एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News 24th May 2022 : लोकल ट्रेनखाली म्हैस आल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News 24th May 2022 : लोकल ट्रेनखाली म्हैस आल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत

Background

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.

वाराणसी कोर्ट आज सुनावणार निकाल

ज्ञानवापी मशीद वाद प्रकरणाची जिल्हा न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली. न्यायालय मंगळवारी दुपारी 2 वाजता निकाल सुनावणार आहे. तसेच पुढील सुनावणी कशी होणार, याची रूपरेषा काय असेल, हेसुद्धा मंगळवारीच सांगण्यात येणार आहे. तसंच याबाबतच्या अन्य पुरवणी याचिकांवरही विचार करण्याचे न्यायालयाने ठरवले आहे. दरम्यान, न्यायालयीन सुनावणी सुरू होण्यापूर्वी न्यायालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुनावणीच्या वेळी पक्षकार आणि वकिलांनाच प्रवेश देण्यात आला होता. सर्वेक्षणासाठी यापूर्वी नियुक्त केलेले न्यायालयाचे आयुक्त अजय मिश्रा यांचेही नाव यादीत नसताना त्यांना परत पाठण्यात आले.

पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्याशी करणार चर्चा

 पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, उद्या (24 मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी क्वाड समिटमध्ये द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. जपानमध्ये क्वाड नेत्यांची दुसरी ​​शिखर परिषद होत आहे. या परिषदेत चारही देशांच्या नेत्यांकडून विकासाच्या दृष्टीने महत्वाची पावले उचलली जातील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स  आमनेसामने

गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज (24 मे) पहिला क्वालीफायर सामना खेळला जाणार आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर हा सामना खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून थेट अंतिम सामन्यात प्रवेश करण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असेल. कारण, या सामन्यात पराभूत झालेला संघाला एलिमिनेटर सामन्यात विजयी झालेल्या संघासोबत क्वालीफायरचा दुसरा सामना खेळावा लागणार आहे. क्वालीफायर- 2 मध्ये जिंकणारा संघ क्वालीफायर-1 मध्ये जिंकलेल्या संघाशी अंतिम सामना खेळेल.

एथर इंडस्ट्रीजचा आयपीओ आज बाजारात

रसायनांची निर्मिती करणाऱ्या 'इथर इंडस्ट्रीज' ची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) येत्या 24 मेपासून खुली होत असून गुंतवणूकदारांना 26 मेपर्यंत अर्ज करता येईल. 

21:15 PM (IST)  •  24 May 2022

Beed News Update : बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या आत्महत्येची मानवी हक्क आयोगाकडून दखल 

बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या आत्महत्येची दखल मानवी हक्क आयोगाने घेतली आहे. या प्रकरणात अहवाल सादर करण्याचे आदेश मानवी हक्क आयोगाने साखर आयुक्त आणि बीडचे जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांना दिले आहेत. 

 गेल्या काही दिवसांपूर्वी बीडच्या गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील शेतकरी नामदेव जाधव यांनी आपला ऊस कारखान्याला जात नसल्याने ऊस पेटवून देऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. याच घटनेची मानवी हक्क आयोगाने  स्वतःहून दखल घेतली असून या प्रकरणात तातडीने अहवाल दाखल करण्याचे आदेश देऊन 13 जून रोजी यावर सुनावणी होणार असून बीडचे जिल्हाधिकारी आणि साखर आयुक्त यांना हजर  राहण्यासाठी समन्स देखील बजावण्यात आले आहे.

बीड जिल्ह्यामध्ये सध्या अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवर असून अनेकदा शेतकरी यावर तोडगा निघावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे  विनंती करत आहेत. त्यातच आता अतिरिक्त उसाच्या प्रश्नावरून बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना मानवी हक्क आयोगाचे समन्स बजावल आहे. 

19:33 PM (IST)  •  24 May 2022

Rajya sabha Election : संभाजीराजे यांना दिलेलं आश्वासन पाळावं अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत पाणी पाजू ; मराठा समन्वयकांचा इशारा   

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे यांना उमेदवारी न दिल्यामुळे संभाजी राजे यांचे समर्थक नाराज झाले असून संभाजी राजे यांना संधी द्यावी असे मराठा समन्वयकांनी म्हटले आहे. संभाजीराजे यांना दिलेलं आश्वासन पाळावं अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत पाणी पाजू असा इशारा मराठा समन्वयकांनी दिला आहे.  

18:35 PM (IST)  •  24 May 2022

 Mumbai News :  मुंबईकडे येणाऱ्या लोकल ट्रेनखाली म्हैस आल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत

 Mumbai News :  मुंबईकडे येणाऱ्या लोकल ट्रेन खाली म्हैस आल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे, लोकल ट्रेन नंतर येणाऱ्या डेक्कन एक्सप्रेस, मुंबई एक्सप्रेस आणि पुणे इंदोर एक्सप्रेस रखडल्या आहेत. कर्जतवरून मुंबईकडे येणारी वाहतूक उशिराने सुरू आहे. वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहे.

18:11 PM (IST)  •  24 May 2022

Rajya sabha Election : माझ्यावर टाकलेला विश्वास चांगलं काम करुन सार्थ ठरवेन ; संजय पवार  

"माझ्या नावाची घोषणा झाल्याने खूप आनंद झाला आहे. मला देखील आत्ताच माहिती पडलं. परंतु, मला अजून याबाबत निरोप नाही. उमेदवारी जाहीर झाली असली तर सगळी तयारी करावी लागणार आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला तो चांगलं काम करुन सार्थ ठरवेन, असे मत संजय पवार यांनी व्यक्त केले आहे. 

"जो शिवसैनिक 30 वर्ष काम करत आहे तो उद्धव ठाकरे यांना देव मानतो. मातोश्रीला मंदिर मानतो, अशा शिवसैनिकाला संधी दिली याबद्दल आभार. मी शाखाप्रमुखापासून सुरुवात करत इथपर्यंत पोहोचलो आहे. मला ही संधी दिली, असं कुठल्या पक्षात घडतं? फक्त शिवसेनेतच घडतं. ज्या लोकांनी मला संधी दिली त्यांचे धन्यवाद, असे संजय पवार यांनी म्हटले आहे. 

17:32 PM (IST)  •  24 May 2022

Sanjay Raut :  संजय राऊत 28 मे ला कोल्हापूर दौऱ्यावर

Sanjay Raut :  संजय राऊत 28 मे रोजी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. संभाजीराजेंना अंगावर घेतल्यानंतर संजय राऊत कोल्हापुरात येणार आहे. 28 मे रोजी राऊत यांची जाहीर सभा आहे. शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने राऊत कोल्हापुरात जाणार आहे.  संजय राऊतांवर संभाजीराजे समर्थक नाराज झाले आहेत

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग, कामगार अडकल्याची भीती; अग्निशमनच्या 5-6 गाड्या दाखल
मुंबईत सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग, कामगार अडकल्याची भीती; अग्निशमनच्या 5-6 गाड्या दाखल
इंस्टावर पोस्ट शेअर करत संपवले जीवन; व्हिडिओत शिवसेना नेत्याच्या भावाचं नाव
इंस्टावर पोस्ट शेअर करत संपवले जीवन; व्हिडिओत शिवसेना नेत्याच्या भावाचं नाव
काळमांडवी धबधब्यावर पर्यटनास गेलेले २ तरुण बुडाले; ऐन दिवाळीतच दु:खद घटना
काळमांडवी धबधब्यावर पर्यटनास गेलेले २ तरुण बुडाले; ऐन दिवाळीतच दु:खद घटना
ती माझी मैत्रीण; शायना एनसींकडून गुन्हा दाखल होताच खासदार सावंत यांची पहिली प्रतिक्रिया
ती माझी मैत्रीण; शायना एनसींकडून गुन्हा दाखल होताच खासदार सावंत यांची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sattar vs Danve Special Report :सत्तारांच्या वक्तव्यावर रावसाहेब दानवे म्हणतात, औरंजेबानं धमकावू नयेPolitical Leaders Property Special Report :  संपत्तीवरून वाद,आरोपांची वात ; सात उमेदवार टार्गेटRashmi Shukla Special Report : शुक्लांना कधी हटवणार? पटोलेंचा सवालाचा बाॅम्बManoj Jarange Maratha Reservation :  मराठा समाजाने पाठिंबा द्यायचे उमेदवार, मतदार संघ 3 तारखेला जाहिर करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग, कामगार अडकल्याची भीती; अग्निशमनच्या 5-6 गाड्या दाखल
मुंबईत सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग, कामगार अडकल्याची भीती; अग्निशमनच्या 5-6 गाड्या दाखल
इंस्टावर पोस्ट शेअर करत संपवले जीवन; व्हिडिओत शिवसेना नेत्याच्या भावाचं नाव
इंस्टावर पोस्ट शेअर करत संपवले जीवन; व्हिडिओत शिवसेना नेत्याच्या भावाचं नाव
काळमांडवी धबधब्यावर पर्यटनास गेलेले २ तरुण बुडाले; ऐन दिवाळीतच दु:खद घटना
काळमांडवी धबधब्यावर पर्यटनास गेलेले २ तरुण बुडाले; ऐन दिवाळीतच दु:खद घटना
ती माझी मैत्रीण; शायना एनसींकडून गुन्हा दाखल होताच खासदार सावंत यांची पहिली प्रतिक्रिया
ती माझी मैत्रीण; शायना एनसींकडून गुन्हा दाखल होताच खासदार सावंत यांची पहिली प्रतिक्रिया
Shaina NC Vs Arvind Sawant : 'इम्पोर्टेड माल' खासदार अरविंद सावंतांच्या अंगलट; शायना एनसीच्या तक्रारीवरून मुंबईत गुन्हा दाखल
'इम्पोर्टेड माल' खासदार अरविंद सावंतांच्या अंगलट; शायना एनसीच्या तक्रारीवरून मुंबईत गुन्हा दाखल
देवघरात आग लागली अन् स्वयंचलित दार लॉक; व्यापारी पती-पत्नी जिवंत जळाले, वाचवण्यासाठी गेलेल्या मोलकरणीचाही मृत्यू
देवघरात आग लागली अन् स्वयंचलित दार लॉक; व्यापारी पती-पत्नी जिवंत जळाले, वाचवण्यासाठी गेलेल्या मोलकरणीचाही मृत्यू
मी मंत्री आहे, आता राज ठाकरेंनी पक्ष बंद करावा; रामदास आठवलेंचा मनसे अध्यक्षांवर पलटवार
मी मंत्री आहे, आता राज ठाकरेंनी पक्ष बंद करावा; रामदास आठवलेंचा मनसे अध्यक्षांवर पलटवार
बीडमधील 6 मतदारसंघात लढती ठरल्या, जरांगेंची जादू चालणार; महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
बीडमधील 6 मतदारसंघात लढती ठरल्या, जरांगेंची जादू चालणार; महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
Embed widget