Breaking : Punjab Election 2022: पंजाब विधानसभा निवडणुकीची तारीख बदलली, आता 20 फेब्रुवारीला होणार मतदान
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
उदय सामंतांच्या बंगल्याबाहेर भाजयुमोच्या महिला कार्यकर्त्यांचं पहाटेच आंदोलन, विद्यापीठ कायद्याविरोधात आक्रमक
Mumbai BJP Yuva Morcha Agitation : उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या बंगल्याच्या बाहेर भाजप युवा मोर्चाच्या महिला कार्यकर्त्यांनी सकाळी 5 वाजल्यापासून आंदोलन सुरु केलं. विद्यापीठ कायद्याविरोधात भाजप युवा मोर्चाच्या महिला कार्यकर्त्यांनी पहाटे 5 वाजता मंत्रालयासमोरील मंत्री उदय सामंत यांच्या घराबाहेर रांगोळी काढून निदर्शनं केली. यावेळी पोस्टरवरून पोलीस आणि भाजप महिला कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यावेळी महिलांनी महाराष्ट्र सरकारविरोधात घोषणाही दिल्या. आंदोलनादरम्यान भाजप युवा महिला मोर्चाच्या काही महिला कार्यकर्त्यांना मरीन ड्राइव्ह पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महिला कार्यकर्त्यांनी राज्य सरकारला धमकी देत विद्यापीठ कायद्यात बदल न केल्यास आगामी काळात महाविकास आघाडी सरकारमधील प्रत्येक आमदार, खासदार, मंत्री यांच्या घराबाहेर आम्ही आंदोलन करु, असं सांगितलं.
महाविकास आघाडी सरकारनं हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विद्यापीठ सुधारणा विधेयक संमत केल्यामुळं भाजपचे युवा कार्यकर्ते पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच निषेधार्थ महाविकास आघाडी सरकार विरोधात मंत्री उदय सामंत यांच्या मंत्रालयाच्या समोर असलेला बंगल्या बाहेर आज पहाटे 5 वाजता भाजपाच्या युवा वतीने रांगोळी काढून आंदोलन करण्यात आलं.
Davos Agenda Summit : आजपासून दाओस परिषद; पंतप्रधान मोदींचं आज विशेष संबोधन
Davos Agenda 2022 : आजपासून दावोस परिषदेला सुरूवात होणार आहे. ही परिषद पाच दिवस चालणार आहे. जगभरातल्या देशांसाठी आणि उद्योगपतींसाठी महत्त्वाची असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (World Economic Forum) दाओस परिषदेचे या वर्षी ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील सहभाग घेणार आहेत. आज सोमवारी, भारतीय वेळेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री 8:30 वाजता जागतिक आर्थिक मंचाच्या दाओस बैठकीत ‘जागतिक परिस्थिती' या विषयावर विशेष भाषण करणार आहेत.
Shakambhari Purnima : आज शाकंभरी पौर्णिमा, मांढरदेवी गडावरील काळूबाईची यात्रा, कोरोनामुळं भाविकांना बंदी
shakambhari purnima in 2022 : आज शाकंभरी पौर्णिमा. महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी गडावरील काळूबाईची यात्रा (Mandhardevi Gad Kalubai Yatra) शाकंभरी पोर्णिमेला भरते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षापासून या गडावरच्या काळूबाईची यात्रा भरवण्यास शासनाने बंदी घातली होती. त्यात यंदाच्या वर्षी काळूबाईचे दर्शन होईल असं भाविकांना वाटत होतं. मात्र ओमायक्रॉनमुळे यंदाच्याही वर्षी मांढरदेवी गडावर यात्रेच्या दिवशी येण्यास भाविकांना बंदी घालण्यात आली आहे.
खामगाव - जालना मार्गावरील पेठ येथे भरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रकच्या धडकेत पत्रकार ठार
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव जालना मार्गावरील पेठ फाट्यावर सकाळच्या सुमारास चिखलीकडून खामगावकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने पत्रकार जयदेव शेळकेंना जोरदार धडक दिली आहे. या धडकेत जयदेव यांच्या मेंदुला गंभीर मार लागला असून डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केलं आहे.
Punjab Election 2022: पंजाब विधानसभा निवडणुकीची तारीख बदलली, आता 20 फेब्रुवारीला होणार मतदान
Punjab Election 2022: पंजाब विधानसभा निवडणुकीची तारीख बदलली, आता 20 फेब्रुवारीला होणार मतदान
राज्य सरकारला हायकोर्टाचा मोठा दिलासा, 'बीएमसी'तील वॉर्ड संख्या वाढवण्याच्या निर्णयाविरोधातील याचिका फेटाळली
राज्य सरकारला हायकोर्टाचा मोठा दिलासा, 'बीएमसी'तील वॉर्ड संख्या वाढवण्याच्या निर्णयाविरोधातील याचिका फेटाळली
वॉर्ड संख्या 227 वरून 236 करण्याच्या राज्य सरकारच्या आदेशाला भाजप नगरसेवकांनी दिलं होतं आव्हान
भाजप आमदार नितेश राणेंना हायकोर्टाचा दणका, नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं नाकारला, मात्र मनिष दळवींना हायकोर्टाकडनं अटकपूर्व जामीन मंजूर
भाजप आमदार नितेश राणेंना हायकोर्टाचा दणका, नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं नाकारला, मात्र मनिष दळवींना हायकोर्टाकडनं अटकपूर्व जामीन मंजूर
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक काळात संतोष परब यांच्यावरील हल्याचं प्रकरण
परभणी राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह
राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य बाबाजानी दुर्राणी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.बाबाजानी यांना कोरोना होण्याची ही दुसरी वेळ असुन त्यांची प्रकृती चांगली असून ते घरीच विलगीकरणात असल्याचे त्यांनी सांगितले असुन त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी ही तपासणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.