एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News 29 May 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News 29 May 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा

Background

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.

फायनलचा थरार... गुजरातच्या टायटन्सचा जल्लोष...की राजस्थानचा 'रॉयल मार्च?'

आयपीएलच्या 15व्या मोसमाची मेगा फायनल रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. समारोपाच्या खास कार्यक्रमानंतर रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. यंदाच्या मोसमात नव्यानं दाखल झालेला गुजरात टायटन्स आणि 14 वर्षांनी फायनलमध्ये पोहोचलेली राजस्थान रॉयल्स यांच्यात फायनलचा हा थरार पाहायला मिळणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अंतिम सामना पाहणार आहेत.

संजय राऊत शाहू महाराजांच्या भेटीला  

भाजपने संभाजीराजेंचा गैरवापर केला, असा आरोप संजय राऊतांनी केला. त्यानंतर आज संजय राऊत शाहू महाराजांच्या भेटीला न्यू पॅलेसवर जाणार आहे. 

 पंतप्रधान नरेंद्र मोदींची "मन की बात"

 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता त्यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रम "मन की बात" द्वारे देशवासियांना संबोधित करतील. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता ऑल इंडिया रेडिओ आणि डीडी चॅनेलवर प्रसारित होणाऱ्या 'मन की बात' कार्यक्रमाचा हा 89 वा भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 'मन'की बात हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमात देशभरातील बारा सामाजिक कामं करणाऱ्या संस्थांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील जळगाव शहरातील केशव स्मृती संचालित मातोश्री आनंदाश्रम याचा समावेश असणार आहे. मातोश्री संस्था व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आली आहे. 

राष्ट्रीय महामार्गाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण

भंडारा जिल्ह्याच्या साकोली आणि लाखनी तालुक्यातुन जाणाऱ्या राष्ट्रीय माहामार्ग क्रमांक 6 वर बांधण्यात आलेल्या ओवर ब्रिज तसेच गोंदिया जिल्ह्यात तयार करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.

चौथे अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलन 

चौथे अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलन संतनगरी शेगाव येथे होत आहे. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.राजेश मिरगे हे संत साहित्याचे अभ्यासक साहित्यिक  आहेत. या साहित्य संमेलनासाठी राज्यभरातून वऱ्हाडी साहित्यिक शेगावात दाखल झाले आहे. दिवसभर वऱ्हाडी साहित्याची रेलचेल असणार आहे.

17 वा 'मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव'

आजपासून 'मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'ला सुरूवात होणार  आहे. हा महोत्सव 29 मे ते 4 जून या कालावधीत होणार आहे.महोत्सवातील सर्वोत्कृष्ट माहितीपटाला 'सुवर्ण शंख' आणि 10 लाखाचे रोख पारितोषिक मिळणार आहे. तसेच विविध श्रेणीतील विजेत्या चित्रपटांना आकर्षक रोख पारितोषिके, 'रौप्य शंख', ट्रॉफी आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत.या महोत्सवात भारतीय नॉन-फिचर फिल्म विभागातील एका दिग्गज व्यक्तीला प्रतिष्ठित 'व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार' 10 लाख रुपये, ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

आज इतिहासात

1905 : शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याच्या ख्यातनाम गायिका हिराबाई बडोदेकर यांचा जन्म. 

1972 : हिंदी चित्रपटअभिनेते पृथ्वीराज कपूर यांचे निधन. 

21:54 PM (IST)  •  29 May 2022

वाशिममध्ये दोन तरुणीचा तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू

कारंजा शहरातील दहीपुरा भागातील दोन तरुणी फिरण्यासाठी गेले असता म्हसनी गावालगत असलेल्या अडान धरण्यात पाय घसरून मृत्यू झाल्याची घटना संध्याकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास घडली घडली आहे. घटनेत मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव शाफीआ नासिर अली (वय 18 वर्ष रा दहीपुरा) आणि उजमा अनिस अन्सारी (वय 18 ) असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. गावातील नागरिकांच्या लक्षात ही घटना येताच नागरिकांनी तत्काळ बचावाचा प्रयत्न केला. मात्र दोघीचा मृत्यू झाला होता. दरम्यान या घटनेचा तपास कारंजा ग्रामीण पोलीस करत आहे.

20:28 PM (IST)  •  29 May 2022

हनुमान जन्मस्थळाचा वाद पोहोचला पोलीस ठाण्यात, त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना ग्रामस्थांकडून निवेदन 

हनुमान जन्मस्थळाचा वाद आता पोलीस ठाण्यात  पोहोचलाय. कर्नाटकातील किष्किंधाचे दंडास्वामी गोविंदानंद सरस्वतीजी महाराज यांनी नाशिकमधील अंजनेरीच्या हनुमान जन्मस्थळाबाबत चुकीचा प्रचार आणि प्रसार सुरू केला आहे. हा प्रचार तातडीने थांबविण्यात यावा, त्यांची रथयात्रा थांबविण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन अंजनेरीच्या ग्रामस्थ आणि साधू महंतांकडून त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांना देण्यात आले आहे.  

20:06 PM (IST)  •  29 May 2022

राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार टाळणे भाजपच्या हातात : संजय राऊत

राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार टाळणे भाजपच्या हातात आहे, असे मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त आहे.  

19:19 PM (IST)  •  29 May 2022

Maharashtra News : राज्यसभेसाठी भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर

Maharashtra News :  राज्यसभेसाठी भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पियूष गोयल आणि अनिल बोंडेंना उमेदवारी दिली. 

19:15 PM (IST)  •  29 May 2022

Sanjay Raut : महाराष्ट्रात यापुढे भाजपचं सरकार कधीच येणार नाही : संजय राऊत

Sanjay Raut : कागलमध्ये शिवसंपर्क अभियान राबविण्यात आले होते. या दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात यापुढे भाजपचं सरकार कधीच येणार नाही असं वक्तव्य केलं. तसेच उद्धव ठाकरे यापुढेही महाराष्ट्राचं नेतृत्व करणार असेही ते म्हणाले. 

 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Air Force Day Chennai : वायुसेना दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरतीBJP Campaigning Nagpur : नागपुरातून भाजपचं महाजनसंपर्क अभियान सुरूRamraje Nimbalkar : रामराजेंचं तळ्यात मळ्यात सुरूच; जुनी खदखद पुन्हा बाहेरVare Nivadnukiche : वारे निवडणुकीचे : 6 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
Embed widget