एक्स्प्लोर

Petrol-Diesel Price : रशिया-युक्रेनमधील तणावामुळं कच्च्या तेलाच्या किमतींत मोठी वाढ; पेट्रोल-डिझेलवर काय परिणाम?

IOCL, Petrol-Diesel Price Today 24 February 2022 : देशात तब्बल तीन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत, जाणून घ्या तुमच्या शहरांतील दर काय?

IOCL, Petrol-Diesel Price Today 24 February 2022 : भारतीय तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Rates) जारी केले आहेत. सध्या युक्रेन आणि रशिया यांच्यातील वाढता तणाव संपूर्ण जगासाठी चिंतेचं कारण ठरला आहे. अशातच आंतरराष्ट्रीय स्तरावरील या सर्व घडामोडींचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींवरही होताना दिसत आहे. असं असलं तरी देशात मात्र आजही पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी उच्चांक (Crude Oil Prices) गाठला आहे. पण तरिही देशात पेट्रोल-डिझेलचे दर तब्बल तीन महिन्यांपासून स्थिर आहेत. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाले आहेत. अशातच देशात सध्या निवडणुका सुरु आहेत. त्यामुळे देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्याचं बोललं जात आहे. तसेच निवडणुकांनंतर देशात पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा भडका उडू शकतो, असा अंदाजही तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. 

देशात 4 नोव्हेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. केंद्र सरकारनं पेट्रोलच्या उत्पादन शुल्कावर 5 रुपये आणि डिझेलवर 10 रुपये प्रति लिटर घट केली होती. त्यानंतर देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या खाली आलं. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, राज्यातील अनेक शहरांत पेट्रोलच्या किमती शंभरी पार पोहोचल्या आहेत. 

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. तरिदेखील देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती तीन महिन्यांपासून स्थिर आहेत. अशातच देशात निवडणुकांमुळे पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्याचं बोललं जात आहे. देशातील सर्वच महानगरांपैकी सर्वाधिक दर मुंबईत आहेत. मुंबईत पेट्रोल 110 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. 

देशातील महानगरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मुबंई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोलची सर्वाधिक किंमत मुंबईमध्ये असून प्रति लिटर 110 रुपयांनी मुंबईत पेट्रोल विकण्यात येत आहे. दिल्लीव्यतिरिक्त कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रति लिटर पार पोहोचलं आहे. तेल कंपन्यांनी 4 नोव्हेंबरपासून या महानगरांतील किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. सरकारने 15 जून 2017 पासून बाजारात तेलाच्या किमती लागू केल्या आहेत, ज्यावरून त्यांचे दर दररोज निश्चित केले जातात.

देशात चार महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर काय? 

  • दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर
  • मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर
  • चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर
  • कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लिटर 

महाराष्ट्रात एक लिटर पेट्रोलचे दर 100 रुपयांहून अधिक आहेत. भारतीय पेट्रोलियम वितरण कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ने आजचे नवे दर जारी केले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात पेट्रोलचे दर अद्यापही शंभरीपार आहेत. जाणून घेऊयात मुंबई, पुण्यापासून नाशिकसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमतींबाबत...

राज्यातील महत्त्वाच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती : 
प्रमुख शहरं पेट्रोलची किंमत प्रति लिटर डिझेलची किंमत प्रति लिटर
मुंबई 109.98 रुपये प्रति लिटर  94.14 रुपये प्रति लिटर
ठाणे 110.12 रुपये प्रति लिटर  94.28  रुपये प्रति लिटर
पुणे 109.72 रुपये प्रति लिटर  92.50 रुपये प्रति लिटर
नाशिक 109.79 रुपये प्रति लिटर 92.57 रुपये प्रति लिटर
नागपूर 110.10 रुपये प्रति लिटर 92.90 रुपये प्रति लिटर
कोल्हापूर 109.66 रुपये प्रति लिटर  92.48 रुपये प्रति लिटर
अहमदनगर 110.12  रुपये प्रति लिटर  92.90 रुपये प्रति लिटर
अमरावती 111.14 रुपये प्रति लिटर  93.90 रुपये प्रति लिटर

