Maharashtra Breaking News LIVE Updates : गोव्यातही काँग्रेस आणि शिवसेनेची युती होणार? गोव्याचे काँग्रेस नेते दिगंबर कामत आणि संजय राऊत यांच्यात बैठक
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Pegasus Spyware Case: पेगासस हेरगिरी प्रकरणी सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचे आवाहन केले आहे. पेगासस स्पायवेअरद्वारे फोन हॅकिंग झाल्याचा संशय असल्यास सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देशातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये याबाबतचे आवाहन करणारी नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. पेगासस स्पायवेअर प्रकरणामुळे भारतासह जगभरात खळबळ उडाली होती.
सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या तांत्रिक समितीने ही नोटीस प्रसिद्ध केली आहे. ज्या नागरिकांना आपल्या मोबाइलमध्ये पेगासस स्पायवेअरद्वारे हल्ला करण्यात आला असल्याचे संशय आहे, त्यांनी 7 जानेवारी 2022 च्या आधी एक ई-मेल पाठवणे गरजेचे असल्याचे प्रसिद्ध केलेल्या नोटिसमध्ये म्हटले आहे.
समितीने म्हटले की, जर, तुम्ही दिलेल्या कारण योग्य वाटल्यास समिती तुमचा मोबाइल तपासणीसाठी मागण्याची विनंती करणार. सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या समितीने म्हटले की, भारताच्या कोणत्याही नागरिकाला इस्रायलच्या एनएसओ ग्रुपच्या पेगासस स्पायवेअरचा वापर करून मोबाइल हॅक केला असल्याचा संशय असल्यास त्यांनी सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या समितीसोबत संपर्क करावा.
गोव्यातही काँग्रेस आणि शिवसेनेची युती होणार?
गोव्यातही काँग्रेस आणि शिवसेनेची युती होणार असल्याची शक्यता आहे. गोव्याचे काँग्रेस नेते दिगंबर कामत आणि संजय राऊत यांच्यात बैठक सुरू आहे. गोव्यात सात जागेंची शिवसेनेची काँग्रेसकडे मागणी आहे.
पुण्यात गेल्या 24 तासात 444 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 120 रुग्णांनी केली कोरोनावर मात
पुण्यात गेल्या 24 तासात 444 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 120 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 511585 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात एकाही कोरनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला नाही. सध्या पुण्यात 2838 सक्रिय रुग्ण आहेत. आज पुण्यात 6573 नागरिकांची स्वॅब तपासणी झाली आहे.
29 आणि 30 जानेवारी रोजी होणारी म्हाडाची परीक्षा पुढे ढकलली
29 आणि 30 जानेवारी रोजी नियोजित म्हाडा सरळ सेवा भरती परीक्षा 2021-22 पुढे ढकलण्यात आली आहे. आज एमपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या जानेवारी महिन्यातील तीन परीक्षेचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले. त्यात अनेक उमेदवारांना एमपीएससी व म्हाडा प्राधिकरणाच्या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे म्हाडा प्राधिकरणाची क्लस्टर 6 मधील सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, टंकलेखक या संवर्गकरिता 29 आणि 30 जानेवारी या दिवशी सहा सत्रांमध्ये होणारी म्हाडा ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकरच म्हाडा संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.
Maharashtra Breaking News LIVE Updates : भंडारा जिल्ह्यातील तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांचा जामीन अर्ज नामंजूर
भंडारा जिल्ह्यातील तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांचा जामीन अर्ज नामंजूर, व्यापारी मित्रांना मारहाण झाल्यानंतर पोलीस ठाण्यात घातला होता गोंधळ. या प्रकरणी आज दुपारी झाली होती अटक
नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 216 कोरोना पॉझिटिव्ह
नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 216 कोरोना पॉझिटिव्ह
नाशिक शहरातील 151 जणांना लागण, दोघांचा मृत्यू
गेल्या दोन चार दिवसात सातत्याने वाढ
मागील 3 महिन्यातील सर्वाधिक वाढ