(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona Vaccination Day-2 : 15+ लसीकरणाचा दुसरा दिवस; पहिल्या दिवशी 40 लाख मुलांना लसीचा डोस, आतापर्यंत 54 लाख जणांचं रजिस्ट्रेशन
Covid Vaccination : देशात 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आज या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा दुसरा दिवस आहे. सोमवारी पहिल्या दिवशी जवळपास 40 लाख मुलांना कोरोनाची लस.
Covid Vaccination : देशात 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आज या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा दुसरा दिवस आहे. सोमवारी पहिल्या दिवशी जवळपास 40 लाख मुलांना कोरोनाची लस देण्यात आली. तर आतापर्यंत 54 लाखांहून अधिक मुलांनी लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन केलं आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्वीट केलं आहे की, रात्री 8 वाजता जारी करण्यात आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, 40 लाखांहून अधिक मुलांनी पहिल्या दिवशी कोरोनाची लस घेतली आहे. देशभरात 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाच्या पहिल्या दिवशी लसीकरणाच्या आकड्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आनंद व्यक्त केला आणि मुलांचा आत्मविश्वास वाढवला.
पंतप्रधान मोदींनी ट्वीट करत म्हटलं की, "कोविड-19 पासून मुलांचं संरक्षण करण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल पुढे टाकण्यात आलं आहे. 15 ते 18 वर्ष वयोगटातील लसीचा डोस घेणाऱ्या माझ्या सर्व तरुण मित्रांना शुभेच्छा. त्यांच्या कुटुंबियांनाही शुभेच्छा. येत्या काही दिवसांत मी सर्व तरुणांना लसीकरण करून घेण्याची विनंती करतो."
देशातील महानगरांतील मुलांच्या लसीकरणाचा आकडा
- मुंबईत 5997 मुलांना कोरोना लसीचा पहिला डोस
- दिल्लीत 20,998 मुलांना कोरोना लसीचा पहिला डोस
- देहराडूनमध्ये 8000 मुलांना कोरोना लसीचा पहिला डोस
- मध्यप्रदेशात 10 लाख मुलांना कोरोना लसीचा पहिला डोस
मुलांच्या लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
महाराष्ट्रासह देशभरात 15 ते 18 या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ झाला आहे. पहिल्याच दिवशी लसीकरणाला मुलांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत देशभरातील 37 लाख 84 हजार 212 मुलांनी पहिला डोस घेतला. जालन्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत मुलांच्या लसीकरणाची मोहिम सुरु झाली आहेत. आतापर्यंत 50 लाखांपेक्षा अधिक मुलांनी नोंदणी केली आहे.
मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूरसह राज्याच्या विविध भागात लसीकरण सुरु झालंय. मुंबईत जवळपास नऊ लाख मुलांना लस दिली जाणार आहे. पुण्यात चाळीस तर पिंपरी चिंचवडमध्ये आठ लसीकरण केंद्रावर मुलांचं लसीकरण होणार आहे. नाशिकमध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या उपस्थितीत मुलांचं लसीकरण अभियान सुरु झालंय. शहरी भागासह ग्रामीण भागातही मुलांच्या लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं. त्याचबरोबर मुलांनी न घाबरता कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी असं आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले आहे.
मुलांच्या लसीकरणासाठी स्लॉट कसा बुक कराल? (How To Book COVID-19 Vaccine Slot For Children)
लहान मुलांसाठी COVID-19 वॅक्सिन स्लॉट बुक करण्यासाठी फारसं काही नवीन करण्याची गरज नाही. यापूर्वी लसीकरणासाठी स्लॉट बुक करण्याची जी प्रक्रिया होती तिच फॉलो करावी लागणार आहे. वॅक्सिनचा स्लॉट रजिस्टर करण्यासाठी CoWIN पोर्टल (cowin.gov.in) वर लॉगइन करा. आधार कार्ड किंवा मोबाईल क्रमांकाचा उपयोग करुन रजिस्ट्रेशन करा. विद्यार्थी शाळेच्या आयकार्डचा वापरही करु शकतात.
रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी 3 जानेवरी, 2022 पासून लसीकरणासाठी सेंटर शोधू शकतील. तसेच अपॉइंटमेंट बुक करु शकतील. पोर्टलवर राज्य, जिल्हा किंवा शहरानुसार जवळचं लसीकरण केंद्र उपलब्ध होईल. त्यासोबतच पोर्टलवर Google मॅपवर जवळचं लसीकरण केंद्र शोधता येईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Centre on Covid19 : 50 टक्के कर्मचाऱ्यांनाच कामावर बोलवा, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारची नियमावली
- Fact Check : भारतात मुदत संपलेल्या लसी टोचल्याचा आरोप, आरोग्य मंत्रालयाने दावा फेटाळला
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live