(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Breaking News LIVE Updates : मराठा आरक्षण उपसमितीची वर्षां बंगल्यावर आयोजित महत्त्वपूर्ण बैठक संपली
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Nawab Malik Arrested : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. आज महाविकास आघाडी आणि भाजपकडून आंदोलन करण्यात येणार आहे. नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे मंत्री मंत्रालयाजवळ आंदोलन करणार आहेत. तर, मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून आंदोलन करण्यात येणार आहे.
बुधवारी, ईडीने नवाब मलिक यांच्यावर कारवाई केल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली होती. आठ तासाच्या चौकशीनंतर ईडीने नवाब मलिक यांना अटक केली. त्यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तर, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या अटकेच्या कारवाईचा निषेध केला.
मलिकांना सरकारचा 'महा'पाठिंबा
दुचाकी आणि इनोव्हाच्या धडकेत हिंगोलीमध्ये दोघांचा मृत्यू
हिंगोली जिल्ह्यातील वसमत परभणी रोडवर चिखली पाटी दरम्यान इनोव्हा आणि मोटरसायकलच्या धडकेने मध्ये मोटरसायकलवर प्रवास करणाऱ्या दोन युवकांचा मृत्यू झाला आहे.
मराठा आरक्षण उपसमितीची वर्षां बंगल्यावर आयोजित महत्त्वपूर्ण बैठक संपली
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्या, या मागणीसाठी खासदार संभाजीराजे 26 फेब्रुवारीपासून उपोषणाला बसणार आहेत. या प्रश्नी मराठा आरक्षण उपसमितीची वर्षां बंगल्यावर आयोजित महत्त्वपूर्ण बैठक संपली. संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणापुर्वी त्यांच्या मागण्यांबाबत तोडगा काढण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आले होते बैठकीला मराठा आरक्षण उपसमीतीच्या सदस्यांसोबत अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे एमडी, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, प्रधान सल्लागार सिताराम कुंटे देखील उपस्थित होते.
ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टातली सुनावणी लांबणीवर
OBC Reservation : ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टातली 25 फेब्रुवारीला होणारी सुनावणी आता सोमवारी 28 फेब्रुवारीला होणार आहे.
Russia Ukraine War : अहमदनगर जिल्ह्यातील 18 विद्यार्थी युक्रेनला अडकले
Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले असून अहमदनगर (Ahmadnagar) जिल्ह्यातील युक्रेनमध्ये अनेक विद्यार्थी अडकले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. अहमदनगरच्या एज्युकॉन एज्युकेशनल कन्सल्टन्सी संस्थेचे डॉक्टर महेंद्र झावरे पाटील यांच्या मार्फत 40 विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेले आहेत. यापैकी जवळपास 16 ते 18 विद्यार्थी अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. हे सर्व विद्यार्थी युनिव्हर्सिटीमध्ये सुरक्षित असल्याची माहिती त्यांनी पालकांना दिली आहे, मात्र युध्दजन्य परिस्थितीमुळे त्यांच्याजवळील पैसे संपत असल्याने केंद्र सरकारने तातडीने आम्हाला मायदेशी परत घेऊन जाण्याची विनंती विद्यार्थी करत आहेत.
Narayan Rane : नारायण राणे यांची शुक्रवारी पत्रकार परिषद
सिंधुदुर्ग - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची ओरोस शरद कृषी भवन येथे शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता पत्रकार परिषद होणार आहे.