एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News 27 May 2022 : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रॅफिक जॅम, वाहतूक मंदावली

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News 27 May 2022 : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रॅफिक जॅम, वाहतूक मंदावली

Background

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.

 संभाजीराजे आज भूमिका स्पष्ट करणार

राज्यसभेची निवडणूक संभाजीराजे लढणार की त्यातून माघार घेणार हे उद्या स्पष्ट होणार आहे. संभाजीराजे छत्रपती शुक्रवारी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. उद्या सकाळी 11 वाजता संभाजीराजे छत्रपती यांची मुंबईतील  मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद होणार आहे. या परिषदेला राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. 

अविनाश भोसलेंना अटक, दिल्लीला  घेऊन जाण्याची शक्यता

पुण्यातील व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयनं अटक केली आहे. अविनाश भोसले यांची यापूर्वी ईडी आणि सीबीआयनं चौकशी केली होती. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डीएचएफल प्रकरणात अविनाश भोसले यांना अटक करण्यात आली आहे. येस बॅंककडून लोन मिळून देण्यासाठी भोसले यांनी वाधवन यांच्याकडून कमिशन घेतल्याचा आरोप आहे. दिल्ली सीबीआयची कारवाई. भोसलेंना दिल्लीला घेऊन जाण्याची शक्यता आहे.

प्रश्न महाराष्ट्राचे  आज दिवसभर एबीपी माझावर

आज दिवसभर एबीपी माझावर प्रश्न महाराष्ट्राचे.. उत्तरे मंत्री आणि नेते मंडळीची. ज्यामध्ये कायदा सुव्यवस्था, शालेय शिक्षण, कृषी, गृहनिर्माण, ग्रामविकास, उच्च शिक्षण आणि महसूल खात्याने सत्तेत आल्यानंतर राज्यासाठी कोणते निर्णय घेतले? विरोधी पक्षाने सर्वसामान्यांचे कुठले प्रश्न लावून धरले? की सत्ताधारी आणि विरोधक फक्त आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण करण्यात मश्गुल आहेत. जनतेच्या प्रश्न या सर्वांच्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहे? महागाई, बेरोजगारी, टॅक्स यामध्ये भरडल्या जाणाऱ्या सर्वसामान्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे आज दिवसभर मिळणार का? पाहा दिवसभर 'प्रश्न महाराष्ट्राचे'

तुकाराम मुंढेंनी बंद केलेली 'ती' फाईल आयुक्त रमेश पवार उघडणार

तत्कालीन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बंद केलेली फाईल विद्यमान आयुक्त रमेश पवार उघडणार आहे. शहरातील सव्वा लाखाहून अधिक मिळकतीवर  दंडात्मक करावाई होणार आहे. ज्यांनी मिकळतीमध्ये रचनात्मक बदल केले. अतिक्रमण केले आशा नागरिकांना दंड ठोठावला जाणार आहे. नागरिकांच्या विरोधामुळे मुंढेना फाईल बंद करावी लागली होती तेवढ्यत त्यांची बदली झाली,आता त्या फाईल्स उघडल्या जाणार आहे

देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर 'मराठा क्रांती मोर्चा' ची धडक!

देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर 'मराठा क्रांती मोर्चा' धडकणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत 50% च्या आत ओबीसी मधूनच मराठ्यांना आरक्षण मिळावे यावर चर्चा होणार आहे.

मान्सून आज केरळमध्ये दाखल होऊ शकतो

मान्सून आज केरळमध्ये दाखल होऊ शकतो.  नैऋत्य मॉन्सून आज केरळमध्ये नियोजित वेळेच्या पाच दिवस अगोदर दाखल होऊ शकतो. हवामान खात्याने ही माहिती दिली.केरळमध्ये मॉन्सूनचे आगमन साधारणपणे 1 जून रोजी होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज देशातील सर्वात मोठ्या ड्रोन महोत्सवाचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील सर्वात मोठ्या ड्रोन महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी मोदी शेतकरी, ड्रोन चालकांशी संवाद साधणार आहेत. 1600 लोक सहभागी होतील. आजपासून दोन दिवसीय 'इंडिया ड्रोन फेस्टिव्हल' सुरू होत आहे.

अजमेर दर्गा हिंदू मंदिर असल्याचा दावा, सीएम गेहलोत यांना पत्र लिहून सर्वेक्षण करण्याच्या मागणी

काशीच्या ज्ञानवापी मशिदीपासून सुरू झालेला मंदिर-मशीद वाद आता राजस्थानपर्यंत पोहोचला आहे. अजमेरमधील ख्वाजा गरीब नवाज यांचा दर्गा हिंदू मंदिर असल्याचा दावा करण्यात आला आहे. दिल्लीतील एका संस्थेने याबाबत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये पुरातत्व विभागाकडे दर्ग्याचे सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे. सीएम गेहलोत यांना लिहिलेल्या पत्राची माहिती समोर आल्यानंतर दर्ग्याबाबत वाद सुरू झाला आहे.

