एक्स्प्लोर

Pegasus Spyware Case: सुप्रीम कोर्टाचे आवाहन, पेगासस हेरगिरी प्रकरणात हॅकिंग झाल्याचा संशय असल्यास...

Pegasus Probe: पेगासस हेरगिरी प्रकरणाच्या चौकशीसाठी सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या समितीने नागरिकांना आवाहन केले आहे.

Pegasus Spyware Case: पेगासस हेरगिरी प्रकरणी सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचे आवाहन केले आहे. पेगासस स्पायवेअरद्वारे फोन हॅकिंग झाल्याचा संशय असल्यास सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देशातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये याबाबतचे आवाहन करणारी नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. पेगासस स्पायवेअर प्रकरणामुळे भारतासह जगभरात खळबळ उडाली होती. 

सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या तांत्रिक समितीने ही नोटीस प्रसिद्ध केली आहे. ज्या नागरिकांना आपल्या मोबाइलमध्ये पेगासस स्पायवेअरद्वारे हल्ला करण्यात आला असल्याचे संशय आहे, त्यांनी 7 जानेवारी 2022 च्या आधी एक ई-मेल पाठवणे गरजेचे असल्याचे प्रसिद्ध केलेल्या नोटिसमध्ये म्हटले आहे. 

समितीने म्हटले की, जर, तुम्ही दिलेल्या कारण योग्य वाटल्यास समिती तुमचा मोबाइल तपासणीसाठी मागण्याची विनंती करणार. सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या समितीने म्हटले की, भारताच्या कोणत्याही नागरिकाला इस्रायलच्या एनएसओ ग्रुपच्या पेगासस स्पायवेअरचा वापर करून मोबाइल हॅक केला असल्याचा संशय असल्यास त्यांनी सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या समितीसोबत संपर्क करावा. 

नोटीसमध्ये म्हटले की, तुमचा मोबाइल पेगासस स्पायवेअरद्वारे का हॅक करण्यात आला असावा, तुमचा मोबाइल तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या समितीकडे तपासणीसाठी देण्याच्या स्थितीत आहे का, आदी विचारणाही करण्यात आली आहे. 

मोबाइल जमा करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाच्या समितीकडून एक पावती देण्यात येणार असून एक डिजीटल फोटोदेखील देण्यात  येणार आहे. नवी दिल्लीत हे सगळे फोन एकत्र करण्यात येणार असून तपासणीनंतर त्यांना पुन्हा देण्यात येणार आहे. 

मागील वर्षी पेगासस स्पायवेअर द्वारे जगभरातील राजकीय नेते, पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यांचा फोन हॅक करून त्यांची हेरगिरी करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आला होता. जगभरातील काही प्रसारमाध्यमं संस्थांच्या पत्रकारांनी एकत्रित येऊन शोधपत्रकारितेत हा दावा केला होता. त्यानंतर फ्रान्स सरकारच्या समितीने केलेल्या चौकशीत त्यांच्या दोन पत्रकारांचे फोन हॅक झाल्याच्या दाव्याला दुजोरा देण्यात आला होता. त्याशिवाय, इस्रायल सरकारनेदेखील एनएसओ ग्रुपची चौकशी सुरू केली होती. पेगासस हे स्पायवेअर तंत्रज्ञानाची विक्री खासगी व्यक्ती, संस्थांना नव्हे तर सरकारलाच देण्यात आले असल्याचे स्पष्टीकरण एनएसओ ग्रुपने दिले होते. 

भारतातही या पेगाससचा वापर करून सामाजिक कार्यकर्ते, विरोधी पक्षांचे नेते, पत्रकारांवर पाळत ठेवली असल्याचा आरोप करण्यात आला होता. 

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Embed widget