Maharashtra Breaking News LIVE Updates : शिवसेनेचे गायब असलेले शाखाप्रमुख चार दिवसांनी घरी परतले
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
बंडा तात्यांची जीभ पुन्हा घसरली! महात्मा गांधींचा म्हातारा असा उल्लेख करत म्हणाले...
पिंपरी चिंचवड : भारताला मिळालेलं स्वातंत्र्य अहिंसेच्या मार्गाने नव्हे तर क्रांतिकारक चळवळीने मिळालं. हे पटवून देताना वारकरी सांप्रदायाचे बंडातात्या कराडकरांनी महात्मा गांधींचा उल्लेख म्हातारा असा केला. अन् पुन्हा एकदा बंडा तात्यांची जीभ घसरली. या म्हाताऱ्याच्या पद्धतीनं भारताला स्वराज्य मिळवायला एक वर्ष लागलं असतं, असं लोकमान्य टिळकांचं एक वाक्य असल्याचं ही बंडा तात्या म्हणालेत. स्वातंत्र्य सैनिक भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांच्या शहीद दिनी ते पुण्यातील खेड राजगुरूनगर येथे बोलत होते.
बंडा तात्या कराडकर नेमकं काय म्हणाले...
बंडा तात्या कराडकर म्हणाले की, दहा वर्षाच्या काळात भगतसिंहानी केलेली क्रांती ही अभूतपूर्व होती. त्या काळात सुरुवातीला भगतसिंहांवर महात्मा गांधींची छाप होती. महात्मा गांधींचा अहिंसावाद भगतसिंहांच्या मनामध्ये ठासवला होता. आपल्याला हे स्वातंत्र्य अहिंसक मार्गाने मिळवायचं आहे, पण भगतसिंहांचा हा भ्रमाचा भोपळा तीन वर्षातच फुटला. 1922ला एक हत्याकांड झालं, त्या हत्याकांडात त्याला समर्थन देण्यात महात्मा गांधींनी नकार दिला. तेव्हा भगतसिंह महात्मा गांधींवर नाराज झाले. महात्मा गांधींचा अहिंसावाद आणि हिंदुत्व हे दोन्ही ही पक्षपातीच आहेत. पण त्या विषयात आत्ता आपण घुसायचं काही कारण नाही, असं कराडकर म्हणाले.
आज पेट्रोल-डिझेलची दरवाढ स्थिर राहिल्यानंतर शुक्रवारी पुन्हा वाढ होणार
आज पेट्रोल-डिझेलची दरवाढ स्थिर राहिल्यानंतर उद्या पुन्हा वाढ होणार
उद्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ८३ पैशांची वाढ होणार, सकाळी ६ वाजल्यापासून नवे दर लागू होणार
जागतिक बाजारपेठात कच्च्या तेलामुळे भारतातील पेट्रोल-डिझेलची दरवाढ होत असल्याचं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांचे वक्तव्य
जागतिक बाजारपेठात कच्च्या तेलाचे दर १२० डाॅलर प्रति बॅरलवर
शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ल्याप्रकरणी आणखी दोघांना अटक
कणकवली पोलिसांनी ज्ञानेश्वर उर्फ माऊली दिगंबर देवनुरे आणि धीरज व्यंकटेश जाधव या फरारी दोन आरोपींना अटक केली आहे. दोघेही पुण्याचे रहिवासी असून संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांच्यासह एकूण 11 आरोपींवर गुन्हा दाखल यातील या दोघैांना आज अटक झाली आहे. उद्या त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
























