Maharashtra Breaking News LIVE Updates : ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे निधन
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Background
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लशीच्या कॉकटेल डोसचा परिणाम काय? रुग्णालयाच्या चाचणीत केला मोठा दावा
Coronavirus Precaution देशभरात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकार, प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. कोरोना महासाथीच्या वाढत्या प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून बुस्टर डोस (Precaution) लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात येणार आहे. त्याआधीच हैदराबाद येथील एआयजी रुग्णालयाने महत्त्वाचा दावा केला आहे.
कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लशीचा कॉकटेल डोस अधिक प्रभावी ठरणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
हैदराबाद येथील AIG रुग्णालयात झालेल्या संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड लशीचा एक-एक डोस Mix&Match पद्धतीने देण्यात आल्यानंतर तब्बल चारपटीने अॅण्टीबॉडी विकसित झाल्या आहेत. रुग्णालयाच्या तज्ज्ञांनी म्हटले की, 10 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या बुस्टर डोस (Precaution) लसीकरण मोहिमेत या कॉकटेल डोसचा वापर केल्यास अधिक फायदा होईल असा दावा करण्यात आला आहे. हे संशोधन ICMR ला सोपवण्यात येणार आहे.
Covid Vaccination : देशात 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आज या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा दुसरा दिवस आहे. सोमवारी पहिल्या दिवशी जवळपास 40 लाख मुलांना कोरोनाची लस देण्यात आली. तर आतापर्यंत 54 लाखांहून अधिक मुलांनी लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन केलं आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्वीट केलं आहे की, रात्री 8 वाजता जारी करण्यात आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, 40 लाखांहून अधिक मुलांनी पहिल्या दिवशी कोरोनाची लस घेतली आहे. देशभरात 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाच्या पहिल्या दिवशी लसीकरणाच्या आकड्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आनंद व्यक्त केला आणि मुलांचा आत्मविश्वास वाढवला.
पंतप्रधान मोदींनी ट्वीट करत म्हटलं की, "कोविड-19 पासून मुलांचं संरक्षण करण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल पुढे टाकण्यात आलं आहे. 15 ते 18 वर्ष वयोगटातील लसीचा डोस घेणाऱ्या माझ्या सर्व तरुण मित्रांना शुभेच्छा. त्यांच्या कुटुंबियांनाही शुभेच्छा. येत्या काही दिवसांत मी सर्व तरुणांना लसीकरण करून घेण्याची विनंती करतो."
ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे निधन
महाराष्ट्रातील थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यानंतर त्याच ठिकाणी उपचारादरम्यान आज त्यांचं निधन झालं आहे.
सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राने घेतले शनी दर्शन
सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राने शनी दर्शन घेतले आहे. देवस्थानच्या वतीने दोघांचा सत्कारदेखील करण्यात आला आहे. शिल्पा शेट्टी आल्याने शनीशिंगणापूरमध्ये भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे.