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Kadam MPPSC : 'बनवाबनवी'कार पूजा खेडकरनंतर आता प्रियांका कदमचा नंबर? तीन वर्षांपूर्वी दिव्यांग कोट्यातून अधिकारी अन् सैराट डान्स व्हायरल!
'बनवाबनवी'कार पूजा खेडकरनंतर आता प्रियांका कदमचा नंबर? तीन वर्षांपूर्वी दिव्यांग कोट्यातून अधिकारी अन् सैराट डान्स व्हायरल!
Pune Crime News: संतभूमीत गोळीबाराचा थरार, देहूत वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळी सराईत गुन्हेगारांचा गोळीबार, एकाचा मृत्यू
संतभूमीत गोळीबाराचा थरार, देहूत वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळी सराईत गुन्हेगारांचा गोळीबार, एकाचा मृत्यू
Akola Tukaram Bidkar Accident : ट्रकच्या धडकेत मृत्यू, माजी आमदार तुकाराम बिडकरांच्या अपघाताचा CCTV
Akola Tukaram Bidkar Accident : ट्रकच्या धडकेत मृत्यू, माजी आमदार तुकाराम बिडकरांच्या अपघाताचा CCTV
Team India Squad for Champions Trophy 2025 : बुमराहशी त्याची तुलना तुम्हाला पटते का....; चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हर्षित राणाला घेण्यावरून वाद पेटला; माजी सलामीवीर BCCI वर भडकला
बुमराहशी त्याची तुलना तुम्हाला पटते का....; चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हर्षित राणाला घेण्यावरून वाद पेटला; माजी सलामीवीर BCCI वर भडकला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Harshwardhan Sapkal : काँग्रेसच्या नवीन प्रदेशाध्यक्षांचा अजेंडा काय? हर्षवर्धन सपकाळ EXCLUSIVEABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 14 February 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सAkola Tukaram Bidkar Accident : ट्रकच्या धडकेत मृत्यू, माजी आमदार तुकाराम बिडकरांच्या अपघाताचा CCTVABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 14 February 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Kadam MPPSC : 'बनवाबनवी'कार पूजा खेडकरनंतर आता प्रियांका कदमचा नंबर? तीन वर्षांपूर्वी दिव्यांग कोट्यातून अधिकारी अन् सैराट डान्स व्हायरल!
'बनवाबनवी'कार पूजा खेडकरनंतर आता प्रियांका कदमचा नंबर? तीन वर्षांपूर्वी दिव्यांग कोट्यातून अधिकारी अन् सैराट डान्स व्हायरल!
Pune Crime News: संतभूमीत गोळीबाराचा थरार, देहूत वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळी सराईत गुन्हेगारांचा गोळीबार, एकाचा मृत्यू
संतभूमीत गोळीबाराचा थरार, देहूत वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळी सराईत गुन्हेगारांचा गोळीबार, एकाचा मृत्यू
Akola Tukaram Bidkar Accident : ट्रकच्या धडकेत मृत्यू, माजी आमदार तुकाराम बिडकरांच्या अपघाताचा CCTV
Akola Tukaram Bidkar Accident : ट्रकच्या धडकेत मृत्यू, माजी आमदार तुकाराम बिडकरांच्या अपघाताचा CCTV
Team India Squad for Champions Trophy 2025 : बुमराहशी त्याची तुलना तुम्हाला पटते का....; चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हर्षित राणाला घेण्यावरून वाद पेटला; माजी सलामीवीर BCCI वर भडकला
बुमराहशी त्याची तुलना तुम्हाला पटते का....; चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हर्षित राणाला घेण्यावरून वाद पेटला; माजी सलामीवीर BCCI वर भडकला
पिक विम्याची रक्कम आता तीन आकड्यात होणार, फक्त 'या' शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पिक विमा; अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा होणार!
पिक विम्याची रक्कम आता तीन आकड्यात होणार, फक्त 'या' शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पिक विमा; अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा होणार!
Eknath Shinde & Devendra Fadnavis: एकनाथ शिंदेंचा फडणवीसांना शह, मुख्यमंत्र्यांच्या वॉररुमच्या धर्तीवर को-ऑर्डिनेशन रुमची स्थापना
एकनाथ शिंदेंचा फडणवीसांना शह, मुख्यमंत्र्यांच्या वॉररुमच्या धर्तीवर को-ऑर्डिनेशन रुमची स्थापना
RBI News Update: मोठी बातमी, मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयकडून निर्बंध, ठेवीदारांना ठेवी काढण्यास मनाई 
मोठी बातमी, मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयकडून निर्बंध, ठेवीदारांना ठेवी काढण्यास मनाई 
नियमानुसार 1400 कोटींच्या सफाईचं कंत्राट बेरोजगारांना देण्यात अडचण काय? हायकोर्टाचा महापालिकेला सवाल
नियमानुसार 1400 कोटींच्या सफाईचं कंत्राट बेरोजगारांना देण्यात अडचण काय? हायकोर्टाचा महापालिकेला सवाल
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.