली! देशभरात Omicronचा कम्युनिटी स्प्रेड; वाढती रुग्णसंख्या, WHO म्हणतं...
Coronavirus Update : कोरोना व्हायरस (Coronavirus) नं गेल्या दोन वर्षांत सर्वांची धाकधुक वाढवली आहे. आतापर्यंत या व्हायरसबाबत अनेकांच्या मनात अनेक समज-गैरसमज निर्माण झाले आहेत. काही लोकांचा तर असाही समज आहे की, कोरोना पर्व आता संपलं आहे. पण हा समज चुकीचा आहे. कारण देशात दररोज 3 लाखांहून अधिक दैनंदिन रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांची झपाट्यानं वाढ होत आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगानं WHO नं नवा इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओ म्हणतं की, कोरोनाचा ओमायक्रॉन हा शेवटचा व्हेरियंट नाही, BA.2 सारखे स्ट्रेन भविष्यात अनेक दिसून येतील. भारतासाठी चिंतेची बाब म्हणजे, ओमायक्रॉन व्हेरिएंट आता देशात कम्युनिटी ट्रान्समिशनच्या टप्प्यावर पोहोचला आहे. याचा अर्थ असा आहे की, कोणतीही व्यक्ती, संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात न येता किंवा संक्रमित ठिकाणी भेट न देता, कोरोना पॉझिटिव्ह होईल.
6 फेब्रुवारीपासून कोरोनाचा जोर वाढणार
पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी रस्त्यावर, मोठा पोलिस बंदोबस्त तैनात
पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आंदोलनाच्या तयारीत आहे. मोठ्या संख्येने विद्यार्थी सध्या रस्त्यावर उतरले आहेत. मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे.
मुंबई महापालिकेत भाजप स्वबळावर लढणार
मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार आहे. मनसेसोबत युती न करण्याचा पक्षाचा निर्णय झाला आहे. आरपीआय आणि इतर छोट्या पक्षांना सोबत घेण्याचं भाजपने ठरवलं आहे.
झारखंडच्या काँग्रेस जनरल सेक्रेटरीपदी अविनाश पांडे यांची नियुक्ती
झारखंड काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरीपदी अविनाश पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या संबंधीचे पत्रक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव केसी वेणुगोपाल यांनी काढलं आहे.
वर्धा जिल्ह्यातील सेलसुरा अपघातातील मृतांबाबत मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
वर्धा जिल्ह्यातील सेलसुरा जवळ मोटार नदीत कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघातातील मृतांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना प्रकट केली आहे. मृतांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या तरुणांचा समावेश होता. अशा होतकरू तरुणांचा मृत्यू दुर्दैवी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोठा आघात असल्याचे नमूद करून, मुख्यमंत्री ठाकरे यांनी सहवेदनाही प्रकट केली आहे.
बार्शीतल्या फटे स्कॅम प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल फटे याला न्यायालयीन कोठडी
बार्शी येथील फटे स्कॅम प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल फटे याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. 27 जानेवारीपर्यंत असलेली पोलीस कोठडी संपण्याआधीच पोलिसांनी घेतली न्यायालयीन कोठडी. 8 दिवसांच्या पोलीस कोठडीत मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करणे आवश्यक, त्यामुळे पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवत पोलिसांनी मागितली न्यायालयीन कोठडी. बार्शी सत्र न्यायालयाकडून विशाल फटे याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर