Maharashtra Breaking News 26 May 2022 : केतकी चितळेचा जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायालयाने फेटाळला
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार हेच शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असतील हे आता स्पष्ट झालंय. कारण आज संजय राऊत आणि संजय पवार हे दोघेही आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. या संदर्भात संजय राऊतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर संजय राऊत यांनी ही माहिती दिलीय.
मुंबईतील शांतीनगर येथील झोपडपट्टीवर आज बीएमसीचा बुलडोझर
मुंबईच्या वडाळा शांतीनगर भागातील 100 झोपड्यांवर उद्या कारावाई करण्यात येणार आहे.
क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबी आज आरोपपत्र दाखल करणार
आर्यन खानला अटक करण्यात आलेल्या कॉर्डिलिया क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबी आज आपलं आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता. याप्रकरणी तपास करत असलेल्या एसआयटीला कोर्टानं मार्च अखेरीस दिलेली 60 दिवसांची मुदतवाढ संपण्यास अवघे काही दिवस उरले आहेत.
वाराणसी आणि मथुरेत आज दोन महत्वाच्या प्रकरणाची सुनावणी
वाराणसी- ज्ञानवापी प्रकरण : खटला चालवणे योग्य आहे की नाही ? जिल्हा न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. जिल्हा न्यायाधीश ए.के. विश्वेश यांच्या कोर्टात सुनावणी होणार आहे
मथुरा-कृष्णजन्मभूमी प्रकरण : मशीद हटवण्याची विनंती करणाऱ्या याचिकेव दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ विभाग) यांच्या न्यायालयात आज सुनावणी होणार. सर्वोच्च न्यायालयाच्या वकील रंजना अग्निहोत्री यांनी ही याचिका दाखल केली आहे. 19 मे रोजी जिल्हा न्यायालयाने या खटल्यातील आदेशात सुधारणा लक्षात घेऊन सुनावणीसाठी मान्यता दिली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हैदराबाद आणि चेन्नईच्या दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी हैदराबाद आणि चेन्नईच्या दौऱ्यावर आहेत. हैदराबादच्या इंडियन स्कूल ऑफ बिजनेसला 20 वर्षे पूर्ण होत आहे. या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत.
आज इतिहासात
1945 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा जन्म
1999 : श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात सौरव गांगुली आणि राहुल द्रविडने 318 धावांचा विश्वविक्रम केला.
2014 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली.
परभणीत चंद्रकांत पाटलांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक, राष्ट्रवादीकडून चंद्रकांत पाटलांची तिरडी काढून आंदोलन
राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर परभणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले असून चंद्रकांत पाटील यांची तिरडी काढून राष्ट्रवादीने निदर्शन केली आहेत.
चंद्रकांत पाटील यांच्या फोटोला साडी चोळी नेसवून राष्ट्रवादीचे आंदोलन
भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्याचा राष्ट्रवादीकडून निषेध करण्यात आलाय. वाशीयेथील राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या फोटोला साडी चोळी नेसवून आणि खना नारळाची ओटी भरून अनोख्या पध्दतीने आंदोलन केले आहे. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांच्या फोटोला चपलाचा मार देण्यात आला. चंद्रकांत पाटील महिलांची माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांच्या विरोधातील आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांनी दिलाय.
Yavatmal : यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यात वादळी पावसाची जोरदार हजेरी
Yavatmal : झरी तालुक्यातील मुकुटबन आणि परिसरातील बहुतांश भागात वादळी पावसाने चांगलेच झोडपले आहे. अशातच काहींच्या घरावरचे टिनपत्रे सुद्धा उडून गेल्याचे दिसून येत आहे. मात्र, या वादळी पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अर्धा तास विजांच्या गडगड्यासह पडलेल्या पावसाने नागरिकांची धावपळ झाली. पावसामुळे रस्त्यावरील झाडे पडली असून विजेचे खांब पडल्याने परिसरात विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. तर अद्यापही पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत.
Anil Parab : 12 तासांच्या चौकशीनंतर ईडीची टीम अनिल परब यांच्या घरातून बाहेर
शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री अनिल परब यांच्या वांद्रे येथील घरातून ईडीचे अधिकारी बाहेर पडले आहेत. तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर ही टीम बाहेर पडली आहे. तर त्यांचे सरकारी निवासस्थान असलेल्या अजिक्यतारा या ठिकाणी अद्याप ईडीची एक टीम असून त्याच घरी अनिल परबदेखील आहेत.
Ketaki Chitale : केतकी चितळेचा जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायालयाने फेटाळला
Ketaki Chitale : केतकी चितळेचा जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. शरद पवार यांच्यावर केलेल्या वादग्रस्त पोस्ट प्रकरणी जामीन देण्यास कोर्टाचा नकार दिला आहे. त्यामुळे केतकीचा जेल मधला मुक्काम वाढला