उडता गुजरात, 500 कोटींचं कोकेन ड्रग्ज जप्त

मुंद्रा विमानतळावर पुन्हा एकदा मिठाच्या नावाखाली आणलेले 52 किलो कोकेन जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात जप्त केलेल्या कोकेनची किंमत 500 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले असून, ही खेपही इराणमार्गे गुजरातमधील मुंद्रा विमानतळावर पाठवण्यात आली होती. वर्षभरात महसूल गुप्तचर संचालनालयाने आतापर्यंत 3200 कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले आहे.

आज इतिहासात :

1964 : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन

1957 : भारतीय राजकारणी आणि उद्योजक नितीन गडकरी यांचा जन्म

1935 : रमाबाई आंबेडकर यांचे निधन

1906 : महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना

1938 : ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित लेखक, कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांचा जन्मदिन.

23:25 PM (IST)  •  27 May 2022

सुप्रिया सुळे यांचं परळीमध्ये राष्ट्रवादीकडून जोरदार स्वागत

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं परळीमध्ये राष्ट्रवादीकडून जोरदार स्वागत करण्यात आलं. सुप्रिया सुळे या परभणी दौऱ्यावर असताना हा दौरा आटोपल्यानंतर त्या परळीहून लातूरकडे निघाल्या होत्या. यावेली त्यांचं परळी शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून जंगी स्वागत करण्यात आलं. परळीमध्ये आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. 

22:24 PM (IST)  •  27 May 2022

Pune Mumbai Highway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रॅफिक जॅम

पुणे मुंबई द्रृतगती मार्ग आज पुन्हा मंदावला आहे. वीकेन्डमुळे वाहनांची संख्या वाढल्याने ही परिस्थिती उद्भवलेली आहे. लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वरसह पश्चिम महाराष्ट्रात आपल्या घरी जाण्यासाठी मुंबईकर बाहेर पडलेत. यामुळं बोरघाटामध्ये अमृतांजन पुलाजवळ वाहतूक स्लो झाली आहे.

19:35 PM (IST)  •  27 May 2022

Navneet Rana : नवनीत राणा यांच्या अटक प्रकरणी राज्यातील बड्या अधिकाऱ्यांना नोटीस

अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्या अटक प्रकरणी राज्यातील बड्या अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. राज्याच्या मुख्य सचिवांसह मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनाही नोटीस पाठवण्यात आली असून 15 जून रोजी दिल्लीत हक्कभंग समितीसमोर उपस्थिती लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

डीजीपी रजनीश सेठ, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे, भायखळा जेलच्या महिला तुरुंगाधिकारी यांना समितीसमोर उपस्थिती लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठणाच्या प्रकरणावरून तुरुंगात अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी नवनीत राणा यांनी हक्कभंगाची तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेत पोलीस महासंचालकांसोबतच राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनाही नोटीस आली आहे. 

19:25 PM (IST)  •  27 May 2022

 दगडूशेठ हलवाई मंदिरात जायचे आहे, हे शरद पवारांना माहीती होते मग त्यांनी नॉनव्हेज का खाल्ले? :  तुषार भोसले

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दगडूशेठ हलवाई मंदिरात जायचे आहे हे माहीती होते मग त्यांनी नॉनव्हेज का खाल्ले? असा प्रश्न तुषार भोसले यांनी उपस्थीत केला आहे. "शरद पवार नास्तिक आहेत, ते मंदिरात कसे जातील? आज जुम्मा होता त्यामुले ते मंदिरात गेले नाहीत. एरवी इफ्तार पार्टीमध्ये जातात, पण मंदिरात जाण्यासाठी बतावणी करतात. संपूर्ण महाराष्ट्रला माहिती आहे, शरद पवारांना हिंदू धर्माविषयी प्रचंड आकास आहे, अशी टीका तुषार भोसले यांनी केलीय. 

18:20 PM (IST)  •  27 May 2022

Ladakh Road Accident: लडाखमध्ये लष्कराचे वाहन नदीत पडले, 7 जवान शहीद

लडाखच्या तुर्तुक सेक्टरमध्ये झालेल्या एका रस्ते अपघातात भारतीय लष्कराच्या 7 जवानांना आपला जीव गमवावा लागला (Army Soldiers Died) आहे. तर इतर जवानांनाही गंभीर दुखापत झाली आहे. अपघातावेळी वाहनात एकूण 26 जवान होते. जखमींवर उपचार सुरू आहेत. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra PoliticsRohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चाSandeep Kshirsagar : वाल्मीक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण; संदीप क्षीरसागरांचा सर्वात मोठा आरोपSSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Embed widget