(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Breaking News LIVE Updates : कसई दोडामार्ग नगरपंचायतमध्ये शिवसेनेचा धुव्वा, तालुका कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
INS Ranvir explosion : मुंबईत INS रणवीर युद्धनौकेवर स्फोट, तीन जवान शहीद
मुंबई : मुंबईत INS रणवीर युद्धनौकेवर स्फोट (INS Ranvir explosion) झाल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत तीन जवान शहीद झाले आहेत.नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे आज INS रणवीरच्या अंतर्गत (इंटर्नल) कंपार्टमेंटमध्ये हा स्फोट झाला आहे. जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ प्रतिसाद देत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. कोणतीही मोठी भौतिक हानी झाल्याचे माहिती नसली तरी तीन नौदल जवान यामध्ये शहीद झाले आहेत.
या घटनेत दहा जवान जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी जवानांवर कोलाबा नेवी नगर येथील INHS अश्विनी येथे दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा तपास करण्यासाठी बोर्ड ऑफ इंक्वायरीचे आदेश दिले आहेत.
INS रणवीर युद्धनौका नोव्हेंबर 2021 पासून पूर्व नौदल कमांडकडून क्रॉस कोस्ट ऑपरेशनवर तैनातीवर होती आणि लवकरच बेस पोर्टवर परत येणार होती. या युद्धनौकेवर नेमका कोणत्या कारणाने झाला याचा तपास करण्यासाठी चौकशी मंडळाला आदेश देण्यात आला आहे.
मुंब्रा स्टेशनजवळ मध्य रेल्वेच्या ट्रॅक शेजारी राहणाऱ्या लोकांना नोटीस पाठवून 7 दिवसात घर खाली करण्याचे आदेश मध्य रेल्वेने दिले आहेत. त्याच्याच विरोधात स्थानिक आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज ट्विट केले आहे. या लोकांची पर्यायी व्यवस्था आधी करा मगच घरे खाली करा, अन्यथा आम्ही त्या लोकांसोबत उभे राहू, असा इशाराच आव्हाड यांनी मध्य रेल्वेला दिला आहे.
दुसरीकडे खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील रावसाहेब दानवे यांना ट्वीट करून कल्याण, डोंबिवली आणि कळवा इथे आलेल्या नोटिशीबद्दल विचारणा केली आहे. यासंदर्भात स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाची एकत्रित बैठक लावावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
रेल्वने परवा या भागातील बिल्डिंग आणि चाळीतील घरांना नोटीस दिल्या आहेत. ज्या ठिकाणी ते राहतात ती मध्य रेल्वेची जागा असून, अनधिकृत पणे या लोकांनी वास्तव्य केले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या ट्रॅकला धोका होऊ शकतोस असे नोटिशीमध्ये म्हटले आहे.
कसई दोडामार्ग नगरपंचायतमध्ये शिवसेनेचा धुव्वा, तालुका कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कसई दोडामार्ग नगरपंचायत निवडणूक निकालाचे पडसाद पडले असून दोडामार्ग शिवसेना तालुका कार्यकारिणी पूर्णपणे बरखास्त करण्यात आली आहे. जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी कार्यकारिणी बरखास्त केल्याची माहिती दिलीय. जिल्ह्यातील इतर नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेला चांगले यश मात्र कसई दोडामार्ग नगरपंचायतमध्ये मात्र शिवसेनेचा धुव्वा उडाला आहे. कसई दोडामार्ग नगरपंचायत मधील पराभवाची शिवसेनेकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. शिवसेनेला कसई दोडामार्ग नगरपंचायतमध्ये अवघ्या दोन जागी विजय मिळाला आहे. याचा तालुका कार्यकारिणीवर ठपका ठेवत तालुका प्रमुखांसह पूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर रेंजमधील चेनाजवळ तीन वर्षीय नर बिबट्या मृतावस्थेत आढळला
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर रेंजमधील चेनाजवळ तीन वर्षीय नर बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. हा सी-40 बिबट्या उंचीवरुन पडल्याने त्याचे यकृत फाटून अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलंय. यासंबंधीचा अधिक तपास सुरु असल्याचं वनविभागाकडून सांगण्यात आलंय
राज्यातील 3 जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये 100 कोटींचा भष्ट्राचार, किरीट सोमय्यांचा राज्य सरकारवर आरोप
राज्यातील तीन जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये तब्बल 100 कोटी रुपयांचा भष्ट्राचार झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. उद्धव ठाकरे पीएमआरडीएचे चेअरमन आहेत, त्यांच्यामुळे लाईफ लाईन हॉस्पिटल सर्व्हिसेस मॅनेजमेंटला जम्बो कोविड सेंटरच काम देण्यात आलं. असंही ते म्हणाले.
मुंबई कॉंग्रेसचा उद्या इगतपुरी येथे कार्यकर्ता मेळावा
मुंबई कॉंग्रेसचा उद्या इगतपुरी येथे कार्यकर्ता मेळावा आहे. महाराष्ट्र कॉंग्रेस प्रभारी एच.के पाटील त्याकरता येणार आहेत
आठवडी बाजार बंद केला म्हणून भाजीवाले संतप्त, भाज्या फेकल्या रस्त्यावर
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बीड जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. याच निर्णयाच्या विरोधात आज माजलगावमध्ये संतप्त झालेल्या भाजी विक्रेत्यांनी विक्रीसाठी आणलेल्या भाजा रस्त्यावर फेकून दिल्या.